फॉलोअर

रविवार, १० मे, २०२०

🏰 हिरकणी भाग ८ 🏰

🏰 हिरकणी भाग ८ 🏰

त्यानंतर कितीतरी वेळ मी बोलत होते. त्या दिवशी गडावर आले त्या क्षणांपासून , गडाचे बंद झालेले दरवाजे , घरी एकटा असलेला माझा कान्होबा , गडावरून खाली उतरण्याचे वेडे साहस, ते साहस करताना मला खुणावणारा कान्होबा , गड उतरून घरी घेतलेली धाव, रडता रडता माझ्या छातीला लुचून दुध पिता पिता झोपून गेलेला माझा बाळ, आणि त्यानंतर शांत क्लांत अवस्थेत झोप लागून गेलेली मी, आणि अपराधाचं ओझं बाळगत आज या दरबारात असहाय अवस्थेत उभी असलेली मी सगळे सगळे मी मला जमेल तसं आणि सांगता येईल तसं सांगून खालमानेने उभी राहिले .... शांतपणे .... माझ्या नियतीचा फैसला ऐकण्यासाठी ...!

दरबारात टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती. सर्वांचे कान आता पुढे काय होणार या उत्सुकतेने दाटले असावेत. जो तो पुढे येण्यासाठी एकमेकांना रेटू लागला. महाराज आता काय करणार? आम्हाला काय शिक्षा सुनावणार ? प्रश्न .... प्रश्न ...... प्रश्न.

आणि काही क्षण गेल्यावर तो आवाज पुन्हा त्या दरबारात घुमु लागला.

" आम्ही ... राजे शहाजी व जीजाऊ मांसाहेब यांचे पुत्र व भोसले कुलोत्पन्न अभिषिक्त सम्राट " छत्रपती शिवाजी " ! आमचे आजपर्यंतचे जीवन म्हणजे अगदी दंतकथा वाटाव्यात अशा घटनांच्या मालिकांनी अगदी शिगोशीग भरलेले आहे . आणि त्या सर्व प्रसंगांमध्ये अगदी मुकुटमणी शोभावा असा विचित्र तिढा आज आमच्यासमोर उभा आहे.

काल बहिर्जीनी जेव्हा घडलेल्या या संपूर्ण प्रसंगाची इत्यंभूत बातमी आम्हाला दिली तेव्हापासून आमचे मन एका विचित्र कात्रीत सापडले आहे. एकीकडे आमची कर्तव्यं आणि आम्हीच बनवलेले व स्वतः देखिल कधीही न मोडलेले कायदे आम्हाला साद घालत आहेत तर दुसरीकडे या हिरकणीच्या रूपातील एक आई आमच्यासमोर न्यायाच्या प्रतिक्षेत उभी आहे. पण या दोघांना आम्ही या राजदरबारात उपस्थित केले आहे ते वेगळ्याच कारणाने ..

आम्हाला आजही तो दिवस आठवतो. आमचे वय कदाचीत पंधरा सोळा असेल.

रायरेश्वराच्या पावन मंदिरात आमच्या सारख्या छोट्या मुला वर विश्वास ठेऊन आमचे एक स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वतःचे जीवन देखिल अर्पण करण्याची शपथ घेणारे आमचे सहकारी आजही आम्हाला लख्ख आठवतात. आमचा जीवा, शिवा, येसाजी, तानाजी, दिपाजी, कुडतोजी , बाजी.. सगळे सगळे आठवतात. प्रत्येक क्षणी आठवतात. आम्हाला फक्त आठवत नाहीत तर ...... आठवण देखिल करुन देतात !

कशासाठी घातला आहे आम्ही हा सगळा घाट, कशासाठी लावली आहे वेळोवेळी प्राणांची बाजी, कशासाठी दिली आहे आप्तस्वकीय आणि मित्रांच्या प्राणांची आहुती, कशासाठी त्या औरंग्याशी मांडला आहे आजन्म उभा दावा या सगळ्याची आठवण करुन देतात.

आमचे वडील म्हणजे राजे , उभ्या महाराष्ट्रातील एक वजनदार व नामांकित असामी.

जन्मतःच आम्हाला मिळालेली जहागीरी आणि यावर कंठू शकणारे एक सुखासीन आयुष्य. एक मोह पाडणारं आयुष्य ..... पण ....... पण एकीकडे माझेच रक्ताचे बांधव दुःखाच्या अग्नीत होरपळत असताना डोळेझाक करुन हा शिवाजी. तुमचा शिवाजी मिष्ठान्नाचे घास आपल्या घशाखाली कसे ढकलू शकला असता ? आमच्या मातोश्रींनी स्वाभिमान आणि न्यायाचे धडे आम्हाला जन्मापासुन दिले होते ते यासाठी ? नाही , नाही , त्रिवार नाही!

काय होतं ते आमचे स्वप्न ........ एकीकडे आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब आमच्या इष्ट देवतांची करत असलेली मानखंडना , आयाबहिणींची लुटत असलेली अब्रु , रक्ताचं पाणी करुन वाढवलेल्या पिकांची होणारी उभी लुट, सावकारांना देखिल लज्जा वाटावी अशा पद्धतीने केली जाणारी वसुली, घरादारांवर फिरवले जाणारे नांगर हे सगळं रोखायचे असेल तर उभं करावे लागणार होते एक स्वतंत्र राज्य .... " स्वराज्य "

या राज्यात राहणाऱ्या दिनदुबळ्यांपासून प्रत्येक बाईबापडीला आपले वाटेल असे स्वराज्य !

आणि ते स्वप्नातलं स्वराज्य उभं करण्यासाठी कशाकशाची आहुती आपल्या सगळ्यांना द्यावी लागली आहे याची देखिल कल्पना तुम्हा सर्वांना आहे. ( हे बोलताना राजांचा कंठ अगदी दाटून आला असावा ) आज हि हिरकणी आणि हा येसाजी माझ्या समोर अपराधी म्हणून उभा असताना तो आमचा तानाजी, आमचा दिपाजी, आमचा शिवा, आमचा बाजी आणि ...... आणि आमच्या मांसाहेब आमच्याकडे मोठ्या आशेने पहात आहेत. त्यांचा हा शिवाजी , शिवबा काय फैसला देणार याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेले मला दिसत आहेत.

मगाशी आमच्या शंभू राजांना या हिरकणी कडे पाहिल्यावर त्यांच्या मातोश्रींची आठवण झाली , आणि आश्चर्य म्हणजे या हिरकणी कडे पाहताना आम्हाला देखिल आमच्या मांसाहेबांची आठवण झाली.

आई " ..काय जादु आहे या दोन शब्दांत ! स्वर्गाचं राज्य देखील ज्या पायांवर ओवाळून टाकावे असे शब्द, असे नाते म्हणजे " आई"

आपल्या लेकरावर कठीण प्रसंग आला आहे हे लक्षात आल्यावर क्षणाचाहि विलंब न करता प्राण ओवाळून टाकणारी व्यक्ती म्हणजे आई. आज हि हिरकणी दरबारात उपस्थित झाली आणि आम्ही औरंगजेबाच्या कैदेत अडकून पडल्याचे समजल्यावर कमरेला तलवार लावून तडक निघू पाहणाऱ्या आमच्या मांसाहेब दरबारात पुन्हा अवतीर्ण झाल्या आहेत असा भास आम्हाला झाला. आमच्या मांसाहेबांच्या डोळ्यात आमच्या विषयी दाटून येणाऱ्या प्रेमात आणि या छोट्या बाळासाठी हिरकणीच्या डोळ्यांत दाटून येणाऱ्या प्रेमात फरक करणे या तुमच्या शिवाजीला शक्य नाही........

आज या दरबारात आमच्या मांसाहेब हजर नाहीत परंतु त्या हजर असत्या तर जे घडले असते तेच आम्ही करणार आहोत. त्यांना मनोमन साक्षी ठेऊन वागणार आहोत.

राणीसाहेब तुमच्या स्वहस्ते हिरकणीचा साडीचोळी आणि मानमरातब देऊन सत्कार करा. पत..... तुम्ही आमच्या खाजगीतून येसाजी आणि कान्होबा साठी सोन्याच्या तोड्यांची व्यवस्था करा. पेशवे .... तुम्ही हिरकणीला पाच गावे इनाम आणि त्यांच्या राहत्या गावाला " हिरकणी वाडी" हे नाव दिल्याचे आज्ञापत्र टाकोटाक जारी करा.

हे श्रींचे राज्य आहे. इथले कायदे आणि व्यवस्था लोकांच्या सेवेसाठी, हितासाठीच बनवले जातील आणि त्यांच्या हितासाठीच मोडले आणि रूजु देखिल केले जातील.

या शिवाजीच्या अंतिम श्वासापर्यंत तो यासाठी लढत राहिल. आणि मीच न्हवे तर आमचे शंभुराजे आणि या भुमीत जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती यासाठीच त्याच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहिल याची आम्हाला खात्री आहे. जगदंब ...... जगदंब ! " कित्येक वेळानंतर तो कैलासपती बोलण्याचा थांबला.

मी स्वप्नात आहे कि सत्यात हे मला देखिल उमगेना. ऐकणारे कित्येक लोक आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत असताना मला दिसल्या. आणि तेच का तर माझ्याही डोळ्यांतून अणूंच्या धारा वाहू लागल्यामुळे समोरील दृष्य धुसर झाले.

माझ्या कानावर फक्त " छत्रपती शिवाजी महाराजांचा...... विजय असो " अशा घोषणा पडू लागल्या. मीही माझ्या नकळत अगदी अंतकरणापासुन जयघोष सुरू केला

छत्रपती शिवाजी महाराजांचा

.........विजय असो "

तुषार दामगुडे

( तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा )

🏰 हिरकणी भाग ७ 🏰

🏰 हिरकणी भाग ७ 🏰

आम्ही दोघं त्या दरबारात एखाद्या चोराप्रमाणे एका कोपऱ्यात उभे होतो.

आजुबाजुचे काही लोक एकमेकांमधे कुजबुजत होते. बराच वेळ दरबारातील रोजचे कामकाज चालले असावे. आम्ही आमच्या तंद्रीत होतो आणि अचानक तो पुकारा ऐकू आला. हो , हाकाऱ्याने आमचेच नाव पुकारले होते. ते पुकारल्या बरोबर काही शिपाई आमच्या आजुबाजुला येऊन उभे राहिले व त्यांनी आम्हाला पुढे घालून दरबाराच्या मधोमध उभे केले. माझे धनी ... मी ... आणि माझ्या हातात माझा कान्हा.

महाराजांनी आमचे निरीक्षण करता करता पेशव्यांकडे पाहिले. पेशवे उठून उभे राहिले आणि घसा खाकरून समोरील कागद ओढला. त्यांनी दरबाराला तो कागद वाचून दाखवायला सुरुवात केली. वाचून झाल्यावर पुर्ण दरबारात एक भिषण शांतता पसरली. कारण त्या कागदात मी केलेल्या गुन्ह्याचा इतीवृत्तांतच मांडला होता.

सगळ्या दरबाराच्या नजरा आमच्यावर खिळल्या. इतका बेळ अवसान गोळा करुन उभ्या असलेल्या माझ्या पायातुन जणू वारंच गेलं. मी यांच्याकडे पाहिले तर ते देखिल कानकोंडे होऊन अवघडलेल्या अवस्थेत कसेबसे उभे आहेत हे मला जाणवलं. धरणी फाटून मला त्यात सामावून घेईल तर बरे होईल असं मला वाटलं. माझ्या घशाला कोरड पडली. डोळ्यात पाणी उभे राहिले.

"

पंत , या अपराधासाठी गुन्हेगाराला काय शिक्षा आहे ?" एक अत्यंत धीरगंभीर आवाज त्या सुवर्ण सिंहासनावरून उमटला.

प्रत्त्युत्तरादाखल दरबारात काहीच आवाज झाला नाही. मी मान वर करुन पाहिले तर महाराजांनी नजर वळवून पेशव्यांच्या बैठकीकडे पहात पुन्हा प्रश्न विचारला..

" पंत , आम्ही तुम्हाला या अपराधासाठी गुन्हेगाराला काय शिक्षा आहे असं विचारलं?" त्यात स्वरात आता थोडी अधिकारवाणी झळकत होती.

" गडाचे दरवाजे बंद झाल्यावर ....( त्यांनी घसा खाकरत म्हटले )... गडाचे दरवाजे

बंद झाल्यावर अनधीकृतरीत्या गड उतरणे किंवा चढणे हा अत्यंत गंभीर अपराध असून तो हेरगीरी किंवा दगा या कलमांतर्गत मोडतो..... आणि .... आणि त्याचा दंड म्हणजे मृत्युदंड आणि अशा प्रकरणातील गुन्हेगाराला जाणीवपूर्वक आश्रय देणाऱ्या अपराध्याला आजन्म कारावास " कशाबशा आवाजात पेशवे उत्तरले.

मृत्युदंड...... मृत्युदंड..... मृत्युदंड "

संपूर्ण दरबारात आवाज घुमु लागला. पण ते ऐकायला माझे मन जागेवर होतेच कुठे? मी सुन्न होऊन मटकन खालीच बसले. धनी मला उठून उभे करत असावेत पण माझ्या पायातील बळ केव्हाच निघून गेले होते. लागला "

त्या सुवर्ण सिंहासनावरून पुन्हा धीरगंभीर आवाज त्या दरबारात उमटू या दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला इथल्या नियमांची व त्या नियमांना मोडल्यावर होणाऱ्या शासनाची माहिती निश्चितच आहे. सुर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे आमच्या आज्ञेशिवाय कोणत्याही कारणास्तव व कोणासाठीहि उघडले जाणार नाहीत हा त्यातलाच एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. या गडावर असणाऱ्या प्रत्येकाच्या जिविताची सुरक्षितता रहावी व कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणुन या अपराधाला "अत्यंत गंभीर " या सदरात टाकून आम्हीच त्यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे आवाज श्वास घेण्यासाठी थांबला.

" बोलणारा

ते काही क्षण मला युगानुयुगं गेल्यासारखे भासले. त्या दैवी व हुकूमत गाजवणाऱ्या आवाजाने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

हिरकणी.. हिरकणीच नाव ना तुझं ..... तर हिरकणी कडून सूर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे बंद असताना आमच्या अनुज्ञेशिवाय गड उतरून जाण्याचा जघन्य अपराध घडला आहे...... आणि असा गंभीर अपराध करणाऱ्या गुन्हेगाराला आश्रय देण्याचा गुन्हा येसाजी देखिल कडून घडला आहे. गुन्हेगारांना आपला अपराध कबूल आहे काय? "

सगळ्या दरबाराच्या नजरा आमच्यावर रोखल्या. आम्ही दोघांनी एकमेकांकडे केवीलवाण्या नजरेने पाहिले आणि मानेने होकार भरत

" व्हय, कबूल हाय जी " असं कसनुसं उत्तरलो आणि खाली बघत पायाने जमीन उकरु लागलो. माझा कान्होबा माझ्याकडे बघून हसत होता. त्या बिचाऱ्याला आपल्या आईवडीलांवर काय वेळ आली आहे याची काय कल्पना .......

ते राजसिंहासन पुन्हा बोलु लागलं " मांसाहेब ... तुमच्या मतानुसार या दोघांबरोबर काय सलूक करावा..... मांसाहेब ?" महाराजांनी मांसाहेब बसत त्या सदरेकडे पाहिले.

नव्हतं काय ...

पण ....... पण ती राजसदर ...... राजसदर कसली......तो तर देव्हारा ... तो देव्हारा आता रिकामा होता. थोरल्या धन्यांनी नेहमीच्या सवयीने त्या राजसदरेला साद घातली असावी. त्या देवीचा कौल मागितला असावा. पण राज्यभिषेक झाल्यावर ते दैवी छत्र महाराजांना आणि आमच्या सारख्या लाखो रयतेला पोरकं करुन गेलं आपली चुक लक्षात आल्यावर महाराजांनी त्या राजसदरेला पुन्हा एकदा न्याहाळलं. काही क्षण न्याहाळून झाल्यावर त्यांनी आपले डोळे गच्च मिटून घेतले. तोंडातल्या तोंडात ते काहितरी पुटपूटत असावेत. डोळे उघडले तेव्हा त्या रेखीव डोळ्यांच्या कडांना हलकसं पाणी आल्याची जाणीव मला झाली.

संपूर्ण दरबाराचं वातावरण आणखी गंभीर झालं. डाव्या बाजूच्या सिंहासनावरून आम्हाला न्याहाळंत आमचे धाकले धनी उठले आणि महाराजांच्या कानाशी लागून काहीतरी अत्यंत दबक्या आवाजात बोलु लागले. काही वेळ दोन्ही धन्यांची मसलत चालली होती. ती मसलत करत असताना दोघेही अधूनमधून आमच्याकडे पहात होते. जीवनमरणाचा प्रसंग येऊन उभा ठाकला होता. प्रत्येक क्षण एखाद्या मृत्यु घंटे प्रमाणे मेंदू वर आघात करत होता. शेवटी एकदाचे दोघांची चर्चा संपली. धाकटे धनी पुन्हा आपल्या सिंहासनावर स्थानापन्न झाले.

" हिरकणी तु केलेल्या अपराधाची माहिती पेशव्यांनी दरबाराला वाचून दाखवली, त्याची पार्श्वभूमी आणि पुढील घटनाक्रम आम्हाला आमच्या बहिर्जीकडून इत्यंभूत कळला परंतु आमची इच्छा आहे कि तु तुझ्या तोंडाने आमच्या उपस्थितीत सर्व दरबाराला सगळी घटना ऐकवावी. तुमच्या दोघांचा फैसला त्यानंतर आम्ही करू" खड्या आवाजात महाराजांनी मला आज्ञा केली.

मी धन्यांकडे एक बार पाहिले. त्यांनी डोळ्यांच्या खुणेनेच मला धीर दिला. कान्होबाला त्यांच्याकडे

सोपवून मी तुळजाभवानीचे स्मरण मनोमन केले.

सगळे अवसान गोळा केले आणि बोलायला. सुरुवात केली

🏰 हिरकणी भाग ६ 🏰

🏰 हिरकणी भाग ६ 🏰

येसाजी, एय येसाजी "

"कोण हाय? "

अरं दार उघडतुयस न्हवं...

आं..... नाईक तुम्ही आणि हिकडं? आत या बसा वाईच

" येसाजी आम्ही काय बसाय आलो न्हाय , तुला हाजीर करायला सांगितलंय पेशव्यांनी

" पेशव्यांनी? मला?

तुला आणि तुझ्या कारभारणीला म्होरं घालून आणायला सांगितलं हाय, आता चलतोस का बीगी बीगी "

मी आतून सगळं ऐकत होते. माझं धनी आत आले तेच पडलेल्या चेहऱ्याने . त्यांच्या बरोबर माझ्या मनात देखिल हजारो प्रश्नांचे काहूर उभे राहिले. जी गोष्ट घडेल म्हणून भितीने मन विचार करायचे टाळत होते ते अखेर समोर येऊन उभे राहिले होते.

मी कान्होबाला उचलून पाठिवर झोळीत बांधले. तोवर यांनी डोक्यावर फेटा बांधला आणि आम्ही नाईकांच्या पुढे पुढे चालू लागलो. वाटेने गावातील लोकांचे चेहरे काहीतरी बोलत आहेत आणि त्यातले काही लोक माझ्याकडे बोट करुन कुजबुजत आहेत हे मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले.

अर्धी चढण संपली असावी. पायाच्या ओल्या जखमेतून रक्त वहायला लागले म्हणुन मी थोडा वेळासाठी खाली बसले.

नाईक आणि त्यांचे शिपाई दुर आहेत हे पाहून मी हळूच यांच्याकडे पाहिले आणि

" धनी हि कशी येळ आली हो आपल्यावर " माझ्या स्वरात चिंता होती.

" हिरे , कळत नकळत तुझ्याकडून चुक घडली हे खरं होय आणि थोरलं धनी म्हणजे कायदाकानुन आणि शब्दांचे पक्के. आपल्याला सजा हुईल. पण आपल्या धन्यासाठी मन मोठं करुन सगळं सोसू. तु तिथं अज्याबात रडून गोंधळ घालायचा नाय म्हणजे काय "

" म्या शिक्षा भोगाया तयार हाय, पण आपल्या कान्होबाला माझ्या पासुन येगळा करू नये. तशी येळ पडलीच तर थोरल्या धन्यांच्या पायावर नाक रगडून माफी मागल म्या. मला काय शिक्षा करायची ती खुशाल करा, कुठल्या कोठडीत टाकायचे तिकडे टाका पण माझा कान्होबा माझ्या जवळ राहू द्या एवढं मागेन

" चल उठ, निघायला हवं, बाकी हिरे... आपण लहान माणसं, तसं बी तिथं आपल्याला इचारणारं कोण हाय ? आता बिरोबाच्या मनात असंल तसं हुईल

अत्यंत निराश मनाने आम्ही दोघं उठलो आणि गड चढायला पुन्हा सुरुवात केली. मागे नाईक अत्यंत बारक्या नजरेने आमच्यावर लक्ष ठेऊन होतेच.

तो प्रचंड मोठा दरवाजा ओलांडुन पुर्ण आयुष्यात मी पहिल्यांदा या राजदरबारात उभी होते. मीच काय माझे धनी देखिल इथे पहिल्यांदाच आले असावेत. अर्थात हे त्यांचा बावरलेला चेहराच सांगत होता.

आत मोठाच दिमाख होता. त्याचं वर्णन करायचे म्हटले तरी मला शब्द सुचणार नाहीत. ऐश्वर्य म्हणजे नेमकं काय असतं हे आमच्या सारख्या गरीबांना आयुष्यात पहिल्यांदाच पहायला मिळत होते. कारण आमचं जगणं पण कुडाच्या झोपडीत आणि मरणं पण कुडाच्या झोपडीत. मी हळू हळू सगळीकडे बघत होते.

सर्व दरबारी आपापल्या हुट्याप्रमाणे उभे किंवा बसलेले होते. माणसांची हि मोठी गर्दी तिथे होती. परंतु तेथील वातावरण मात्र अत्यंत आदबशीर आणि धीरगंभीर होते.

आणि त्या भारावलेल्या वातावरणाचा केंद्रबींदु असलेल्या सुवर्ण सिंहासनाकडे माझी नजर गेली... . हा माझा भास होता का ? नाही, नाही हा भास कसा असेल? मग मी पहात होते ते सत्य होते काय ? हो हिरकणी हे सत्य आहे.

"

मणामणांच्या सुवर्णाने आणि अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडवलेल्या त्या सिंहासनावर ते" बसलेले होते. हो ..... तेच ! माझे, आमचे सर्वांचे धनी ! " छत्रपती शिवाजी महाराज

आपल्या गणांमध्ये बसलेला प्रत्यक्ष महादेव जणु.

स्वच्छ सुती अंगरखा. पायांत रत्नजड़ित चढाव. डोक्यावर मलमली जिरेटोप. त्या जिरेटोपावर उठुन दिसणारे पाचूंनी मढलेले पदक. गालांवर तोंडभरून शोभेलशी दाढी, आणि त्या रेखीव चेहर्याला शोभतील असे मान्यवर रूळणारे काळेभोर केस.

इतक्या लांबून देखिल वेध घेणारे पाणीदार डोळे आणि त्या विशाल भाळावर रेखाटलेला तो भगवा शिवगंध

हाच तो आमच्यासारख्या अनेक दिनदुबळ्यांचा, बायाबापड्यांची, अनाथांचा आधार असलेला आदिनाथ ......!

स्वतः अनेक संकटांचे हलाहल पचवून आमच्यासारख्या वंचिताना स्वातंत्र्य, न्याय, सुरक्षितता आणि आत्मसन्मान यांचे अमृत पाजणारा निलकंठेश्वर !

🏰 हिरकणी भाग ५ 🏰

🏰 हिरकणी भाग ५ 🏰

श्वास घे.....

खोबणीत हात किंवा पाय

घट्ट पकड़...... पायांना आधार शोध घट्ट रोव..... श्वास सोड...... अंग वेली सारखे लवचिक कर. धीर सोडू नको ...

खाली बघू नको ........ श्वास घे...... थोडंच राहिले आहे ... हे तु पोहचलीच.

घट्ट पकडून ठेव,

फुंकर घालण्यासाठी वाहतोय करुन तुला साथ देत आहेत पुरेसा आहे पायांना आधार शोध

अजून अगदी थोडं

तो वारा तुला उडवून नेण्यासाठी नाही तर तुझ्या जखमांवर तू एकटी नाहीस...... बघ रातकीडे किरे हिरे पुन्हा श्वास घे....... त्या चंद्राचा प्रकाश अजून अगदी थोडे...... अगदी

मी माझ्याशीच बोलत होते कि हे सगळे माझ्या मनात चालू होते ? कितीवेळ गेला होता? मी कुठे होते ? मी कुठे निघाले आहे ?... मी कोण आहे ? मी पुन्हा खाली बसले.

त्या चंद्र प्रकाशात मी माझ्या शरीराकडे पाहिले. साडीची फाटून दैन्यावस्था झाली होती. माझंच नशीब मला पहायला इथे कोणी नव्हते. हातांचे तळवे दगडधोंड्यांवर घासुन आणि घट्ट पकडून त्यातून रक्त वहात होते. गुडघे आणि पाय सोलवटून ठिकठिकाणी झालेल्या जखमांतून देखिल रक्त वहात होते. केस वाऱ्याने पिंजारून वेडेवाकडे झाले असावेत.

चेहरा धुळीने माखल्याची देखिल जाणीव मला झाली. पण मी शुद्धीवर होतेच कुठे ?

मी वेदना , जाणीवा या सगळ्याच्या पार पलीकडे पोहचले होते. पुन्हा थोडी विश्रांती घेण्यासाठी मी तिथे काही वेळ तिथे बसले. मी धीर करून खाली पाहिले.

एक लुकलुकता दिवा मला त्या अंधारात देखिल दिसला. मी मान वर करुन बघितले तर त्या झपाटले पणात जवळजवळ गड उतरून आले होते. नेहमीच्या पायवाटेने जाण्यासाठी लागणारा वेळ या सरळसोट कड्यावरुन उतरताना निश्चितच लागला नव्हता.

बस आता हा शेवटचा अवघड टप्पा पार केला कि आलाच पायथा. आणि मग आणि मग माझा कान्हा ! माझ्या बाळा आलेच रे मी , बस थोडी कळ काढ !

मी पुन्हा कंबर कसून उतरायला सुरुवात करण्यासाठी समोरच्या कड्याचे निरीक्षण चालू केले. पाहताक्षणी हा कडा अगदी जीवघेणा आहे याची मला लगोलग जाणीव झाली. हि शेवटचीच अडचण माझ्या आणि कान्होबाच्या मध्ये उभी होती. पहाटेचे झुंजूमुंजू वारे वहायला सुरुवात झाली होती. त्या गारेगार वाऱ्याने मला थोडी तरतरी आल्यासारखी वाटली.

तोच मी पटकन मागे सरकत

मी पुढे होत त्या दगडाला हात घालणार तोच धपापल्या उराने जागेवरच शांतपणे उभी राहिले. एक काळाकभीन्न नाग फणा काढून त्या दगडाला वेटोळे मारून बसला होता. आता सगळंच संपल. तो माझ्याकडे पहात फुत्कार सोडत होता आणि इकडे माझे पाय भितीने लटलट कापायला सुरुवात झाली होती.

- जगदिश्वरा हा काय प्रसंग आणलास रे माझ्या समोर ? आजपर्यंत तुझी अगदी मनोभावे पुजा केली .... तुझ्यासाठी वेगळं काढून ठेवलेल्या दुधाने अगदी भक्तिभावाने तुझी पुजा केली. या तुझ्या लेकीला संकटातुन सोडव रे जगदिश्वरा ........

काही क्षण गेले असावेत आणि काय आश्चर्य हळूहळू वेटोळे सोडत दुर जाऊ लागला. अगदी हळूवारपणे.

तो नजरेआड झाला.

फुत्कार सोडणारा तो नाग अगदी दूर...

मी झपाट्याने पुढे होत तो दगड माझ्या हातांच्या पकडीत घेतला. आता हि संधी मला घालवायची नव्हती. मी जोर लावून माझे अंग अधांतरी अवस्थेत त्या कड्यावरून खाली सोडून दिले. पायांनीच चाचपत चापपत एक खोबणी शोधली व एखाद्या भिंतीवर पाल चिकटून असावी त्याप्रमाणे उभी राहिले. दुसऱ्या हाताने एक खोबण शोधत तिथे माझी पकड घट्ट केली आणि हळूहळू एखाद्या घोरपडी प्रमाणे ती नैसर्गिक भिंत उभी उतरू लागले ..... श्वास फुलुन आला ..... नुकत्याच झालेल्या प्रसुती नंतर या वेडाचाराच्या कसरतीमुळे पोटाच्या आतड्यांवर अत्यंत वेदनादायक ताण पडू लागला. माझ्या मांड्यांमधून रक्त प्रवाह सुरू झाल्याची जाणीव झाली . पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन मी ती भिंत उतरतच होते.

माझ्यात प्रत्यक्ष भवानीचा संचार झाला होता!

आणि मी एकदाची खाली उतरले. क्षण दोन क्षण मी श्वास घेण्यासाठी थांबले असेल ..... वर पहात मी त्या जगदिश्वराला अंतकरणापासुन नमस्कार केला आणि मी पळत सुटले. माझ्या कान्होबा के......

रस्त्यावर काही लोक गुरंढोरं चारायला बाहेर पडले होते. काही बायका झाडलोट करायला अंगणात आल्या होत्या. त्यातले काही मला तशा अवस्थेत धावताना पाहून जागेवरच थांबले. पण मी मात्र धावत सुटले होते

आणि तो आवाज माझ्या कानांवर पडला तसं माझ्या पायांनी अधिक गती घेतली.

हो ..... तो माझ्या कान्होबाच्या रडण्याचाच आवाज होता. धाव हिरकणे.... अजून जोरात दाब !

आले बाळा आले ...

अखेर खाडकन दरवाजा उघडून मी घरात धाव घेतली आणि झेप टाकत रडत असलेल्या माझ्या कान्होबाला त्याच्या बापाच्या हातांतून जवळजवळ हिसकावूनच घेतले.

त्याला कुशीत घेऊन मटामटा त्याचे मुके घेतले आणि त्याला माझ्या छातीशी लावला. इतका वेळ दाटून आलेली माझी छाती एखाद्या झऱ्याप्रमाणे वाहू लागली.

कान्होबा अगदी शांत होत होत माझ्या छातीला बिलगुन दुध पिवु लागला. एका अवर्णनीय सुखाची संवेदना माझ्या शरीरभर पसरू लागली. याचसाठी केला होता हा अट्टाहास ! बस मला आता जगातील कुठल्याही सुखाची अपेक्षा नव्हती. मी आणि माझा बाळ......माझा कान्होबा !

तुषार दामगुडे

क्रमशः

🏰 हिरकणी भाग ४ 🏰

🏰 हिरकणी भाग ४ 🏰

जागा

गडावर दुध घालताना कुठे पहारेकरी कमी व निवांत असतात त्या जागा मी आठवू लागले. नाही नाही ती नाही..... तिथे जरा जास्तच नजर असते .... मग ती नाही.. ते देखील नाही ...... त्या ठिकाणावर लांबून देखील नजर .. ठेवता येते म्हणून पहारेकरी कमी असतात. मी भरभर सगळे मनातल्या मनात

आठवू लागले.

आणि मला आठवली. एक जागा मला हवी तशी होती. तिथे पहारेकरी कमी असत. आणि जे असत ते देखिल थोडे निवांतच असत. कारण कारण तेथन काही दगा होईल हे कठीण होतं. कठीण कसलं अशक्यच होतं. पण मला शक्य अशक्यच्या त्रांगड्यात अडकुन पडायचे नव्हते. मला कान्होबा कडे जायचे होते एवढेच आता लक्षात होते. बस्स!

मी अगदी तिथलीच रहिवासी असावी अशा पद्धतीने चालत चालत मला हव्या त्या ठिकाणी पोहचले. कुणी बघत नाही हे पाहून पटकन कमरेला पदर खोचून हळूच त्या घळईत शिरले. व पटपट पाऊले टाकत एका आडोशाच्या मागे श्वास घेण्यासाठी उभी राहिले. जोरात चालल्यामुळे माझा श्वास फुलून आला होता. काही क्षण थांबल्यावर मी खाली पाहिले

मी मनाचा निश्चय करुन थोडी पुढे झाले व खाली पाहिले आणि..

बापरे

पटकन मागे सरून मी पुन्हा मागच्या दगडाचा घट्ट आधार घेऊन उभी राहिले. त्या धुसर अंधारात देखिल काळजाचा थरकाप उडवणारी एक खोल खोल दरी माझ्या डोळ्यांसमोर माझा घास घेण्यासाठी " आ" वासुन उभी होती. इथे पहारेकरी कमी का असतात त्याचे कारण माझ्यासमोर उभे होते. मला ये ये म्हणून खुणावत होते.

हिरे अगं हा काय वेडेपणा करते आहेस तु. चल मागे हो , पुन्हा वर जा, आजची रात्र गडावर घालव आणि सकाळी उगवतीलाच खुशाल आपल्या घरी जा. माझे एक मन माझ्याशी बोलु लागले.

पण माझा कान्हा ?

अगं वेडे , समोर हि खोल दरी बघते आहेस ना ? माणसाला देखिल कस्पटासारखं उडवून लावण्या वाऱ्याचा आवाज तुला ऐकू येतोय ना ? इथल्या खोबणी खोबणीत तुला डसण्यासाठी दबा धरून बसलेल्या जनावरांची सळसळ ऐकू येतेय ना?

हो .... पण माझा कान्हा ?

अगं आज वाचलीस तर तुझा कान्हा आहेच पण तुच नसलीस तर....

नाही .. नाही .... गप्प बस. तुझं मला काहीही ऐकायचे नाहीये. आज मी माझ्या बाळाकडे जाईल नाहीतर इथेच माझा जीव देईल पण आता माघार नाही. आई जगदंबे या तुझ्या लेकीचं तुच आता रक्षण कर. मी सगळे विचार थांबवून पुन्हा एकदा पदर खोचला. आणि पुढे होत त्या बेलाग कड्याला उतरायला प्रारंभ केला.

मी खाली बघायचं शक्य तेवढे टाळू लागले कारण उंचावरून खाली पाहताना मला चक्कर येत असे. थोडा जरी झोक गेला तरी एक अत्यंत वेदनामय मृत्यु माझ्या नशीबात निश्चित होता. तोंडाने देवीचं नाव घेत घेत व त्या अंधारात हाता पायानेच चापसत चापसत मी खाली उतरू लागले. हि एक अत्यंत उभी व सरळसोट दगडांची भिंतच होती जणू. मी पुर्ण नेटाने जोर लावून एकेक सांदीकोपरा पकडून पायाला

आधार मिळताच हातातला आधार सोडत होते.

आई गं.. आई .. मी वेदनेने ओरडले.

किती वेळ गेला कुणास ठाऊक त्या कड्यावर सतत पाऊस पडुन पडुन एखाद्या तलवारीला यावी तशी धार आलेली होती आणि मी आधारासाठी त्यावर पाय देताच भाजी चिरावी तसा माझ्या पायाच तळवा चीरला गेला होता. रक्ताची एक धार काटा लागून आधीच जखमी झालेल्या त्या पायातुन वाहू लागली. तो दगड त्या रक्ताने न्हाऊन निघू लागला.

मी वेदनेने कळवळून तिथेच ओक्साबोक्षी रडू लागले. मी काय करून बसले होते.

आई...... आई...... तुझ्या हिरकणीला कुशीत घे. तीला घट्ट कुशीत घे. तुझ्या उबदार मिठीत घे. बघ तुझ्या हिरकणीचं काळीज भितीने कसं उडतंय , तीचे पाय कसे लटलट कापत आहेत ..... ती फार मोठ्या संकटात आहे गं !

आणि कान्हा ? हिरे ..... तुझ्या कान्हाला कुशीत कोण घेणार ? भितीने टाहो फोडणाऱ्या कान्हाला उबदार मिठीत कोण घेणार हिरे ? तुझ्याशिवाय त्याला तरी कोण आहे हिरे ? तु इथेच गर्भगळीत झालीस तर त्याच्यावर मायेची पाखर कोण करणार हिरे ? विचार नुसते विचार.... डोके फुटून जायची पाळी आली होती.

वेदनेचा पहिला भर ओसरल्यावर मी कसलाही विचार न करता धडूत्याचा एक कोपरा टर्रकन फाडून काढला. त्या चींधीनेच वाहणारं रक्त पुसून काढलं आणि तोंड घट्ट आवळून तळव्याला करकचून पट्टी बांधली. रक्त वाहायचं थोडं थांबल परंतु वेदना मात्र तशीच ठसठसत होती. आता त्या वेदनेचा विचार मागे पडला आणि माझ्या बाळाचा चेहरा पुन्हा डोळ्यांसमोर रूंजी घालू लागला. मी तिथेच दगडाला धरुन थोडावेळ आराम केला.

आणि पुन्हा उतरायला सुरुवात केली. आता मी जास्त विचार करायचा नाही या निश्चयानेच उतरू लागले. याला एक प्रकारचे झपाटलेपण म्हणता येईल.

🏰 हिरकणी भाग ३ 🏰

🏰 हिरकणी भाग ३ 🏰

दरवाजा उघडणार न्हाय म्हणजे काय

अहो पर मला घरला जायलाच हवं

" म्या त्यात काय बी करू शकत न्हाय "

मी

" अहो दादा.. घरला माझं तान्हं बाळ हाय... ते अजून अंगावर पितंय... त्यासाठी मला घरला जायलाच हवं..." मी आणखी आळवणी केली

अगं हिरे हिथं आत्ता माझी सख्खी भन येऊन म्हटली तरी मला गडाचे दरवाजे उघडता येणार न्हाई"

" अहो दादा एक डाव चुक पदरात घ्या .... गडावर येळ कसा गेला ते आज काय लक्षात आलं न्हाई आणि सोबतीच्या बायांची चुकामुक झाली म्हणून त्यांना शोधत बसले व इथवर येईपर्यंत सुर्य कधी मावळतीला गेला ते देखिल कळलं न्हाई. चुक माझीच हाय पण एक डाव माफ करा...

" हिरे नसता हट्ट धरू नकोस...दरवाजे उघडणार न्हाय म्हणजे न्हाय "

" अहो माझा कान्होबा माझ्या शिवाय कसा राहिल? त्याला भुक लागल्यावर कुणाकडे जाईल ... मी तुमच्या पाया पडते... भिक मागते ... मला घरी जाऊ द्या .... दरवाजा उघडा" मी त्याच्या पायावर लोळण घेतली

" पाय सोड.. काय करतीयासा... नाईकांना महाराजांचीच आज्ञा हाय कि सुर्य मावळतीला गेल्यावर गडाचे दरवाजे बंद म्हणजे बंद. नाईकांना कळलं मी दरवाजा उघडला तर माझी गर्दन धडावर राहिल काय ? हे बघ तु काय काळजी करू नको .

मी माझ्या बायलीला सांगावा धाडतो.. तु आज गडावर तुझ्या या भावाकडंच

रहा....

" पहाटं उगवतीलाच तु आपल्या घरला खुशाल निघून जा कशी ... मी काय म्हणतोय . लक्ष कुठाय तुझं ... हिरे"

अं. हो हो " मी काहीच न सुचून काहितरी बोलुन गेले. महाराजांची आज्ञा असताना गडाचे दरवाजे आत्ता उघडणं शक्यच नव्हतं. ते नाईकांच्या अखत्यारीत नव्हतं. आणि मी खुद्द महाराजांकडे माझी कर्मकहाणी घेऊन जावं हे देखिल अशक्य होतं. मी तिथेच काहिवेळ मटकन बसून राहिले. पहारेकरी देखिल त्यांचे दैनंदिन कामकाज उरकु लागले.

मी तिथून निघाले. सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त झाले होते. माझ्या सारख्या दिडदमडीच्या गवळणीकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ होता. दिवसभर काम करुन कधी एकदा आराम करतो असं सगळ्यांना झाले असावे.

माझं मन मात्र अगदी सैरभैर झालं होतं. समोर सतत कान्होबाचा चेहरा थैमान घालत होता. आणि का घालणार नाही. केवढूसा होता तो. आईच्या छातीला लागून चुटूचुटू दुध पिणारा आणि रात्री अंधारात घट्ट बिलगुन आश्वस्त झोप घेणारा तो कोवळा जीव आज काय करेल? त्याला भुक लागल्यावर कोणाकडे जाईल?

त्याला भिती वाटल्यावर कोणाला कवटाळेल ? जेव्हा त्याला जाणीव होईल कि आपली आई आपल्याजवळ नाही तेव्हा त्याला शांत कोण करेल?

नाही .... नाही.... नाही ! मला इथुन जायला हवं. काहीही करुन घरी पोहचायला हवं. घरी जाऊन कान्होबाला जवळ घेतल्याशिवाय मला चैन पडणार नव्हता. आज एकतर मी घरी जाईन किंवा तो प्रयत्न करता करता माझा जीव देईल पण मी इथे थांबणार नाही......... बस्स ठरलं म्हणजे ठरलं !

हिरकणी भाग २

🏰🚩हिरकणी भाग २🚩🏰

आई झाल्यावर मी एका रात्रीत प्रौढ झाल्यासारखी वागत होते. आमच्या चंद्रमौळी संसाराला आपलाहि थोडा हातभार असावा असं मला वाटलं. आणि कान्होबा झाल्यावर तीन महिने घरात काढून गावातीलच तीन चार बायां बरोबर घरचं दुध विकण्यासाठी म्हणून गडावर येत होते.

गडाची वाट अत्यंत चढणीची व सरळ अंगावर येणारी. जसं जसं वर जाऊ तसं तसं वारा अगदी थैमान घातल्यासारखा वहात असे. पावसाळ्यात तर गडाची शिखरं

घालून पाहिल्यावर थेट ढगात बुडालेली दिसत. जणु कैलास पर्वत.....

हो माझ्यासाठी .... माझ्यासाठीच का आमच्या सगळ्यांसाठी तो कैलास पर्वत होता. त्या पर्वतावर कैलासा एवढ्याच मोठ्या मनाचा आमचा महादेवा सारखा राजा त्याच्या कार्तीक आणि गणपती सारख्या देखण्या असलेल्या दोन पुत्रांबरोबर वास करत होता. मी गडावर जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा तेव्हा त्या मोठ्या राजवाड्याकडे तोंड करुन कुणी बघत नाही ना हे पाहून हळूच नमस्कार घालायचे. किती प्रचंड मोठा तो राजवाडा आणि काय त्याचे ते वैभव. मी ते सगळं बाहेरुनच बघितलं होतं म्हणा पण एक दिवस तरी मला त्या राजवाड्यात जाऊन तिथे निवास करणाऱ्या माझ्या बिरोबाचे डोळा भरून दर्शन घ्यायचे होते.

डोक्यावर दुधाची मडकी घेऊन लंगडत लंगडतच मी माझ्या सोबतीच्या बायांबरोबर गडाच्या दरवाजा पर्यंत पोहचले. गडावर आज बरीच लगबग दिसत होती. काही कार्यक्रम असेल म्हणून आज एवढी गर्दी असावी. हे दृष्य आम्हाला नवीन नव्हते.

रोजच्या येण्याजाण्यामुळे जवळपास सगळे शिपाई आम्हाला ओळखत होते. त्यातले काही जणतर आमच्याच वाडीतले होते. त्यातल्या बऱ्याच जणांना मी दादाच म्हणत असे.

पण त्या सगळ्यांचे प्रमुख नाईक बाबा म्हणजे एकदम वेगळे प्रकरण होते. आपण आणि आपले काम एवढाच त्यांचा खाक्या. डोळ्यात तेल घालुन एकूणएक व्यक्तीचा परवाना व वस्तू तपासल्याशिवाय ते काहीही आत बाहेर सोडत नसत. सगळ्या हालचालींवर त्यांची घारी सारखी नजर फिरत असे. आजही सगळ्यांचे परवाने व सामान तपासून शिपाई एकेकाला आत बाहेर सोडत होते. अखेर आमची पाळी आली म्हणून आम्ही पुढे झालो.

'कुणाची आणि कुठली म्हणायची गं तु ?" एक आवाज आला

मी आवाजाच्या दिशेने पाहिले. एक अनोळखी तरूण पोरगेला शिपाई अगदी बारीक नजर करून मलाच विचारत होता. मी इकडे तिकडे पाहिले तर नाईक बाबा कसल्यातरी लखोट्यांवर शिक्के मारण्यात व्यस्त होते.

" कोण मी...?" उन्हाने लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर मी पदर ओढला.

" तु नाय तर कोण मी?" तो तरूण शिपाई तंबाखू मळता मळता आणखी बारीक नजर करुन म्हणाला

" मी... हिरा... इथलीच. खालच्या वाडीतली" मी उत्तरले

" ओ दादा, आम्ही सगळ्या रोज इथं धारा घालायला येतो. नाईकांना इचारा"

म्हातारी मध्ये पडली

" मध्ये बोलायचं काम न्हाय म्हातारे. माझं काम लय जोखमीचं. गडावर चुकून जरी एखादा हेर घुसला तर गर्दन जाईल ती माझी. एय हिरे तु जरा एका बाजूला ये. मला जरा तुझ्या सामानाची तपासणी करायची हाय" तो शिपाई करवादुन तडतडला.

मी डोळे त्याच्या नजरेत घालून वर बघितले आणि त्याच्या त्या एकटक बघणाऱ्या नजरेत क्षणार्धात मला पाप दिसले. बाईला या बाबतीत निसर्गाने विशेष इंद्रीयच दिलेले आहे. माझ्याशी सलगी करण्याच्या हेतूनेच तो मला एका बाजूला बोलवत होता ते न कळण्या इतकी मी खुळी नव्हते. मी जागेवरच स्तंभासारखी उभी राहिलेली पाहून तो शिपाई पुढे झाला आणि त्याने थेट माझा हात धरून एका बाजूला ओढले........

साट SSऽऽऽऽऽऽऽ5S त्या कोलाहलात विज कडकडावी तसा आसुडाचा आवाज घुमला. माझा हात धरणाऱ्या त्या शिपायाने वेदनेने एकच किंकाळी फोडली. साट साट असे आणखी चार पाच आवाज घुमले. तो तरूण शिपाई जमिनीवर आडवा पडून मारा पासुन वाचण्यासाठी अंग झाकून घेऊ लागला.

" अरे सुक्काळीच्या , आया बहिणींच्या पदराला हात घालायला हि आदिलशाही का मोगलशाही आहे व्हय रे ? फोद्रीच्या ....अरे रायगड आहे हा रायगड. राजांना यातलं काडी एवढं जरी कळलं ना तर तुझ्या बरोबर मला पण टकमक टोक बघायला लागंल. तु चार दिसातच शिपाईगीरीच्या धुंदीत माजलेल्या वळू सारखा करायला लागला व्हय रे... ( साटSSSऽ साट) रयतेच्या सुतळीच्या तोड्याला सुदीक हात लावायचा नाही असा आदेश आहे आपल्याला. थांब तुझा चौरंगा करतो ?" नाईक बाबा हातात आसुड घेउन एकदम पिसाळलेल्या वाघा प्रमाणे थैमान घालत होते. ते सगळं दृष्य बघून बाकीच्या शिपायांचे पण धाबे दणाणले असावेत. जो तो लगबगीने

"आपापले काम करू लागला.

शेवटी म्हातारी पुढं झाली आणि म्हणाली

" नाईक , जाऊ द्या.... पोरसवदा हाय. चुकला असेल पण त्याला एक डाव माफ करुन टाका. काय गं हिरे... बरोबर ना

व्हय नाईक बाबा.. माझ्या भावासारखाच हाय तो. एकडाव माफ करा त्याला..

हिथून पुढं आपण कुठं आणि कुणाच्या चाकरीत आहोत हे त्याच्या लक्षात आलं असंल. आता पुन्यांदा न्हाय चुकायचा तो" मी पटकन बोलुन गेले.

तो अत्यंत खजील झाला होता कारण आमच्या तोंडून त्याला माफीची अपेक्षा नसावी. त्याने सरळ माझे पाय धरले व चुकीच्या जाणीवेने ओक्साबोक्षी रडू लागला.

