संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
सिमुक सातवाहन ,हाल सातवाहन,मेघस्वाती
सिमुक हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होय. याने इ.स.पू. २३० ते इ.स.पू. २०७ या कालखंडात प्रतिष्ठान व माळवा या प्रदेशांत राज्य केले. पुराणांमध्ये सिशुक, तसेच सिंधुक या नावांनीही याचे उल्लेख आढळतात[ संदर्भ हवा ].
सिमुकानंतर त्याचा भाऊ कृष्ण सत्तेवर (राज्यकाळ: इ.स.पू. २०७ - इ.स.पू. १८९) आला. कृष्णाच्या काळात सातवाहनांची सत्ता पश्चिमेस व दक्षिणेस विस्तारली.
हाल सातवाहन
हाल हा सातवाहन साम्राज्याचा सम्राट होता. मत्स्य पुराणानुसार हा सातवाहनांचा १७वा राजा होता[१]. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाहासत्तसई (गाथासप्तशती) नामक काव्यसंग्रहाचा हा रचनाकार असल्याचे मानले जाते
संदर्भ व नोंदी
रायचौधुरी, एच.पी. पॉलिटिकल हिस्टरी ऑफ एन्शियंट इंडिया (इंग्लिश भाषेत). p. ३६१.
मेघस्वाती
मेघस्वाती हा सातवाहन राजवंशातील राजा होता. याचा राज्यकाल इ.स.पू. ५५ ते इ.स.पू. ३७ पर्यंत होता.त्याचे एक नाणे आंध्र येथे सापडले आहे
संदर्भ आणि नोंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा