फॉलोअर

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

बाजींद भाग - ४१

 


बाजींद भाग - ४१ ⚔️

▶सखाराम व त्याचे सवंगडी वस्ताद काकासोबत त्या भयानक जंगलात प्रवेशले होते, आणि त्याना पाहताच जंगलात पशु पक्षांनी कोलाहल माजवला होता.

कोणाला समजेना नक्की काय होत आहे…पण, वस्ताद काकांनी ताडले की आपण कुठे आलो आहोत…

त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले..

बाजींद…बाजींद…….

ई.सन.२०१३ बानुरगड, सांगली

तहान भक विसरून बाजीराव ही चित्तथरारक कथा किसन धनगराच्या तोंडून ऐकत होता.

एव्हाना जवळपास सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. आकाशात पावसाळी ढगांची गर्दी कमी झाली होती, मात्र श्रावणातील तुरळक सारी मात्र अधून मधून किल्ले बाणुरगडावर तुषार शिंपडत होत्या.

बाजीराव जाधव हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलस गावचा एक तिशीच्या वयाचा युवक. अखंड देशसेवा करणाऱ्या जाधव घराण्यात त्याचा जन्म झाला.

वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपले.१९९९ साली कारगिल च्या लढाईत त्याने त्याच्या पराक्रमाची चणूक दाखवली. त्याच्या या कामगिरीवर खश होऊन भारत सरकारने त्याला शौर्य पदक दिले आणि वरिष्ठ पदावर नेमणूक केली.

▶चौकस बुद्धी, धाडस, शोर्य याच्या जीवावर बाजीराव भारतीय गुप्तहेर खाते ‘रॉ’ मध्ये रुजू झाला.

देशाबाहेरील अनेक गुप्त कारवाया करून देशाचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट्य होते.

कारगिल युद्धानंतर त्याने बाहेरील देशात गुप्तपणे वावरून अनेक गुप्त बातम्या भारतीय सेनेला पुरवल्या होत्या.

साधारण सहा महिन्यापूर्वीची ही गोष्ट असेल. अमेरिकेत जागतिक सुरक्षा परिषद आयोजीत करण्यात आली होती.

देशोदेशीचे संरक्षण सेवेतील अधिकारी या परिषदेला उपस्थित होते. बाजीराव जाधव यालाही भारतीय सेनेतर्फे जाण्याचे आमंत्रण मिळाले होते.

यावेळी बाजीराव गुप्तहेर म्हणून नव्हे तर भारतीय सैन्यदलाचा अधिकारी म्हणून इथे आला होता.

अनेक देशांचे अनेक अधिकारी तिथे भेटले, जागतिक सुरक्षा आणि दहशदवाद या मुद्दयावर अनेकांची भाषणे झाली.

परिषद संपली आणि बाजीराव आपल्या कारमधून विमानतळाकडे जाणार इतक्यात एका सुंदर परदेशी मुलगीने त्याला थांबवले.

तीला पाहताच बाजीराव आनंदीत झाला…तिला उद्देशून तो इंग्रजीत बोलला, त्याचा मराठी अनुवाद…

‘नमस्ते….जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची अधिकारी साराह चक्क
माझ्यासमोर …..’
बाजीराव च्या या प्रश्नाला हसतपणे स्वीकारत ती म्हणाली…

‘नमस्ते..अरे मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे ,तुला पहिले आणि राहवले नाही म्हणून इथे आले…!

साराह आणि बाजीराव हे ३ वर्षापूर्वीच इस्त्राईल येथे भेटले होते.

साराह ही इस्त्राईल गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ ची एक तरुण तडफदार अधिकारी होय.

मोसाद एक अशी गुप्तहेर संघटना जिच्या हिटलिस्ट वर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देव सुध्दा त्याला वाचवू शकत नव्हता असे म्हटले जात असे.

एका तुटपुंज्या देशाची ही छोटीशी गुप्तहेर संघटना असामान्य कर्तुत्व, अलोकिक बुद्धिचातुर्य आणि समुद्राएवढ्या धाडसाने आपल्या छोट्याश्या देशाचे गेली पन्नास वर्षे रक्षण करते आणि सतत जिंकते.

जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ठ गुप्तहेर संघटना कोणती..तर डोळे झाकून उत्तर येते मोसाद.

▶ज्यु धर्मीय लोकांची ही तुफानी गुप्तहेर संघटना जगातील सर्वे देशात काम करते, तिथे लपलेल्या त्यांच्या देशाच्या शत्रूला स्वत शोधते आणि त्यांच्या देशातून आपल्या देशात गुप्तपणे आणते आणि देशात आणून त्याला शिक्षा देते. आणि शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला समजते की अमुक अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली..इतकी खतरनाक ही संगठना

अश्या गुप्तहेर संघटनेत भारतीय सेनेमार्फत १० दिवसांच्या कोर्ससाठी बाजीराव ३ वर्षापूर्वी इस्त्राईल मध्ये साराह ला भेटला.

(मित्रांनो आता खरी मज्या चालू होणार..बहिर्जी नाईकांची किमया)
.
.
👇
क्रमशः...........!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

संदर्भ :
बाजींद कांदबरी - लेखक पै.गणेश मानुगडे,
© राजमुद्रा चैनल

✍ लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

बाजींद भाग - ४०

 


बाजींद भाग - ४० ⚔️

▶ते मटकन खालीच बसले …..आता मात्र त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता…….!

मनात काहीतरी विचारांचा गोंधळ सुरु झाला त्यांच्या आणि त्यांनी सोबत आणलेल्या शिलेदारांपैकी पाच जणांना आज्ञा केली …..गड्यानो तुम्ही त्वरित रायगड गाठा.

महाराजाच्या खासगीत माझा निरोप पोच करा..

असे म्हणत त्यांनी एकाच्या कानात एक निरोप सांगून त्या पाच जणांना
रायगडी रवाना केले.

आणि सखाराम कडे पाहत तो बोलला…
सखाराम, तुम्हाला ज्या महादेवाच्या मंदिरात सावित्री भेटली तिथे मला घेऊन जाऊ शकाल ?

जी..जी..होय …इथून ४-५ कोसावरच असेल ते मंदिर…चला मी नेतो.

असे बोलताच वस्ताद काकांनी सोबत उरलेल्या पाच धारकांची दोन तुकडीत विभागणी केली.

२ जणांनी इथेच थांबा…सोबत आणलेला भगवा ध्वज एका काठीला बांधून इथेच थांबा..रायगडावरून काही लोक आले तर त्यांना समजायला सोपे जाईल.

आणि उरलेले दोघे….

तुम्ही आमच्यासोबत चला..

▶असे म्हणत सखाराम व त्याचे सवंगडी, वस्ताद काका आणि दोन धारकरी असे सात जण त्या पडक्या महादेवाच्या मंदिराकडे जाऊ लागले.

मजल दरमजल करत पठारी भाग संपवून सारे त्या भयान जंगलात घुसले.

अनेक वळणे, ओढे नाले ओलांडून जेव्हा या जंगलात प्रवेश झाला तेव्हा ते जंगल पाहताच वस्ताद काका मात्र पुरते घाबरून गेले होते….त्यांची अक्षरशः बोबडी वळण्याची वेळ आली होती….

ते भयकंपित आवाजात बोलले…

सखाराम…..किती दिवस होता तुम्ही या जंगलात ?
आम्ही पुरा एक दिवस एक रात्र याच जंगलात होतो…
काय…?

वस्ताद काका आश्चर्याने बोलले…

वस्ताद काकांची ती अवस्था पाहून सखाराम म्हणाला…

काका, नेमक काय झालंय तुमास्नी…?

आमालाबी कळूदे…

अरे, येड्यानो जिथे तुम्ही मला आणले आहे ते साध सुध जंगल नाही……

हेच ते ‘बाजिंद’ चे जंगल आहे…ज्याला पुरी रायगड पंचक्रोशी स्वप्नात सुध्दा घाबरते.

आणि, जो तुम्हाला खंडोजी म्हणून भेटला……
तो..तो..खंडोजी नव्हताच……

काय..?

▶सखाराम ने आश्चर्याने डोळे विस्फारत विचारले…

ख..खंडोजी नव्हता…….

मग कोण हुता काका ?

अतिशय गंभीर चेहरा करत वस्ताद काका बोलले…

बहिर्जी नाईक

तुमच्यासोबत चालत येऊन, तुम्हाला रायगडापर्यंत पोहचवून, आम्हालाही अप्रत्यक्ष संदेश देणारे बहिर्जी नाईकच होते.

उंबर फुल परवली चा शब्द या साली वापरायचा अधिकार महाराज, नाईक या दोघांनाच आहे.

दर साली असे गुप्त शब्द बदलले जातात, यात बदल सुध्दा केवळ बहिर्जीच करतात.

लय पुण्यवान हायसा तुम्ही, आमास्नी वर्ष वर्ष भर ज्यांचे दर्शन दुर्मिळ होते असे आमचे नव्हे तर महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे हेरप्रमुख बहिर्जी नाईक तुमच्यासोबत चालत होते इतके दिवस…

पण, मला प्रश्न असा पडला आहे की नाईकांनी तुम्हाला खंडोजी ची कथा कशी काय सांगितली असावी ?

मला, आता याचा उलघडा करायलाच हवा …

म्हणून मला ते मंदिर दाखवा लौकर

असे म्हणून ते सारे पुढे जाताच..
जंगलातील पशु पक्षी किडा कीटकांनी सार्या जंगलात कल्लोळ माजवला.

जंगली जनावरांचे आवाज अतितीव्र होऊ लागले होते ….

वस्ताद काकांच्या तोंडून शब्द बाहेर पडला….
.
.
👇
क्रमशः...........!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

संदर्भ :
बाजींद कांदबरी - लेखक पै.गणेश मानुगडे,
© राजमुद्रा चैनल

✍ लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

बाजींद भाग - ४३

 



बाजींद भाग - ४३ ⚔️
▶साराह बोलत होती आणि बाजीराव ऐकत होता.
बाजीराव साराह चा निरोप घेऊन विमानतळावर आला.
प्रवासात डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार घुमत होता…बहिर्जी.
किती मूर्ख आहोत आपण आणि आपले लोक.
साऱ्या जगाला घाबरून सोडणारी मोसाद ही मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशदवाद गेली ५० वर्षे सहन करतो आणि सतत अपयशी ठरतो…त्याच्या डोक्यात आग लागली होती.
तो दिल्लीत आला.
परिषदेतील सर्व बाबी त्यांनी अधिकार्यांना सांगून ३ महिन्यांची रजा मागून घेतली.
दिल्लीत बऱ्याच ग्रंथालयात त्याने बहिर्जी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते का पहिल्री, पण जेमतेम माहितीशिवाय काही हाती लागले नाही.
३ महिन्यांच्या सुट्टीवर तो त्याच्या जन्मगावी पलूस येथे आला.
घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची.
▶घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची. बानूरगड ….
जे पल्रूस पासून वीस-बावीस किलोमीटर वर आहे तो प्राचीन किल्ला.
त्याने सकाळीच बुलेट ला किक मारली आणि थेट बाणूरगड गाठला.
वासरू जसे गाईसाठी कासावीस होते, अगदी तशीच मनाची अवस्था होती बाजीरावची. त्याला कधी एकदा जातो आणि बहिर्जी नाईकांच्या समाधीवर डोके टेकवतो असे झाले होते.
गडाखाली गाडी लावून तो वर चढू लागला.
फारसा उंच नसल्याने काही वेळातच तो गडावर आला.
तिथे समोर भगव्या रंगाने रंगवत्रेला समाधीचा चबुतरा त्याने पहिले आणि धावतच तिथे जाऊन त्याने आपले डोके समाधीवर टेकवले…
असे वाटले की या दगडी चिरेत लपलेल्या अस्थिचे आणि माझे जन्मोजन्मीचे नाते असावे…
त्याने गुडघे टेकले आणि तिथली माती कपाळावर लावली आणि धाय मोकलून रडू लागला…
त्याचे अश्रू गडाच्या मातीत पडते आणि आभाळात ढगांनी गर्दी केली.
जणू त्याच्या दुखात सारा निसर्गच सामील झाला…..सरसर सरी कोसळू लागल्या आणि त्या पावसात बेभान होऊन बाजीराव रडत होता…..!
बहिर्जी नाईक यांची समाधी माझ्या इतक्या जवळची आणि मला त्यांच्याबध्द्लन
काही माहिती नसावे ….
पाऊस थांबला, मात्र बाजीराव चे हुंदके काही कमी होत नव्हते.
तो मनाशीच बोलत होता,किती कमनशिबी आहे मी.
श्रावणातील उन पावसाचा खेळ सुरु होता,क्षणात रिमझिम पाऊस आमी क्षणात ऊन पडत होते.
बाजीराव ने सारा गड पालथा घातला. काही केल्या तिथून त्याचा पाय निघत नव्हता.
सूर्य माथ्यावर आला आणि हताश मनाने बाजीराव गुडघे टेकून समाधीपुढे बसला होता…
▶तितक्यात पाठीमागून कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला..
दचकून तो सावध झाला आणि उठून मागे पाहू लागला…
मागे वयाची सत्तर-ऐंशी ओलांडलेले एक वयोवृध्द गृहस्थ उभे होते.
धिप्पाड देह, अंगावर मळकटलेले कपडे, गळ्यात चांदीची पेटी लटकत
होतो, कपाळावर भंडारा लावला होता, डोक्यावर भगवा फेटा बांधला होता, काळेभोर डोळे, पायात जाड कोल्हापुरी पायताण, हातात कानाबरोबर उंचीची काठी आणि सिंहासारखे आयाळ असलेली पांढरी दाढी….
साक्षात काळभैरव भासत होता…
.
.
👇
क्रमशः...........!
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.🚩
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
संदर्भ :
बाजींद कांदबरी - लेखक पै.गणेश मानुगडे,
© राजमुद्रा चैनल
✍ लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...