🚩 स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु 🚩
राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे २४ आॅगस्ट १९०८ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात राजगुरू आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले.
लहानपणी म्हणजे वयाच्या १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले.आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणातच जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती,आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री.हनुमान आखाड्यात
व्यायाम विशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशी येथे परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला ,आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणामधे वावरताना राजगुंरुमधील क्रांतिकारकं घडत गेला.कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू एकत्र आले .एकत्र आल्यानंतर लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असताना त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांती विषयक तसेच रशियाच्या क्रांती विषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक मंडळ स्थापन
केले .युवकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे , साम्यवादा विरुद्ध लढा देणे आणि अस्पृश्यता निवारण ही या सभेची उद्दिष्ट होती. चंद्र्शेखर आणि राजगुरू यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६चा आकडा हेच या गुणांचे फलित होते,आणि या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणे विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार व आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की,आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती.
आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूं यांच्याजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिववर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने वर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले,आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती.
राजगुरू यांची सहनशीलता दाखवणारे प्रसंग अनेक होते.
एकदा राजगुरु भट्टीतल्या निखाऱ्यांवर आपल्या क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखाऱ्यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला तरच मला कौतुक वाटेल', असे म्हटले. आपल्या सहनशीलते विषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई गरम करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?'' राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली', असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.
कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकाऱ्यांची नावे कधीच सांगितली नाहीत. एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या कडक उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत.
स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणार्या राजगुरूना फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.''
२३ मार्च १९३१ या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरु,आणि सुखदेव
यांना फाशी देण्यात आले. हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले.स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे हे थोर क्रांतिकारक होते.
🙏 🙏
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे. यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे. यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल. धन्यवाद आपला मित्र शिवभक्त विनोद जाधव माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. https://www.facebook.com/mhkharakuraitihas
फॉलोअर
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
🚩 स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु 🚩
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...
-
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग ७७ सोपारा (Sopara) पोस्तसांभार :: विजय सरडे प्राचीन भारतातील एक समृद्ध आंतरराष्ट्रीय...
-
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी 📜 ⚔ अग्निदिव्य लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार __ 📜 ⚔ 🗡 भाग - 7⃣ 📜 ...
-
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग ९५ वासिष्ठीपुत्र पुलुमावी वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा