फॉलोअर

बुधवार, १३ मे, २०१५

शंभू चरित्रं भाग २९




शंभू चरित्रं भाग २९
(वाचा आणि शेअरं करा)
"कोंडाजी फर्जन"
यांना संभाजी राजांनी बोलावून घेतलं.
"तेज, स्वामीनिष्ठ,
तलवारीच्या डावाइतकाच
गनिमी काव्यातही माहीरं असलेला"
आणि संभाजी राजांनी त्याच्या काना
आपला डाव सांगितला,
आणि कोंडाजी आपल्या काही सोबत्
निघाला. सरळं आला जंजीऱ्यावरं,
"सिद्धी खैरत", "सिद्धी कासम
खानापुढं" सांगू लागला..."हुजूरं!
आपली चाकरी करावी म्हणतो"......"
हाँ से आए?"......"संभाजी राजा के
पास से"......"अरे! मराठें तर फुटत
नाहीत, मरतील पण! फुटत नाहीत..तू
कसा आला?"......"हुजूरं!
तुमच्या तावडीतनं 'संभाजी राजे'
वाचणारं आहेत का?,
त्या संभाजी राजांच्या बरोबर
मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं
काय वाईट! म्हणून आलो हुजूरं!
द्या चाकरी..." आणि सिद्धी खैरत
खानानं त्याला चाकरी दिली.
कोंडाजीनं तिथंली एक
बटकीसुद्धा खरेदी केली, संसार
थाटला आणि कुटुंब कबिल्यासह
सिद्धीची सेवा करू लागला पण! उरात
सलं वेगळाच होता, काळजात डाव
वेगळाच!, आपल्या धन्यानं
दिलेला डाव!, आपल्या धन्याने
दिलेला शब्दं...बस्सं!!!
कोंडाजीची नजरं जंजीऱ्यावरं भीरंभीरु
लागली. "संभाजी राजांचा आदेश
होता, त्याच्या पोटात हात घालूनचं
कोतळा बाहेरं काढायचा"
आणि कोंडाजीचा हात
जंजीऱ्याच्या पोटात फिरू लागला.
डाव असा की,"जंजीऱ्यावरं
असणारी दारू-गोळ्याची कोठारंच
उडवून द्यायची. बस्सं!!!
असा धमाका की जंजीरा डचमळंला पा
दर्यात, विसर्जीतचं झाला पाहिजे
दर्यात "जंजीरा" आणि कोंडाजीनं
दारू-गोळ्याची कोठारं हेरली.
सगळ्या सोबत्यांना डाव समजावून
सांगितला, दिवस ठरला. दारू-
गोळ्याच्या कोठाराच्या बाहेरं
सुरुंगदेखील पेरले.
वातान्या काढल्या आणि जंजीऱ्याच्
तारवं तयारं ठेवली. काही माणसं
तारवावरं, बस्सं!!! हिकडं वातानं
पेटवायची आणि तटबंदीवरूनं सरळं
तारवावरं
उड्या घ्यायच्या आणि सपा-सपं
ओलवी चालत किनाऱ्यावरं..."धडाम-
धूम" जंजीरा विसर्जीतचं
झाला पाहिजे.
ठरलं! काही साथीदारं आधीच दर्यात
तारवा घेऊन तयारं राहिले.
आता शेवटचा हात फिरवायचा, बस्सं!
फक्तं वातानं पेटवायचीये.
कोंडाजी घरातनं गडबडीनं निघाला,
अन
त्याचंवेळी त्याची बायको म्हणाली,
"मी पण येते"..."मी पण येते
तुमच्या बरोबर" वक्त
वाया घालवायचा न्हवता, एक चूकं
सुद्धा महागात पडणारं होती.
तिला समजवायचा प्रयत्नं
कोंडाजी करत राहिला पण व्यर्थ!
अखेरं कोंडाजी म्हणाला.."चल!,
तूही चल माझ्या बरोबर"...कोंडाज
ीची बायको जायला निघाली तशी तिची
येते बरोबर"...कोंडाज
ीची बायको म्हणाली,"ती माझ्याशिवा
राहिलीचं नाही तीलाही घ्या ना.."
कोंडाजीकडं वक्त न्हवता एक पलं,
एक क्षण..क्षण महत्वाचा.
कोंडाजी म्हणाला, "चल ठीके..चल
तूही चल लवकर"
तशी ती दासी म्हणाली फक्तं मी माझे
कपडे घेऊन येते काही क्षणांत,
आणि दासी जी कपडे
घ्यायला म्हणून
गेली ती येताना सिद्धीलाचं बरोबर
घेऊन आली....
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...