फॉलोअर

बुधवार, १ जुलै, २०१५

शंभू चरित्रं भाग ३५



शंभू चरित्रं 
 भाग ३५
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं
औरंगजेबानी आपल्या दरबारीयांना वि
किया जाय?" आणि सगळे सरदारं
म्हणाले..."हुजूरं! वापस लौट चलते
है!" आणि अखेरं
औरंगजेबाला महाराष्ट्र
सोडवा लागला. संभाजी राजांच्यावर
आक्रमण करायची वाट
त्यानी बदलली, माघारं
घेतली आणि गेला आदिलशाहीवरं.
"आदिलशाही"
अवघ्या सहा महिन्यांत त्यानं
जिंकली. मग वळला "कुतूबशाहीकडं",
"गोवळकोंडा" त्यानं
अवघ्या एका महिन्यात जिंकलं. अरे!
आदिलशाही जिंकायला सहा महिने
लागतात, गोवळकोंडा जिंकायला एक
महिना पुरतो आणि संभाजी राजांच
"स्वराज्यं" जिंकायला त्याला नऊ
वर्ष शक्यं होत नाही. हे शौर्य
कुणाचं?...हा पराक्रम कुणाचा?...हे
धाडसं कुणाचं?...हे साहस
कुणाचं?..."सर्जा संभाजींच"
अरे! खजिना वाढवलाच नाही,
अफाट..अफाट ताकदीनं संवर्धीत
केलाय,
मराठी फौजा शिवरायांच्या काळात
जेवढ्या होत्या त्याच्या "पाचपट-
सहापट" वाढवल्यात. अरे! पाच
जहाज बांधणीचे कारखाने काढलेत,
'कुडाळ-डिचोळीला' दारूगोळ्याचे
कारखाने उभारंलेत संभाजी राजांनी.
साडेपाच हजार गलबतं दर्यात
तरंगतेय दर्यात. अरे! "सरंखेल
कान्होजी आंग्रा", "सरंखेल
दौलतखान दर्यासारंग" बेपनाह
हुकुमत गाजवतायत बेपनाह. काहीच
वर्षांपूर्वी त्या "ताज हॉटेल" वर
हल्ला झाला. समुद्रातून
अतिरेकी आले. ३५०
वर्षापूर्वी आपल्या संभाजी राजांनी
ठेवलय..."महाराष
्ट्राला धोका जमिनीवरनं नाही,
महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं
आहे". हे त्या राजानं सांगितलय. अरे!
दर्यावरं बेपनाह हुकुमत गाजवलिये
राजांनी बेपनाह. साडेपाच हजार
गलबतं दर्यात आहेत. टाप
नाही महाराष्ट्रावरं तीरक्या नजरेनं
कुणी यायची. चाहोबाजूंनी सुरक्षित
ठेवलंय "स्वराज्यं". एक-एक
गडकोट बुलंद बलाढ्य करून ठेवलाय.
शिबंदी अफाट वाढवलीये. माणूस नाय
तसा अफाट जिगरीचा...जिगरबाज!!!
अरे! इवलंस पोरं
सुद्धा संभाजी राजाच्या पराक्रमानं
मोहित झालंय.
स्वराज्यासाठी मारायला उभं
राहिलंय......हा हा "सर्जा संभाजी"
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...