फॉलोअर

बुधवार, १३ मे, २०१५

शंभू चरित्रं भाग २८



शंभू चरित्रं भाग २८
 
(वाचा आणि शेअरं करा)
औरंगजेबानं जाळं टाकलं,
"
जंजीऱ्याच्या सिद्धीला"
औरंगाजेबानी उकसवलं..."मराठ्यांवर
चाल करा",
पोर्तुगीजांना फितवलं..."चालून
जा मराठ्यांवर", इंग्रज
हाताशी धरंले..."आक्रमणं
करा मराठ्यांवर"
पोर्तुगीज, इंग्रज, मोघल...बस्सं!!!
एक नाही,दोन नाही तब्बल बारा गडं
उभारल्या स्वराज्याच्या विरोधात,
आणि तब्बल बारा गड्यांवर
निखराची पंजेफाड करत
"
सर्जा संभाजी राजा" झुंजत
राहिला...झुंजत राहिला...बस्सं!!!
औरंगजेबाच्या चेतावणीमुळं सिद्धीनं
हैदोस मांडला. जंजीऱ्यातला सिद्धी,
"
राम पाटलानं" बांधलेला "जंजिरा"
आदिलशाहीकडं आला आणि मग!
सिद्धीकडं पोचला.
आता हा सिद्धी म्हणजे "मुजोरं"
आणि "माजोरं" झालेला. अरे!
जंजीऱ्याला बेलाग संरक्षण दर्याचं,
पोहोचणं कठीण तिथं.
"
शिवाजी महाराजांनी" कैक
वेळा प्रयत्नं केला, "जिथं शिवराय
तिथं विजय" पण! "जंजिरा"
त्याला अपवाद ठरला.
जंजिरा जिंकता आला नाही.
त्याच्या भोवताली..."रोह्याची खाडी,
दलदलीचा प्रदेश, आणि समुद्राचं
बेलाग संरक्षण". जंजिरा जिंकणं
सोपं न्हवतं.
हे हाप्शी सिद्धी जंजीऱ्यातून बाहेरं
पडायचे,
कटावरच्या गावातल्या बायका बाटव
त्यांना समुद्रांत भरं तरवावरं आब्रू
लुटत सोडायचे, आक्रोश
किंकाळ्या तिथं वाऱ्यावरं
भिजायच्या. माणसांना पकडायचे
त्यांचे नाक, कान कापायचे,
'
रक्ताळायचा'...'रक्ताळायचा' दर्या.
अरे!
किती बायका बाटवल्या असतील???..
माणसं कापली असतील???...किती?
किती? अकांत...अकांत मांडलाय.
हि माणसं
एकेदिवशी आली संभाजीकडं..."रा
जं!...राजं!,
ह्यो सिद्धी माती करतूया पारं, बाया-
बापड्या पळवतूया, भोगतूया,
लुटतूया, माणसं बाटवतूया"
आणि कडाडला छावा...!!! "आमच्याच
मातीत येऊन आमचीच माती,
त्या सिद्धीची एकदा माती केलीच
पाहिजे! खेळू जंजीऱ्यावरं
रक्ताची रंगपंचमी"
आणि निघाला "सर्जा" जंजीऱ्यावरं
पण! लढाया बुद्धीनं जिंकणारे
"
संभाजी" दंडराजपुरला आले,
दंडराजपुरी ताब्यात घेतली. पण!
त्याचं वेळी बघितलं "जंजिरा" बाहेरून
जिंकता येणारं नाही. "जंजिरा"
घ्यायचा असेल तरं त्याच्या पोटात
हात आत घालूनचं कोतळा बाहेरं
काढला पाहिजे.
आणि संभाजींची विलक्षण बुद्धी,
विलक्षण चाल खेळू लागली.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...