फॉलोअर

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

🚩 बाजींद भाग - ३२ ⚔️

 🚩  बाजींद भाग - ३२ ⚔️

▶महाराज हे लोक टकमक खालच्या धनगरवाडीचे लोक…हा सखाराम गावाचा कारभारी…!

बहिर्जी नाईकांच्या खासगीतील परवलीच्या शब्दामुळे त्याना आपल्या पर्यंत आणले आहे…!

आणि वस्ताद काकांनी महाराजांच्या कानी टकमक टोक आणि खालच्या गावाची व्यथा सांगितली…..

क्षणभर विचार केला आणि महाराज बोलू लागले….

▶वस्ताद काका ..रायगड स्वराज्याची राजधानी.

साऱ्या महाराष्ट्रात रामराज्य आणायची स्वप्ने आपण पाहतोय आणि राजधानीखालची प्रजाच दुखी आहे
हे बरे नव्हे ..बरे झाले नाईक यांना भेटले आणि त्यांनी ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली नाहीतर
ही आमची गरीब रयत इथवर येऊ तरी शकली असती का ?

काका…आजपासून टकमक चा राबता बंद करा.

गडावरुन एकालाही कडेलोट करता कामा नाही आमची आज्ञा असल्याशिवाय.

न्यायाधीशांनी जर देहदंड सुनावला तर अंधारकोठडीत ठेवा मात्र कडेलोट करू नये.

समोर बसलेल्या वाकीलान्च्याकडे पाहत महाराज बोलले….पंत आजच एक आज्ञापत्र तयार करा आणि
स्वराज्यातील सर्व गडकोटावर पाठवून द्यावे …जर कडेलोट शिक्षा दिली तर सरकारी खर्चातून खाली
गेलीली सर्व मृत शरीरे उचलून त्या त्या नातेवाईकाना द्यावी अन्यथा कोणीही कडेलोट न करता दुसरा
मार्ग वापरावा आणि आजपासून स्वराज्याच्या राजधानीत टकमक कडेलोटासारखी शिक्षा कायमची बंद
झाली असा आदेश काढावा.

जी महाराज…. असे म्हणत वकिलांनी महाराजांचा हकम कागदावर लिहन त्यावर शिक्कामोर्तब केला..!

▶क्षणभर थांबून महाराज बोलले…..

आता खुश झालात ना ?

सखाराम कडे पाहत महाराज बोलले …..

खुद्द महाराजांच्या बोलण्याने भाम्भेरी उडालेला सखाराम बोलला…….

जी महाराज….महाराज मला न्याव मिळूदे अगर न मिळूदेल तुमास्नी डोळमस्न बघितल..आमच्या
गरिबांच्या जल्माच सोन झाल….आमास्नी आता काय बी नगो……

सखाराम असे बोलताच महाराज म्हणाले….

अरे, तुम्ही तर हिंदवी स्वराज्याची खरी ताकत आहात. तुमच्यासारखी माझी
बहिर्जी, तानाजी, बाजी, मुरारबाजी, शिवा काशीद, असे कितीतरी जण हासत हासत मरणाशी खेळत जगले
म्हणून हे राज्य अवतरले…तुम्ही निर्धास्त गावी जा…आणि वस्ताद काका….यांच्या गावात सरकारी
खर्चातून धान्य, बी-बियाणे, काय हवे नको हे बघितले जाईल.

यांचे नुकसान केवळ आपल्या चुकीमुळे झाले आहे त्याची भरपाई म्हणून हे सर्व आपण करावे….

जी महाराज….असे म्हणत वस्ताद काका मुजरे घालत बाजूला गेले आणि सखाराम ला घेऊन
दरबाराच्या बाहेर पडले……

साक्षात महाराष्ट्राच्या देवाच्या दर्शनाने सखाराम व त्याचे सहकारी अक्षरश रडू लागले होते.

नगारखाना ओलांडून ते चौधे महाराजांच्या दरबारातून बाहेर आले होते…..

हसत हसत वस्ताद काका म्हणाले…..

गड्यानो…..लई नशीबवान हायसा तुमी.
सात जन्मात मिळणार न्हाई एवढ दिल महाराजांनी..आता तुम्ही आणि गावकरी कायमचे सुखी
झालात.

तुमच्या आजवरच्या नुकसानीचा खर्च सरकार देणार आहे. इथून पुढ गावात काही पण गरज लागली तर ।
सरकारी कोतवाल, हवालदार पाटील स्वता येऊन मदत करणार असा आदेश आहे माझ्याकडे ज्यावर
महाराजांची सही आहे……

सखाराम व त्याच्या साथीदारांना मनस्वी आनंदी झाला ….

.
.
👇
क्रमशः...........!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

संदर्भ  
बाजींद कांदबरी - लेखक पै.गणेश मानुगडे, © राजमुद्रा चैनल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...