
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे. यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे. यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल. धन्यवाद आपला मित्र शिवभक्त विनोद जाधव माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. https://www.facebook.com/mhkharakuraitihas
फॉलोअर
रविवार, १८ ऑगस्ट, २०१९
मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 7
मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 7
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत.
महादजी ऊर्फ पाटीलबावा ह्यांचे चरित्र फार महत्त्वाचे आहे. पानिपतच्या
मोहिमेनंतर मराठ्यांची जेवढीं ह्मणून महत्त्वाचीं राजकारणे झाली, त्या
सर्वांमधे पाटीलबावा ह्यांचे नांव प्रमुखत्वेकरून चमकत आहे. किंबहुना,
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांचा तेजोरवि जो पुनः प्रकाशित झाला,
तो केवळ ह्या लोकोत्तर पुरुषाच्या परिश्रमाचेच फल होय असे ह्मटल्यास फारशी
हरकत येणार नाहीं. पुणेंदुरबारची कारस्थाने ज्याप्रमाणे नाना फडणविसांनी
चालविली, त्याप्रमाणे पाटीलबावांनी उत्तर हिंदुस्थानांतील सर्व मनसबे
युक्तिप्रयुक्तीने सिद्धीस नेले. त्यांचे लष्करी धोरण शिवाजी महाराजांच्या
तोडीचे असून, पाश्चिमात्य राष्ट्रांची सुधारलेली सैन्यरचना व युद्धपद्धति
ह्यांचे महत्त्व त्यांच्या लक्ष्यांत चांगले आल्यामुळे, त्यांनीं, डी बॉयन,
पेरन वगैरे युद्धकलाकुशल फ्रेंच लोक आपल्या पदरीं ठेवून, मराठी सैन्याची
सुधा १ बरवासागर हा गांव पेशव्यांनी जोतिबाच्या शौर्याबद्दल शिंद्यांस छ २६
मोहरम सलास खमसैन ( ता० ३ दिसेंबर इ. स. १७५२) रोजी इनाम दिला होता.
त्यावरून जोतिबाचा मुत्यु त्याच्या अगोदर थोडे दिवस झाला असावा हे उघड आहे.
रणा उत्तम प्रकारची केली होती. त्यामुळे त्यांचे सैन्य व तोफखाना
पाश्चिमात्य पद्धतीवर ताण करण्यासारखा होऊन, त्यांच्याशी टक्कर देणे
परराष्ट्रीयांस देखील अशक्य झाले होते. मग एतद्देशीय प्रतिपक्षी
संस्थानिकांस त्यांच्यावर नक्ष करणे दुष्कर व्हावे ह्यांत नवल नाहीं.
त्यांनी लढवय्ये रजपूत पादाक्रांत केले; प्रमत्त रोहिले नेस्तनाबूत केले;
दिल्लीचा शाहआलम बादशाह आपल्या मुठीत ठेविला; हैदर व टिपू ह्यांच्यावर पगडा
बसविला; इंग्रजांस आपली कर्तबगारी दाखविली; व अखेर सर्वांवर छाप बसवून,
दिल्लीच्या सार्वभौम बादशाहापासून आपल्या धन्याकरितां वकिल-मैतालकीची
बहुमानाचीं वस्त्रे पटकावून । १ महादजी शिंदे ह्यांनी दिल्लीच्या
बादशाहाकडून वकिलमुतालकीची वस्त्र पुण्यास आणली. त्या वेळीं जो समारंभ झाला
त्याचे वर्णन आणि त्या संबंधानें तत्कालीन मुत्सद्यांचे अभिनंदन पर उद्गार
वाचण्यासारखे आहेत

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...

-
*🚩 बाजींद भाग - ४४ ⚔️* * ▶ बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला …* * कोण र तू .. ?* * हिकड मरायला प...
-
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी 📜 ⚔ अग्निदिव्य लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार __ 📜 ⚔ 🗡 भाग - 7⃣ 📜 ...
-
शंभू चरित्रं भाग ३६ ( वाचा आणि शेअरं करा ) औरंगजेबानं आदिलशाही जिंकली , कुतूबशाही ताब्यात घेतली , आणि मग ! औरंगजेबा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा