बाजींद भाग ३७
साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी कठोर शिक्षा खुद्द बहिर्जी नाईकांनी फर्मावली.
कडेलोट……
होय…..अश्या फितुरांना स्वराज्यात एकाच शासन….मृत्युदंड. भल्या पहाटेच खंडोजीचे हात मागे बांधून तोंड काळ्या वस्त्राने बांधून त्याला टकमक टोकावर आणले गेले होते. वस्ताद काका स्वता पाठीमागे उभे होत.ज्याला लहानाचे मोठे या हातानी केले ,कुस्तीसह हत्यारे शिकवली.
हेरखात्यात नोकरी मिळवून दिली अश्या पोराला आज स्वताच्या हाताने मरण द्यायचे होते….
वस्ताद काकांनी बहिर्जी नाईकांना हात जोडून विनवणी केली….
नाईक,माझी आजवरची सेवा चाकरी रुजू धरून एक डाव या खंडोजीला माफी करा.
या पोरांन आजवर जीवावरच्या कामगिन्या आपल्या सोबत केल्या आहेत.
अशीही यशवंतमाचीसुध्दा स्वराज्यात सामील झाली असताना त्याला इतकी भयानक शिक्षा कशासाठी…?
कशासाठी……आज खंडोजीला माफ केले तर हजारो हेर जे स्वराज्यात फिरत आहेत ते सुध्दा स्वार्थापोटी संसार थाटून बसतील वस्ताद काका.
साधारण माणसांचे आयुष्य वेगळे आणि स्वराज्याचे हेर खाते वेगळे आहे हे तुम्ही जाणता.इये उठता बसता मरणाशी सामना करत आपण जगतो…आणि आपल्या मुळे महाराष्ट्राची प्रजा आज सुखात आहे.
महाराजांची शिस्त,त्यांची शिकवण….त्यांचा त्याग डोळ्यासमोर आणा काका ..तो एका पारड्यात टाका आणि खंडोजीचा गुन्हा …कोणाचे पारडे जड होईल तुम्हीच ठरवा.
खंडोजीच्या वैयक्तिक सुखासाठी कित्येक मावळे तलवारीच्या घावाखाली मरुन गेली.
ज्या शिर्क्यांच्या मुजोरीने आदिलशाही महाराजांना कमी लेखत होती त्या यशवंतमाचीची महत्त्वकांक्षी मोहीम आपण खंडोजी ला दिली आणि घात करून बसलो.
आज रायगड परिसरात अनेक स्वकीय राज्ये स्वराज्यात नाहीत….एका
यशवंतमाचीला जिंकायला इतका वेळ तर मग इतर राज्यांचे कसे होईल…
महाराजांच्या डोक्यात दक्षिण-दिग्विजय थैमान घालत आहे. आणि इकडे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या दिव्याखाली अंधार,
हा ठपका महाराजांच्यावर येतो काका…देशाचा विचार करा..म्हणजे वैयक्तिक !
खंडोजीवरील तुमचे प्रेम कुठे आहे समजेल…..
बहिर्जी नाईकांची नाकपुडी रागाने फुलली होती.
पाठमोरे उभे राहून ते भरल्या डोळ्याने सांगत होते..!
खंडोजीवर साऱ्यांचे प्रेम होते.
मनमिळावू स्वभाव कुस्तीत-हत्यारे चालवण्यात पटाईत…महाराजांच्यावर अढळ श्रद्धा या गुणामुळे तो सर्वांच्या मनात बसला होता. पण,असा योद्धा एका स्त्री साठी असा का वागु शकतो याचे कोडे सर्वाना पडले होते.
त्याला मृत्युदंडाची शिक्षा देऊनही महाराज गप्प का होते हे कोडे उलगडत नव्हते…कदाचित दक्षिण दिग्विजयाच्या तयारीमुळे त्यांना वेळ नसेल…..।
वस्ताद काका मात्र हुंदके देत देत सारे आठवत होते.
खंडोजीला टकमक टोकावर आणला गेला होता….
टकमकाखालून थंडगार वारे वर येत होते.
पहाटेच्या गर्द शांततेत सारे स्वराज्य झोपी गेले होते मात्र स्वराज्यासाठी
आहोरात्र जगलेला पण कर्तव्यात चुकलेला एक हेर आता मरणाच्या दारात उभा होता…!
वस्ताद काकांनी डोळे पुसत त्याला धरून आणलेल्या हशमाना खून केली…. एक क्षण. दुसरा क्षण…..खंडोजीला टकमक टोकावरून खाली ढकलून दिले गेले….
क्रमशः...
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे. यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे. यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल. धन्यवाद आपला मित्र शिवभक्त विनोद जाधव माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. https://www.facebook.com/mhkharakuraitihas
फॉलोअर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...

-
*🚩 बाजींद भाग - ४४ ⚔️* * ▶ बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला …* * कोण र तू .. ?* * हिकड मरायला प...
-
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी 📜 ⚔ अग्निदिव्य लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार __ 📜 ⚔ 🗡 भाग - 7⃣ 📜 ...
-
शंभू चरित्रं भाग ३६ ( वाचा आणि शेअरं करा ) औरंगजेबानं आदिलशाही जिंकली , कुतूबशाही ताब्यात घेतली , आणि मग ! औरंगजेबा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा