फॉलोअर

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

🚩 बाजींद भाग - ३१ ⚔️

 

🚩  बाजींद भाग - ३१ ⚔️

▶ज्या टकमक टोकाचे नुसते नावच ऐकुन अख्या धनगरवाडीस रात्रीची झोप लागत नव्हती, त्या टकमक टोकाच्या जवळच आपण उभे आहोत ही कल्पनाच सखाराम, नारायण, सर्जा आणि मल्हारीच्या हृदयाला
घरकाप उडवणारी होती.

वेळ मारन नेत ते चौघेही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली. मंजुळ घंटानिनाद आणि रुद्राचा घुमणारा आवाज कानी पडताच सखाराम ने जाणले कि श्रीजगदीश्वर मंदिर जवळ आले आहे.

मंदिराच्या सभोवताली ताशीव दगडांची पक्की तटबंदी बांधली होती.

कमरेला तलवारी, पाठीला ढाल आणि हातात उंचापुरा माला घेतलेले कित्येक धारकरी तिथे पहारा देत होते.

जगदीश्वराची नक्षीदार दगडी कमान पार करून ते चौघेही आत प्रवेशले.

सकाळच्या गारव्यात आणि रिमझिम पावसात मंदिरातील सुगंधी फुलांचा सुगंध है खरोखर एक रम्य चित्र होते.

सरकारी कार्यालयातील अनेक अधिकारी सकाळी सकाळीच दर्शन घेऊन दरबारी जायला गडबड करत होते.

सखाराम व चौघे पण जगदीश्वराच्या गाभाऱ्यात गेले.

समोर जगदीश्वराचे शिवलिंग शीतल जलधारेत न्हाऊन निघताना दिसत होते. सभोवताली नाना तऱ्हेच्या शोभीवंत फुलांनी यथासांग पूजा केली होती.

समोर पुजारी मुखाने पवित्र मंत्र म्हणत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना तीर्थ देत होते.

सखाराम ने गुढगे टेकले आणि मन भरुन महादेवाचे दर्शन घेतले.

समुद्रमंधनातून निघालेले अतिजहाल विष प्राशन करून देवांचे प्राण वाचवणारा महादेव त्याचा दाह शांत करण्यासाठी जणू सहयाद्रीच्या त्या उंचच उंच गडकोट किल्ल्यात विसावला असावा अशी भावना
सखाराम च्या हदयात उचंबळून आली होती…त्याचे डोळे पाणावले होते.

त्या महादेवाने देवांसाठी विष प्प्राशन केले मात्र आमच्या महादेवाने सारे आयुष्य मृत्युच्या जिभेवर काढले होते.

धर्म, देव, नावालाही शिल्लक नव्हता, स्वत्व, अस्मिता, स्वाभिमान तर ऐकणार्याला नवल वाटत होते.

माणुसकी नावाचा शब्द तर दुरापास्त झाला होता.

स्वार्थासाठी स्वकीयांचे गळे चिरणारा तो महाराष्ट्र जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते आजही नरकात बुडून गेला असता.

▶आज माझ्यासारखा साधारण मेंढपाळ कष्टाची भाकरी समाधानाने खातोय ते केवळ महाराजांच्या मुळे याची जाणीव सखाराम च्या मुखावर होती.

नाहीतर आजवर कित्येक आदिलशाही, मोगलांच्या टोळधाडी आळीपाळीने महाराष्ट्रावर पडत होत्या.

आज आमच्या घरातील आया बाया.मुल.गुर ढोर सुखात आहोत यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या महादेवाने प्रत्यक्ष महादेवापेक्षाही जहाल विष प्राशन केले आणि पचवले होते.

वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन अखंड घोडा आणि तलवार हीच कुलदैवते मानून सतत हिंदवी स्वराज्याचा ध्यास उरात बाळगून हिंदुस्थानातील पाच पातशाहीना
रणांगणात चारी मुंड्या चीत करून मराठेशाहीचे सुवर्ण सिंहासन स्थापन करून हिंदुस्थानातील कित्येक भंगलेल्या सिहासनाचा जणू बदला घेतला होता…’

आणि हे सारे कोणाला घेऊन तर साधी लंगोट वाली पोर बरोबर हेऊन…..अहो आज या पोरांचा धाक दिल्लीपर्यंत आहे याचे कारण केवळ शिवाजीराजे..!

सखाराम डोळ्यात आले पाणी पुसत बाहेर पडला.

सकाळच्या गार वाऱ्याने आणि बारीक तुषारासारख्या पावसाने त्याच्या डोळ्यात आलेल्या अश्रूला आणखीच थंड करत होते….!

ते चौघेही परत सरकारी अतिथीगृहात आले.

काही क्षण गेला खुर वस्ताद काका सोबत ३-४ धारकरी घेऊन आले.

येताच बोलले …चला गड्यान….महाराजांनी तुम्हाला भेटायची परवानगी दिली आहे. दरबारी रीतरिवाज माहित नाही तुम्हाला म्हणून सांगतो दरबारात जास्त आवाज न करता बोलायचे आणि विचारेल तेवढीच उत्तरे द्यायची…!

चला….आवरा लौकर…

असे म्हणत सखाराम व चौधे वस्ताद काकांच्या सोबत दरबाराकडे चालू लागले..

▶नगारखान्यातून नगार्याचा आवाज येत होता.

सारे दरबारी वकील, भेटीसाठी परराज्यातून आलेले सरदार, सरकारी अधिकारी आणि केवळ महत्वाच्या व्यक्तींनाच नगारखान्याच्या आत असलेले शिलेदार माहिती विचारून, नावे व परवलीचे शब्द, ओळखीचे
कागद तपासून ते लिहून घेऊन मगच आत सोडत असे.

नगारखाण्यातून आत प्रवेश करताच समोर असलेल्या भव्य दरबारात जाण्यासाठी असलेल्या कमानीतून आत प्रवेश दिला जात असे.

तिथे उभा असलेले हशम प्रतवारी कस्न कोण कुठे उभे राहायची सूचना करत होते.

आत माशालांच्या उजेडानी सारा दरबार उजळून निघाला होता.

समोर पाहताच चोपदार,भालदार हातात सुवर्णदंड घेऊन महाराज येण्याची वाट पाहत होते. राजसदरेच्या बाजूलाच काही वकील, कारकून मंडळी समोर भूर्जपत्रे, टाक दवत घेऊन बसली होती.

आत साधारण पाच पन्नास लोक असतील पण कोणीही अजिबात मोठ्याने बोलत नव्हता.

कुजबूज मात्र सुरु असायची…
राजसदरेच्या मधोमध महाराजांचे ३२ मण सोन्याचे आणि कित्येक हिरे,माणिक,मोती यांनी जडवलेले
सुवर्णसिंहासन झळाळत होते…

हेच ते सिंहासन ज्याचा धाक सारी पातशाही घेत होती.

सखाराम व त्याचे साथीदार वस्ताद काकांच्या बरोबर अगदी समोर उजव्या बाजूला जाऊन उभी होती.
त्यांच्या कामाचा त ओळखीचा कागद वस्ताद काकानी सदरेवर बसलेल्या वकिलांच्याकडे दिला व काहीतरी कानात सांगितले.

ते ऐकताच त्या वकिलाने तो कागद उघडून पहिला आणि सखाराम व त्याच्या साथीदारांच्याकडे पाहू लागले आणि समोर या अशी खून केली.
वकील बोल…….सधारण किती दिवस झाले तुमच्या गावाला हा त्रास होत आहे ?
वकिलांच्या बोलण्याने सखाराम ने उत्तर दिले….जी….बरेच दिवस झाले ….पण या मागच्या धा-पंधरा
दिसात जीवाप आणि माणसांच्यावर पण वाघांनी हल्ला केला.

टकमकाच्या बाजूला जनावरे घेऊन हिंडवायाला जायला पण लोक घाबरत आहेत आता….!

मोठा श्वास घेऊन वकील बोलले..ठीक आहे ……. वस्ताद काकांच्याकडे पाहत वकील बोलले की उत्तरेतून काही हेर महत्वाचा निरोप आला आहे.

त्या हेराना घेऊन महाराज काही वेळ खलबतखान्यात घालवत आहेत.

काही वेळात महाराज येतील…..पहिला प्रश्न या चौघांचाच मांड्या…तुम्ही थांबा काही वेळ…

सखाराम दरबारात चौफेर नजर फिरवू लागला.

अजूनही पटत नव्हते कधी स्वप्नातसुधा खुद्द शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहता येईल ते…पण खंडोजी भेटला आणि सारे शक्य झाले आणि आम्ही मात्र त्याच्यावर नाही नाही त्या शंका घेतल्या….बिचारा परत भेटला की पाय धुवून पाणी पीइन त्याचे…पण कुठे असेल देव जाणे……

▶इतक्यात एक जोरदार आरोळी झाली………

होशियार……होशियार …होशियार…….

प्रौढप्रतापकुलावातंस क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज राजश्री शिवाजीराजे येत आहेत
हो……. होशियार……होशियार …होशियार……
महाराज…… प्रौढप्रतापकुलावातंस क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती कि ….. आणि सारा दरबार व सखाराम व त्याचे सहकारी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडला……जय…जय
..जय …….

महाराज सिंहासनाच्या पाठीमागून आले.

सोबत अनेक अंगरक्षक, शिलेदार, वकील होते…….!

पांढरा शुभ अंगरखा, कमरेला दरबारी जगदंबा तलवार, डोक्यावर मंदील शिरपेचात रोवलेला मोत्याच्या तुरा आणि गळयात भोसले कुळाची आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ.
कपाळावर शंभू महादेवाचे त्रिदळ व त्यातून शिवगंधाचा नाम.
कपाळातून निघालेले सरळ सळसळीत नाक,काळेभोर बोलके डोळे आणि ओठावर काहीसे स्मितहास्य मात्र चेहऱ्यावर कमालीची गांभीर्यता..
हेच ते शिवाजीराजे भोसले ज्यांनी वयाच्या १४ च्या वर्षी महाराष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्ती देण्यासाठी रायरेश्वरी स्वराज्याची शपथ वाहिली….ज्या वयात आमची पोर पोराटकी खेळात मग्न असत्यात.
त्यावेळी तोरणा किल्ला जिंकला….जावळीच्या मोऱ्यांची मिजास उतरवली..अफझलखानासारखा राक्षस समोरासमोर फाडला…पन्हाळगडाच्या वेढ्यातुन सिद्दीच्या हातावर तुरी देऊन निसटले….शाहिस्तेखानाला लाल महालात जाऊन बोटे तोडून शास्ता केली…..सुरतेसारखी मोगलांची आर्थिक राजधानी लुटून जाळून
फस्त केली…आग्यात औरंगजेबाच्या नजरकैदेतून मिठाइच्या पेटार्यात बसून पळून आले….असे एक ना
अनेक किस्से ऐकून सारा महाराष्ट्र गेली ३-४ दशके जगत होता.

महाराष्ट्राच्या दन्याखोर्यातून पहाटेच्या जात्याच्या ओव्यापासून ते लग्नाच्या मंगल अष्टकात शिवाजी
घेतल्याशिवाय दिवस जात नसायचा की शुभकार्य होत असायचे..।

आया बायांची अबू, त्यांचे कुंकू निर्धास्त केलेला हा युगपुरुष वर्षावर्षानी नव्हे तर युगायुगांनी जन्म घेतो……..काय बोलावे आणि किती बोलावे……शब्द संपतात…..।

▶महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि समोर उभ्या असलेल्या सभेकडे पाहताच …सर्वानी तीन मुजरे महाराजांना वाहिले……

महाराजांनी आपला उजवा हात छातीशी नेत सर्वांचे मुजरे स्वीकारले आणि सिंहासनाकडे उजवा पाय पुढे टाकत आसनस्थ झाले…..!

समोर वकील हातात काही कागदे घेऊन आला व महाराजाना काहीतरी सांगू लागला….

समोर उभ्या असलेल्या हारकार्याने हाळी दिली……..टकमक धनगरवाडीचे गावकारभारी सखाराम व त्याचे साथीदार समोर हाजीर हो……

त्याची आरोळी ऐकताच वस्ताद काकांनी सखाराम व चौघाना पुढे येण्यासाठी खुणावले..

सखाराम डोळे पुसत समोर गेला व सर्वानीही वाकून मुजरा केला…..

सखाराम व वस्ताद काकांच्याकडे पाहत महाराज बोलले……

वस्ताद काका …….काय समस्या आहे गावकऱ्यांची …?

महाराजांच्या शब्दाने वस्ताद काका समोर झाले आणि खालच्या रवात बोलू लागले….

.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️

सोमवार, ६ जुलै, २०२०

बाजींद भाग ४९

बाजींद भाग ४९

स्वराज्याची राजधानी म्हणून आम्ही रायगड निवडला,पण त्या राजधानीच्या अस्तीनीतील निखारे तुमच्या मुळे बाजूला झाले…आता आमच्या डोक्यात केवळ दक्षिण-दिग्विजय आहे…!

राजे सावित्रीकडे पाहत बोलले…..सावित्री..तुझ्यासारख्या मुली ही खरी स्वराज्याची दोलत आहे.

चुलीपुढे काम करणारे हात स्वातंत्र्यासाठी रणांगण गाजवू शकतात हे तुझ्या कृतीने तू दाखवून दिल्रेस…खंडोजी,तू मोठा भाग्यवान आहेस ,तुला सावित्री सारखी पत्नी मिळत आहे..खंडोजी मान खाली घालून केवळ ऐकत होता…!आणि बाजिंद.

राजांच्या आवाजाने बाजिंद ने पुन्हा मुजरा केला.
राजे बोलू लागले.

महाराष्ट्र ही बुद्धिवंतांची जननी,पण बुद्धी बरोबर कर्तव्य, स्वाभिमान, संस्कृतीची जपणूक करणारे तुमच्यासारखे वीर आम्हाला भेटले नसते,तर असे हजारो शिवाजी मिळूनही महाराष्ट्र स्वतंत्र झाला नसता…!

यावर बाजिंद बोलु लागला.

राजे…..असे बोलून मला लाजवू नये…..१०० वर्षे आम्ही आमच्या मूळ पुरुषाचा हा अनमोल ठेवा जणू काही तुमची वाट बघत जपला होता…आता आम्हाला मरण जरी आले तरी आम्ही तयार आहोत.

हिंदवी स्वराज्याचे हे पवित्र कार्य,आसेतु हिमाचल असेच सुरु राहील यासाठी आम्ही सारेच जीवाची बाजी लाव……!

राजे हसले…..आपण सारेच जीवाची बाजी लावून काम करुया…!जगायचे तर स्वताच्या भूमीत,स्वतंत्र भूमीत..नाहीतर लढता लढता मरण
पत्करायचे.

वस्ताद काकाकडे पाहत राजे बोलले.

काका…आम्हास माफ करा,हा सारा खेळ तुमच्या उपरोक्ष आम्ही अमलात आणला.

कारण कमी वेळेत खूप काही साधायचे होते….सर्वाना सांगत बसलो असतो तर अजून १० वर्षे रायगड मध्ये देवा धर्माचे राज्य आणणे अवघड होते.

जे विरोध करत होते,ते आपलेच लोक होते..त्यामुळे हि नीती आम्हाला अमलात आणावी लागली….चला…निघतो आम्ही …पुढची तयारी काय असेल..हा यशवंता तुम्हाला सांगेल….जातो आम्ही..!

आणि आल्यापावली राजे घोड्यावर स्वार झाले आणि रायगडाच्या वाटेला निघून गेले..मागोमाग महाराजांची शिवगंगा दोडत निघाली….!

सारेच थक्क झाले होते राजांच्या बोलण्याने. सखाराम ने वस्ताद काकांना खून करत बोलला.

काका…आमच्यासोबत जे चार दिवस खंडोजी बनून आले होते….ते हेच ..!

यशवंताकडे पाहत सखाराम बोलत होता,आणि यशवंता हसत हसत सर्वांच्या जवळ आला आणि सखाराम ला बोलला….

काय सखाराम….तुमच काम झालं म्हण…?

मजी महाराज म्हणत व्हत..की अतापास्न टकमकावर्ण एकबी हरामखोर टाकणार नाय…?

बेस झाल बगा तुमच…

आता मात्र सखाराम ला हुंदका आवरणे अशक्य झाले….त्याने रडतच यशवंता च्या पायाला मिठी मारली आणि बोलू लागला.

मला कायबी समजना..कोण आहे तुमी…आमच्या गरीब लोकांना देव म्हणून भेटलासा…तवा खंडोजी…आणि आता यशवंता …खर कोण हायसा तुम्ही ते तर बाजूला उभा असलेला खंडोजी हासतच बोलला.
सखाराम….हे …हेच आहेत आमचे बहिर्जी नाईक…!

हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख.
क्रमशः...

बाजींद भाग ५०

बाजींद भाग ५०

आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला.

त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला,की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता.

पण,बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्‍न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….!नाईक हसले आणि बोलले…..गड्या,या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे,हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही,म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली.

रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे,पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…!

आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरोबर ना ..?

बहिर्जी नाईक हसत हसत बोलत होते आणि वस्ताद काकांना अश्रू अनावर झाले.
नाईक… .तुमची निष्ठा,तुमची खेळी जगात कुणालाच समजणार नाही
बघा…..तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो हे आमचे नशीब…!

अहो,नशीब काय काका ……या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात शिवाजी नावाच्या परीसाचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले,नाहीतर गावोगावच्या यात्रे जत्रेत सोंग करत भिका मागत हिंडलो असतो….

जे काय आहे त्याचे श्रेय केवळ महाराजांच्या जीवनकार्याला आहे काका.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातून शिवाजी वजा केले तर शिल्लक काहीच उरत नाही.तुम्हाला इथवर आणणे,

खंडोजी कडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे,

शिक्यांच्या कडून १०० राज्ये स्वराज्यात घेणे

याचा सूत्रधार जो कोणी आहे त्यांचे नाव म्हणजे ‘शिवाजी महाराज’

त्याना विचारल्याशिवाय आणि त्यांच्या आदेशानुसार हा बहिर्जीच काय
स्वराज्यातला अणुरेणु सुध्दा निर्णय घेऊ शकत नाही.

बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूंचा बांध फुटला होता….

तो मनोमन विचार करत होता….

बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूचा बांध फुटला होता….

तो मनोमन विचार करत होता….

आजवर या बाजींद ने उगाच जगाला घाबरवून फुशारकी मारली…..पण,आज कळून चुकले होते…खरे बाजींद तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आहेत.

दूरवर दौडत निघालेल्या महाराजांच्या फौजेकडे तो पाहत होता आणि सोबत मावळत्या सूर्याच्या संधीप्रकाशात भगवा झेंडा फडफड फडकत निघाला होता…..!

मित्रांनो इथेच या कथेचा प्रवास समाप्त होतोय. राजमुद्रा चॅनेल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवन हे छत्रपती शिवाजी महाराज या नावा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
समाप्त  !...

बाजींद भाग ३५

बाजींद भाग ३५

वस्ताद काकाचे हे बोल ऐकताच सखाराम बोलला..

काका…ही पेटी बघा….आम्ही साधी गरीब लोक…कशाला राजकारणात पडतोय.जे पाहिल.ज्याने है दिल ते तुम्हाला सांगितल…खंडोबाची आन मी खोटे नाही बोलत..

पण काका खंडोजी मेला तर काय त्याचे भूत होत काय आमच्यासोबत…?शक्यच नाही ओ..माणसासारखा माणूसच होता,किती साधा आणि सरळ…..

गप्प बसा…..काका ओरडले…..
आय माहिती काय आहे खंडोजीबद्दल तुम्हास्नी…..या हातानी लहानाचा मोठा केलाय, कुस्ती शिकवली हत्यारे शिकवली आहेत मी…..

पण कर्तव्यापुढे हिंदवी स्वराज्यात कोणालाही मान नाही….असे म्हणत वस्ताद काका बोलू लागले…..

ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती.
जनावरांची भाषा अवगत असणाऱ्या बाजींदच्या तावडीतून प्रत्यक्ष आमच्या बहिर्जीनी जर आम्हाला वाचवले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो..

जीवना-मरणाच्या दारात आम्ही सारे ज्याच्यामुळे उभे होते तो मस्त लग्नाच्या बोहल्यावर आनंदाने उभा होता..!

पण खुद्द बहिर्जी नाईक आमच्या सोबत होते त्यामुळे पुढे महासागर जरी आला असता ती विजय आमचाच होता….एक राजकारण घडले त्या रात्री…..

यशवंतमाचीच्या जगलात गस्तीवर असलेल्या मावळ्यांच्या हाती यशवंतमाची पैलवान लागले…भीमा जाधव आणि त्याचे सहकारी.

त्यांना कैद करुन मावळ्यांनी आमच्या छावणीत बहिर्जी नाईकांच्या समोर आणले.

घाबरलेल्या भीमाने यशवंतमाचीचा सरदार मला करणार असाल तर मी तुम्हाला माचीत घुसायची वाट दाखवतो असे म्हणाला.आणि त्याने दाखवलेल्या वाटेने मराठ्यांची सारी सेना यशवंतमाचीचा मार्ग त्या काळोख्या आधारात चालू लागली..

खंडोजी आणि सावित्री विवाहाच्या बंधनात अडकल्याचीही बातमी भीमाने आम्हाला दिली होती.
ती रात्र खंडोजी साठी काळरात्र ठरली होती.

कर्तव्यात कसूर करून एका स्त्रीसाठी मराठ्यांच्या विरोधात शस्त्र उचलणारा
खंडोजी ,बहिर्जी नाईकांच्या डोक्यातून जात नव्हता,यशवंतमाचीसारख्या
छोट्याश्या राज्याला स्वराज्यात आणायला इतका अवधी कसा जातोय याचीउत्तरे महाराजांना हवी होती.

त्यामुळे खुद्द बहिर्जी नाईकांनी या मोहिमेत स्वताहून भाग घेतला होता.

नाईक स्वता मोहिमेत असले कि मावळ्यांना प्रत्यक्ष शिवछत्रपती सोबत
असल्याचा अनुभव येत असे…त्यामुळे जवळपास विजयाची माळ आमच्याच
गळ्यात पडणार असे वाटत होते.

यशवंतमाचीच्या आत आम्ही सारे पोहचलो.

काही कस्न राजे येसाजीरावाना कैद करायची ही योजना आखली होती.

आत किती फौज आहे याची बित्तंबातमी भीमाने अगोदरच आम्हाला दिली होती.

मध्यरात्र उलटून गेली होती आणि त्या किरै रात्रीत साखरझोप घेणाऱ्या
यशवंतमाचीत मराठ्यांची पहिली आरोळी घुमली…..
हर हर महादेव…छत्रपती शिवाजी महाराज की जय ……

मराठ्यांच्या आरोळीने झोपलेल्या माणसांच्या अंगावर विस्तू पडून दचकून जाग यावी अशी यशवंतमाची जागी झाली.

शिर्के मंडळी सुध्दा युद्धाला तयार झाली.
हजारभर मराठे विरुद्ध कित्येक शिर्के मंडळी आता एकमेकाविरुद्ध तुटून पडणार होती…पण एवढ्या काळात मराठ्यांनी यशवंतमाचीची प्रेधा उडवणे सुरु केले होते.

कित्येक घरे जाळून टाकली होती,जीव वाचवून कित्येक लोक रस्त्यावरून धावत होते.

मराठ्यांच्या फौजेचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या कुटुंब काबिल्याला कधीही प्राणदंड
दिला जात नसे ….कित्येक शिर्के मंडळी रस्त्यावरून धावू लागली..सारी यशवंतमाची भीतीने थरथर कापत होती…

दरम्यान यशवंतमाचीच्या बालेकिल्ल्यातून शूर शिक्यांची चिवट सेना नदीला पूर यावा तश्या त्वेषाने हातात नंग्या समशेरी घेऊन बाहेर पडल्या….
क्रमशः

बाजींद भाग ३८

बाजींद भाग ३८

हजारो हात खाली तो देह गेला आणि एका मोठ्या खडकावर आपटला आणि खाली खोल निबिड अरण्यात रक्ताने माखलेला खंडोजी गतप्राण झाला….

सूर्य उगवला.हजारो सूर्यकिरणांनी रायगड उजळून निघाला ,पण गडावरील कोणाचेच लक्ष कामात नव्हते..सर्वांच्या मुखात एकच नाव होते खंडोजी….

आज एक नवीन अध्याय लिहला गेला.
स्वराज्यात फितुरांना क्षमा नाही..इये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.खंडोजी चा अध्याय संपला.

यशवंतमाची वर भगवा ध्वज अभिमानाने डोलू लागला.
राजे येसाजीराव आणि जिच्यामुळे खंडोजीला प्राण गमवावे लागले ती सावित्री चोरवाटेने विजापूर कडे रवाना झाली होती.
भीमा जाधव शिाच्य हातून ठार झाला होता…!

यशवंतमाची च्या मोहिमेने खंडोजी सारख्या निष्ठ्वान हेराचा बळी मात्र नक्कीच घेतला होता…..एका स्त्रीच्या मोहपाशात कर्तव्य विसरलेला हेर….खंडोजी…!

वस्ताद काकांना हुंदके आवरत नव्हते …सखाराम आणि त्यांच्या साथीदारांची मात्र पाचावर धारण बसली होती…….खंडोजी मस्न गेला आहे.तर आम्हाला इथवर आणले तरी कोणी…..भीतीने त्यांचे सर्वाग थरथरत होते….!

वस्ताद काकांच्या बोलण्यावरून सखाराम व त्याच्या सवंगड्याना अक्षरश घाम फुटला होता.

नरभक्षक वाघांच्या तडाख्यातून ज्या खंडोजी ने वाचवले ,ज्या खंडोजी ने रायगड पर्यंत येण्याचा मार्ग सुकर करून दिला,तो खंडोजी जिवंतच नाही ही कल्पनाच

त्याना पटेना,पण वस्ताद काकांच्या काळजातून आलेले शब्द आणि डोळ्यातील अथू खोटे असावेत असे त्याना वाटेना…!सखाराम ला तर फार मोठा धक्का बसला होता,कसे सांगावे की याच खंडोजी बरोबर दिवसभर चालून बाजिंद ची रहस्यमय कथा जाणून घेतली.

त्याच्याबरोबर राहून शिवराय समजून घेतले,बहिर्जी नाईक समजून घेतले. सर्वच जटील होते..

काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि निर्धाराने वस्ताद काका बोलले.

चला…माझ्या खंडोजी ने मरुन सुध्दा कर्तव्य बजावले हे मात्र खरे.

लहान मोठ्या सर्वानाच मदत करणारा होता तो,शिवाजी महाराज रक्तात होते त्याच्या..पण,पण कर्तव्य विसरलेला हेर हा शिक्का कायमचा पडला होता.त्याच्यावर तो किमान माझ्या पुरता तरी पुसला गेला आहे..!

चला,आपण हेर खात्याच्या केंद्रात जाऊ..तिये जाऊन बहिर्जीना याची वर्दी देऊ..तिथून पुढे तुमच्या वाडीवर जाऊन महाराजांच्या हकमानुसार अंमलबजावणी करु..

चला…

सारे उठले आणि ती जंगलातील चोरवाट चालू लागले..

मजल दरमजल करत एका डोंगरावर चढून ज्या मार्गे येताना ते आले होते त्याच मार्गातील गुहेत शिरले….

गुहेत पूर्वीचाच हेर साधूचे रूप घेऊन ध्यानस्त बसला होता.
त्याला पाहताच काका बोलले…जय रोहिडेश्वर…..

त्यावर डोळे उघडत तो हेर बोलला..जय भवानी…..
क्रमशः...

रविवार, ५ जुलै, २०२०

बाजींद भाग ३७

बाजींद भाग ३७

साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी कठोर शिक्षा खुद्द बहिर्जी नाईकांनी फर्मावली.

कडेलोट……

होय…..अश्या फितुरांना स्वराज्यात एकाच शासन….मृत्युदंड. भल्या पहाटेच खंडोजीचे हात मागे बांधून तोंड काळ्या वस्त्राने बांधून त्याला टकमक टोकावर आणले गेले होते. वस्ताद काका स्वता पाठीमागे उभे होत.ज्याला लहानाचे मोठे या हातानी केले ,कुस्तीसह हत्यारे शिकवली.
हेरखात्यात नोकरी मिळवून दिली अश्या पोराला आज स्वताच्या हाताने मरण द्यायचे होते….

वस्ताद काकांनी बहिर्जी नाईकांना हात जोडून विनवणी केली….

नाईक,माझी आजवरची सेवा चाकरी रुजू धरून एक डाव या खंडोजीला माफी करा.

या पोरांन आजवर जीवावरच्या कामगिन्या आपल्या सोबत केल्या आहेत.

अशीही यशवंतमाचीसुध्दा स्वराज्यात सामील झाली असताना त्याला इतकी भयानक शिक्षा कशासाठी…?

कशासाठी……आज खंडोजीला माफ केले तर हजारो हेर जे स्वराज्यात फिरत आहेत ते सुध्दा स्वार्थापोटी संसार थाटून बसतील वस्ताद काका.

साधारण माणसांचे आयुष्य वेगळे आणि स्वराज्याचे हेर खाते वेगळे आहे हे तुम्ही जाणता.इये उठता बसता मरणाशी सामना करत आपण जगतो…आणि आपल्या मुळे महाराष्ट्राची प्रजा आज सुखात आहे.

महाराजांची शिस्त,त्यांची शिकवण….त्यांचा त्याग डोळ्यासमोर आणा काका ..तो एका पारड्यात टाका आणि खंडोजीचा गुन्हा …कोणाचे पारडे जड होईल तुम्हीच ठरवा.

खंडोजीच्या वैयक्तिक सुखासाठी कित्येक मावळे तलवारीच्या घावाखाली मरुन गेली.

ज्या शिर्क्यांच्या मुजोरीने आदिलशाही महाराजांना कमी लेखत होती त्या यशवंतमाचीची महत्त्वकांक्षी मोहीम आपण खंडोजी ला दिली आणि घात करून बसलो.

आज रायगड परिसरात अनेक स्वकीय राज्ये स्वराज्यात नाहीत….एका
यशवंतमाचीला जिंकायला इतका वेळ तर मग इतर राज्यांचे कसे होईल…

महाराजांच्या डोक्यात दक्षिण-दिग्विजय थैमान घालत आहे. आणि इकडे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या दिव्याखाली अंधार,

हा ठपका महाराजांच्यावर येतो काका…देशाचा विचार करा..म्हणजे वैयक्तिक !
खंडोजीवरील तुमचे प्रेम कुठे आहे समजेल…..

बहिर्जी नाईकांची नाकपुडी रागाने फुलली होती.

पाठमोरे उभे राहून ते भरल्या डोळ्याने सांगत होते..!

खंडोजीवर साऱ्यांचे प्रेम होते.

मनमिळावू स्वभाव कुस्तीत-हत्यारे चालवण्यात पटाईत…महाराजांच्यावर अढळ श्रद्धा या गुणामुळे तो सर्वांच्या मनात बसला होता. पण,असा योद्धा एका स्त्री साठी असा का वागु शकतो याचे कोडे सर्वाना पडले होते.

त्याला मृत्युदंडाची शिक्षा देऊनही महाराज गप्प का होते हे कोडे उलगडत नव्हते…कदाचित दक्षिण दिग्विजयाच्या तयारीमुळे त्यांना वेळ नसेल…..।

वस्ताद काका मात्र हुंदके देत देत सारे आठवत होते.

खंडोजीला टकमक टोकावर आणला गेला होता….

टकमकाखालून थंडगार वारे वर येत होते.

पहाटेच्या गर्द शांततेत सारे स्वराज्य झोपी गेले होते मात्र स्वराज्यासाठी
आहोरात्र जगलेला पण कर्तव्यात चुकलेला एक हेर आता मरणाच्या दारात उभा होता…!

वस्ताद काकांनी डोळे पुसत त्याला धरून आणलेल्या हशमाना खून केली…. एक क्षण. दुसरा क्षण…..खंडोजीला टकमक टोकावरून खाली ढकलून दिले गेले….
क्रमशः...

बाजींद भाग ३६

बाजींद भाग ३६

काळभैरवाच्या नांवान चांगभलं…….

तलवारीचे घाव एकमेकावर पडू लागले…!

मराठे विरुद्ध मराठे लढू लागले.हेच शिवाजी महाराजांना नको होते म्हणून कित्येक वर्षे यशवंतमाचीकडे
महाराजांचे दुर्लक्ष होते.
पण,परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त घातक हा अनुभव महाराज सारया
आयुष्यभर घेत आले होते.
आता निर्वाणीचा क्षण होता.रामराज्य आणायचे असेल तर रावण स्वकीय आहे
म्हणून गप्प बसता कामा नये.
आज शिर्के विरुद्ध मावळे घनघोर युद्धास प्रारंभ झाला होता.

खुद बहिर्जी नाईक या युध्दात होते.

कसे काय देव जाणे…आजवर बहिर्जी नाईक प्रत्यक्ष युद्धात फार कमी येत असत.व्यवस्थित पूर्वनियोजन करून देत सारे तेच करत असायचे मात्र हातात तलवार
घेऊन लढणे सहसा दिसत नव्हते…!
नाईकांच्या युद्धनीतीने मराठ्यांची सेना शिक्यांच्या विरोधात लढत होती.

यशवंतमाचीशी वैर करून त्यांच्याच विरोधात भीमा जाधवही लढत होता.
पण,या सार्या दंग्यात खंडोजी कुठे होता ?
तो तर सर्वात पुढे येऊन लढायला हवा होता. आतातर यशवंतमाधीचा जावई होता
तो….

पण,खंडोजी कुठेच दिसत नव्हता……

पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ होता….जीवघेण्या लढाईला प्रारंभ झाला.

भीमा जाधवाने शिर्क्यांचा संहार मांडला होता.त्याच्या तलवारीच्या घावाखाली
कित्येक शिर्के मंडळी मृत्युमुखी पडू लागली.
भीमाच्या भोवती अनेक शिर्क्यांनी कडे केले होते…तरीही भीमा मागे हटत
नव्हता…मारामारीत भीमा चांगलाच दूर गेला…दिसेनासा झाला..तरीही तलवारीचे
खणखणाट ऐकू येतच होता.
बहिर्जी नाईकांनी यशवंतमाचीच्या राजवाड्यावर हल्ला चढवला..काही क्षण

भूतकाळात जमा झाले आणि माचीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू
लागला…

झाले…..अनेक वर्षे गुर्मीत राहून महाराजांशी अभिमानाने वैर मिरवणारी
यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाली.

राजवाड्यात मात्र राजे येसाजीराव शिर्के,त्यांचा कुटुंबकबीला जाग्यावर
नव्हताच….कदाचित युद्धाच्या घोषणा झाल्या त्यावेळी गुप्तवाटेने ते पसार झाले
असावेत असे वाटते…पण माची स्वराज्यात सामील झाली.

एक मात्र घटना खूप वाईट तितकीच चांगलीही घडली.
खंडोजी मराठ्यांच्या हाती जिवंत गवसला.

खुद्द बहिर्जी नाईकांनी त्याला चोरवाटेने पळून जाताना पकडले होते.

तोंडावर काळे अवलान बांधून त्याला हात बांधून धक्के मारत त्यांनी सर्वासमोर
आणले….!

यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाल्याचे वृत्त रायगडावर रवाना झाले.

माचीच्या रक्षणाला मराठी फौज ठेवत नाईक आणि वस्ताद काका खंडोजीला
घेऊन रायगडावर आले होते…!

कोणत्या तोंडाने सांगावे महाराजांना खंडोजी सारख्या निष्ठावान हेराची गद्दारी..!

महाराजांना अश्या गोष्टी न सांगणेच हितकारक असते…

खंडोजीने कर्तव्यात कसूर करुन,एका स्त्री च्या मोहमायेत अडकून आपल्याच
बांधवाना कित्येकदा धोक्यात आणले व त्यांच्याविरुद्ध शस्त्र चालवले,त्याच्या या
वागण्याने मराठ्यांच्या गुप्त मोहिमेला आणि हेरखात्याच्या नियमांना तडा
गेला. कित्येक मराठे मृत्युमुखी पडले, कित्येक बायका विधवा झाल्या.असा ठपका त्याच्यावर ठेवला गेला आणि ….

साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी शिक्षा बहिर्जी नाईकांनी फर्मावली.

कडेलोट..!

होय! अशा फितुरांना स्वराज्यात एकच शासन..मृत्यूदंड
क्रमशः

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...