*🚩 बाजींद भाग - ४४ ⚔️*
*▶बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला…*
*कोण र तू..?*
*हिकड मरायला पण कोण फिरकत नाय, आणि तू भर पावसात हित काय करतोय?*
*बाजीराव या आकस्मित प्रश्नाने भानावर आला..तो बोलू लागला..*
*मी पलूस चा आहे मामा…बहिर्जी नाईकांच्या समाधीच्या दर्शनाला आलो होतो. मिलिटरी मध्ये असतो देशसेवेसाठी..!*
*पण तुम्ही कोण…तुम्ही काय करताय इतक्या पावसात इकडे ?*
*बाजीराव च्या त्या प्रश्नाने तो म्हातारा उत्तरत्रा…*
*आर मी धनगर हाय…असतो शेळ्या मेंद्या घेऊन डोंगर दर्यात.*
*किसन नाव माज……*
*गड्या, लरय नवाल वाटलं…हयात गेली बानुरगडावर येतुय…पण बहिर्जी नाईकांच्या दर्शनाला येणारे लय कमी जण असत्यात..बाकी सगळी टिंगल टवाळकी करणारीच जास्त येत्यात…बर वाटलं….!*
*बाजीराव बोलू लागला….*
*मामा…तुम्हाला बहिर्जी नाईक यांच्याबद्दल काय माहिती आहे ?*
*असेल तर मला सांगाल..?*
*बाजीराव च्या डोळ्यात बहिर्जीच्या विषयी इतकी भूक त्या किसन धनगराला दिसली आणि तो मोठ्या आनंदाने त्याला बोलू लागला….*
*गड्या….बहिर्जी अस उभ्या उभी नाय समजायचं तुला, आम्हालाबी एवढ माहित नाय..पर जेवढ हाय तेव्हढ मातुर तुला सांगतो…लय मोठी कहाणी हाय ..*
*यावर बाजीराव बोलला…*
*मामा…सारी रात्र इथे थांबायला तयार आहे..काय माहिती असेल तुम्हाला तर सांगा मला……मला खूप तहान आहे त्यांना जाणून घ्यायची.*
*मोठा श्वास घेऊन किसन धनगर म्हणाला…..चल….त्या दगडावर बसू…*
*ते दोघेही समोर असलेल्या दगडावर बसले…*
*▶मला आजवर ही कहाणी सांग म्हणणारा कोणी भेटला नव्हता पोरा….मला वाटायचं की मी ही कहाणी कोणाला न सांगताच मरतोय की काय ?*
*पण.डइचारल्या शिवाय पण कोणाला ही कहाणी सांगितली तर त्याचा काय उपयोग नाही…..मला वाटतंय तुला देवानच धाडलय माज्याकड….*
*पोरा…माज वय ८० च्या वर झालंय…आम्ही मूळ हितल नाय…आमचा मूळ माणूस रायगड च्या डोंगरकपारीत रहात व्हता…..ज्याच्या आयुष्यात बहिर्जी नाईक आले आणि आमच्या कुळीच सोन झाल….*
*आमची ही १३ वी पिढी हाय…आजवर नाईकांना सोडून आम्ही राहिलो नाय..आजपण या समाधी भवतीच माझा जीव घुटमाळतोय र…..*
*सखाराम धनगर….आमचा मूळपुरुष …*
*आमच्या साऱ्या कुळीत ही कथा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सांगितली जाते….आमची कुळी सोडली तर ही कथा कुणाच्या बा ला सुध्दा ठावी नाय……*
*पण, आता माझ्या माग रडणार बी कोण उरल नाय..आणि मनातली ही कहाणीसांगायला त्या मापाचा कोण भेटला बी नाय…..*
*ऐक….मी तुला बहिर्जी नाईक आणि माझ्या मूळवंशज सखाराम च्या*
*आयुश्यातली ही कथा सांगतोय…*
*आणि रायगड च्या काळजात वसलेल्या धनगरवाडीच्या सखाराम ची कथा त्याचा १३ वा वंशज किसन धनगर भारतीय गुप्तहेर खात्याचा अधिकारी बाजीराव जाधवला सांगू लागला होता…….*
*▶बाजिंद…बाजिंद ….*
*मामा….सांगा पुढ काय झाल….?*
*वस्ताद काका व सखाराम सारे जण बाजिंद च्या जंगलात आले होते का ?खंडोजी कुठे गेला यावेळी ?*
*खंडोजी म्हणून बहिर्जी नाईकांनी सखाराम ला मदत का केली ?*
*राजे येसाजीराव आणि सावित्री कुठे गेली ?*
*बाजिंद चे पुढे काय झाले …?*
*सांगा मामा मला….*
*किसन धनगर उठला आणि म्हणाला…*
*चल पोरा….नाईकांच्या समाधीला दिवा लावूया…पुढची कथा दिवेलागणीनंतर सांगतो..उठ…!*
.
.
👇
*क्रमशः...........!*
*👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.🚩*
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*संदर्भ*
*बाजींद कांदबरी - लेखक पै.गणेश मानुगडे, © राजमुद्रा चैनल*
*✍ लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.*
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||*
*|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा