फॉलोअर

शनिवार, १९ जुलै, २०१४

शंभू चरित्रं भाग ०८



शंभू चरित्रं भाग ०८
(वाचा आणि शेअरं करा)
"संभाजी महाराज" व्यसनी असं
रेखटलंय काहींनी.
काही काही नाटकात तरं इंट्रीच
ग्लास घेऊन दाखवली. अरे! कुठून
लागला शोधं?
काफिखान
तो औरंगजेबाच्या दरबारात
होता अख्बारी.
आपल्या सातारंला "ग्रांन्डफ"
नावाचा इतिहासकार होता. त्याने
मराठ्यांचा इतिहास लिहीला. आधार
त्या काफिखानाचा घेतला.
त्या काफिखानानं "संभाजी राजांच"
वर्णन करताना लिहून ठेवलयं,
""तो संभाजी स्वतःच्या बळावरं,
शौर्याच्या बळावरं एवढा बुलंद
आणि बलाढ्य झालायं कि कुणी शत्रू
त्याच्यावरं आक्रमणं
करायला धजावेनाच...! जणू
संभाजी राजाला आता सत्तेची नशा चढलीए""
काय लिहीतोय तो? "
संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावरं
एवढा बुलंद आणि बलाढ्य झालायं
कि कोणी शत्रू त्याच्यावरं आक्रमणं
करायला धजावेनाच जणू काय
त्याला सत्तेची नशा चढलीए" याचंच
भाषांतर "ग्रांन्डफ" नि इंग्रजीत
केलंय
"सत्तेची नशा चढलेला राजा"......"Ant
oxited With The Wine Of Volian
Pride" भाषांतर अगदी बरोबर आहे.
पण! आमचं इंग्रजी उत्तमं आहे
त्यामुळं आम्ही वाचलं. "Antoxited
With The Wine Of Volian
Pride"........"Antoxited With The
Wine ??...Wine?? घेत होते
संभाजी!!! लावला अनुमान.
एक पत्रं मिळालंय म्हणे,
संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय!!!.....
."आम्हाला दारूची दोन पिंप द्या".
एकजण म्हंटला "मागवला असेलं
Stock" अरे! कायं???......अरे!!!
मागवलेली दारू प्यायची नाही,
मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू
आहे. एवढं जरं
तुम्हा लिहीणाऱ्या कळंत नसेल तरं
तुम्ही लिहीताना घेतलेली का? याचं
संशोधनं होणं गरजेचं आहे.
सुपारीच्या खांडाचं व्यसनं
नाही संभाजी राजाला......सुप
ारीच्या खांडाचं!!!...अरे!!! बत्तीस
वर्ष झुंजत राहिलाय
"छाव्यासारखा".
अजीबात
नाही व्यसनी माणसाला नाही शक्यं
होत. अरे! बेफाम अत्याचारं,अन्यायं
सोसले. चाळीस दिवस
औरंगजेबाच्या छावणीत!!! सहन होत
नाही, शरीरंसंपदा तशी असावी लागते.
आपल्या राजानं ती कमावलीये!!!...
मावलीये!!!. एकंही व्यसनं
नाही त्याला एकंही.
क्रमशः

शंभू चरित्रं भाग ०7



शंभू चरित्रं 
भाग ०7
शंभूराजे आबासाहेबांसोबत आग्र्याला गेलेले तेव्हाची घटना...
शंभूराजाचें राजबिंडे रूप आणी बाणेदार स्वभाव बघून औरंगजेबेचा मूलगा अकबर याने संभाजी महाराजासोबत खेळण्याची शर्यत लावली...
नूकतेच अकबराला घोडेबाजीचे प्रशिक्षण चालू होते... तर त्याने शंभूराजासोबत पैज लावली... एका दरीवरून दूसर्या दरीवर घोड्यासोबत जायचे... त्या दोन्ही दर्यानां जोडणारा एक लाकडी ओंडका ठेवण्यात
आला....
सगळे महानगर ही पैज बघण्यासाठी जमा झाले.... खूद्द औंरगजेब पण आला....
स्पर्धा सूरू झाली... अकबर घोड्यावर बसला... अकबरला दररोजचा सराव होता त्याने घोड्याला टाच मारली... आणी त्याने घोडा दूसर्या दरीवर नेला व तिकडेच थांबला....
आता वेळ शंभू महाराजाचीं आली... शंभू महाराजानीं एक नजर औंरगजेबाकडे पाहीले.. पापणी लवते ना तोपर्यत घोड्याला टाच मारली आणी क्षर्णाधात तिकडे जाऊन अकबराला घोड्यावर बसवून औंरगजेबासमोर आणून ठेवले....
आणी त्यावेळेस पासून शंभूराजे आणी अकबर चांगले मिञ बनले....
शंभूराजेचा हा पराक्रम बघून औंरगजेब म्हणला...
"ये सिवा का छोरा संभा इतिहास रचेंगा इतिहास"

आणी रचला माझ्या धन्यानं असा इतिहास...
जो पाहून औंरग्या पण मुजर्याला झूकला....

गुरुवार, १० जुलै, २०१४

शंभू चरित्रं भाग ०६



शंभू चरित्रं भाग ०६
(वाचा आणि शेअरं करा)

यताकाल संभाजी राजाचं वयं होतं सतरा वर्ष. महाराष्ट्र एका नव्या जाणीवेच्या आनंदाला आतुरं झाला. रायगड आनंदानं न्हाला होता. कारण होतं "शिवरायांचा राज्याभिषेक". साडेसातशे वर्षापूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे "छत्रपती" होणारं होते. "या म्लेंच्छ बादशाहीमध्ये एक 'मराठा' एवढा पातशहा झाला" हि गोष्ट काही साधी झाली नाही. असं सभासदांनी लिहून ठेवलं. तो देखणा सोहळा शिवरायं "छत्रपती" होणारं. पण! त्याचं वेळी काहींनी शिवरायांच्या क्षत्रियत्वावरंच आक्षेप घेतला. शिवरायं क्षत्रीयं नाहीत. सबब! त्यांना राज्याभिषेकाचा अधिकारं नाही. यताकाल "गागाभट्ट" काशीवरून येते झाले आणि त्यांच्या सामोरं बसले. "धर्मपंडित" संभाजी राजेंनी "गागाभट्टाना" पटवून दिलं. गागाभट्टानी संमती दर्शवली आणि रायगडावर राज्याभिषेक झाला. साडेसातशे वर्षापूर्वीचा अंधार हटवला, लोकंशाही राज्यं निर्माण झालं, लोकंकल्याणकारी राज्यं निर्माण झालं, शिवंकल्याणकारी राज्यं निर्माण झालं, शिवशाही अवतरली. रयतेच्या डोळ्यांच्या कडा आनंदानं पाणावल्या. राजा "छत्रपती" झाला. पण! त्याचवेळी इतिहासात आणखी एक घटना घडली, आत्तापर्यंत मराठ्यांची पोरं फक्तं सरदारं पुत्रं होती. "संभाजी राजे पहिले 'छत्रपती' पुत्रं ठरले", "संभाजी राजे पहिले 'युवराज' झाले.
या घटनेपर्यंत संभाजी राजांवर एकही आरोप नाही, एकही डाग नाही. पण! या घटनेनंतर संभाजी राजांच्या चारित्र्याचं पाणी असं काही वेगळ्या पाटेनं वळवून देण्यात आलं कि, मुळचा "संभाजी राजाच" हरवून गेला. 'मल्हारं रामराव चिटणीस' या बखरकारानं आपल्या खापरं पंजोबाला संभाजीनी हत्तीच्या पायी दिलं याचा राग मनात घेऊन "संभाजी राजांचं" अत्यंत विकृत चित्रणं केलं. सभासद बाखरानही तसंच केलं. या दोन बखरींचा आधार घेऊनच मग! पुढचं लेखन झालं आणि "संभाजी राजा" बदनाम होत राहिला. संभाजी राजांवर आत्तापर्यंत ६० नाटकं, आणि २७ चित्रपटं आले. खुद्द दस्तूरं खुद्द शिवरायांवर सुद्धा एवढे झाले नाहीत. आम्हाला चकचकीत जगण्याची सवयं लागलीये. चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कादंबरीकारांनी, संभाजी राजाचं जगणं वास्तवतेनं न रेखाटता ते अधिक चकचकीत करण्याचा प्रयत्नं केला. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशी काय पात्रं आणली गेली "मोरेश्वरं आत्माराम पठारे" यांनी संभाजीवर पाहिलं नाटकं लिहिलं. या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्रं आणलं हीच तुळसा बेबंदशाही मध्ये औंधकरांनी आणली पण! नाटकाच्या प्रस्थावनेमध्ये औंधकर असं लिहितात कि या नाटकात योजलेलं "तुळसा" नावाचं पात्रं पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही. पण! तीन तास नाटकं बघताना आम्हाला प्रस्थावना वाचून दाखवली जात नाही, "तुळसा" खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागतं नाही. पण! तीन तास नाटकात संभाजीबरोबर तुळसा दिसते आणि मग! नाटक संपल्यावर आम्ही म्हणतो, "एवढे आता दोघं तीन तास होते बरोबर म्हटंल्यावर असणार काहीतरी दोघांच.".....उगं दाखवत्यात काय!!!
सत्याच्या तळाशी, वास्तवाच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि मग एखादं "नाहक व्यक्तीमत्वं" बदनाम होत राहतं हि आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

क्रमशः
----------------------------------------------------------------

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...