ते पाहून नाईक बाबांनी आपला आसुड आवरला. वातावरण निवळले..

आज मी दिंडी दरवाजातून आत शिरल्या शिरल्या पहिल्यांदाच सगळ्यांच्या देखत

"रयतेच्या सुतळीच्या तोड्याची देखिल काळजी वाहणाऱ्या" माझ्या शिव शंकराच्या महालाच्या दिशेने तोंड करून अगदी साष्टांग दंडवत घातला. माझ्या राजाचं भरभक्कम छत्र या भुमीवर आहे तोवर माझ्या सारख्या हजारो बाया बापड्यांना त्यांच्या अब्रुची चिंता करण्याचे किंचित देखिल कारण नव्हते.

क्रमशः

तुषार दामगुडे



सोमवार, ४ मे, २०२०

🏰 हिरकणी भाग १ 🏰🚩

🏰 हिरकणी भाग १ 🏰🚩 " आई गं 'वेदना क्षणात तळव्यातुन मस्तकापर्यंत जाऊन भिडली आणि तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले.
मी मटकन पायवाटे वरच खाली बसले. डोक्यावरील मडकं हळूच बाजूला ठेवले नाहीतर त्यातले दुध सांडले असते. पायाचा तळवा वर करुन बघितला .... रक्ताचा टपोरा थेंब जमा झाला होता.
काय झालं गं हिरे ?" म्हातारी मागं वळून बघत म्हणाली
काय न्हाय , काटा मोडला ..." मी उत्तर दिले.
डोक्यावरील मडक्यांची उतरंड सांभाळत म्हातारी माझ्या जवळ आली. माझ्या पायातील वेदनांमुळे डोळ्यात टचकन पाणी आले होते. म्हातारीने डोक्यावरची मडकी खाली उतरवली व माझा पाय हातात घेतला.
" डोळं फुटलं जणू तुझं , वाटं बरचं काटं कुटं दिसंना व्हय तुला ... उलुशी शांत बस जरा आता आणि बघू पाय न्याहार इकडं... म्होरा बशीवला याचा , पार आत पत्तुर गेलाय" म्हातारी माझा पाय निरखत म्हणाली
आत्त्याबाय लय दुखतंय बरं का, तुम्ही काय बी अघोरी उपाय करू नका बरं सांगूनशान ठेवते " मी पटपट बोलायला लागले कारण म्हातारी त्या काट्या बरोबर उलझपड करायला लागली होती. खरंतर रक्त बघूनच मला भोवळ यायला सुरुवात झाली होती.
" आत्ता गं बया, इंद्राची राणीच जणु, हिरे आपल्याला एवढं नाजूक साजुक राहून चालणार हाय का पोरी,
" अगं आई गं " म्हातारीने मला बोलण्यात गुंतवून खसकन काटा ओढून काढल्यामुळे वेदनेचा आगडोंब शरीरात उसळला. रक्ताची धार पायातुन लागली.
माझे डोळे अधूंनी वाहू लागले. मी पदर तोंडात खुपसला आणि हमसुन हमसुन रडायला लागले...
अगं माझी पोर ती... वाईच कळ काढ रडू नगं " असं म्हणत आत्याबाईने टरटर पदर फाडला आणि इकडे तिकडे शोधक नजर टाकली. त्यांना हवं ते दिसल्यावर पटकन धाव घेत त्यांनी त्या झाडाची चार पाच पानं ओरबाडून कुस्करली आणि तो ओलेता पाला हातात घेऊन माझ्या जखमेवर लावला व वरुन त्या चींधीची पट्टी बांधून टाकली.
थोडा वेळ तिथंच बसून म्हातारीने मला धीर दिला. उन्हं वर यायला लागली होती.
मडकी डोक्यावर घेऊन आम्ही दोघींनी गड पुन्हा चढायला सुरुवात केली. तरी माझा पाय वेदनेमुळे थोडा लंगडतच होता.
मी हिरा..... हिरकणी ! माझ्या आई वडीलांना एकुलती एक. पाठीवर ना भाऊ ना बहीण. माझी आई..... आई ! एकुलती एक असल्यामुळे आईने तळहातावरच्या फोडाप्रमाणे मला जपली होती.
कधी शेरडांमागे लावणे नाही कि कधी घरकामाला हात लावु देणे नाही.... आम्ही आर्थिक श्रीमंत नसलो तरी जमेल त्या परीने आईने माझे सगळे हट्ट अगदी लाडाने पुरवले होते. पण एवढ्या लाडामुळे मीही कधी वावदूक वागले नव्हते. अगदी न्हातीधुती झाले तरी आईचा पदर सोडुन कुठे गेली नदत.
पण आमच्या ह्यांनी मला जत्रेत पाहिले काय, मला लग्नासाठी मागणी घातली काय आणि आईने अगदी खोदुन खोदुन नवऱ्या मुलाची सगळी चौकशी करुन लग्नाला परवानगी दिली काय ........ माझी पाठवणी करताना एखादी गाय वासराला चाटून हंबरते तसा आईने काळजीपोटी फोडलेला टाहो माझ्या कानात आजही घुमतो.
बघता बघता लग्नाला दोन वर्षे झाली. माझे धनी म्हणजे तारांगणात चंद्र शोभावा तशा रूबाबदार व्यक्तीमत्वाचे. मराठमोळं सौंदर्य जणु. लग्न झाले तेव्हा आम्ही दोघंही तसे पोरसवदाच होतो. धन्याचे माझ्यावर आणि माझे त्यांच्या वर खूप प्रेम होते...... आमच्या आत्याबाई माझ्या सारख्या अल्लड व अज्ञानी मुलीला कसं सांभाळून घेतात ते मला आश्चर्यच वाटायचं. कारण तेल मीठ किती टाकायचं इथपासून माझ्या स्वयंपाकाची सुरुवात होती. पण एकमेकांना अगदी प्रेमाने सांभाळत आमचा संसार अगदी टुकीने चालला होता.
सहाच महिन्यापुर्वी आमच्या संसाराच्या वेलीवर " कान्होबा" च्या रूपाने एक गोंडस फुल उमलले होते. प्रसुतीच्या त्या जीवघेण्या कळा सोसल्यावर जेव्हा मला शुध्द आली आणि मी पहिल्यांदा कान्होबाला माझ्या ओंजळीत घेतले तेव्हा अतीव वात्सल्याने मला केव्हा पान्हा फुटला ते हि कळले नाही. कान्होबा जेव्हा आपल्या नाजुकश्या लालसर ओठांनी मला लुचू लागला तेव्हा ती अनुभूती शब्दांत वर्णन करुन सांगणे अशक्यप्राय आहे. माझे आईवडील , धनी, आत्याबाई यांच्या वर माझे प्रेम होते , अगदी निरतीशय प्रेम होते. परंतु माझ्याच शरीरात वाढलेला, माझ्या काळजाच्या स्पंदनांवर जगलेला, माझ्या हाडा मांसा पासुन बनलेला कान्होबा माझ्यासाठी काही क्षणांत या सगळ्यापेक्षा अधिक जवळचा व सर्वाधिक प्रिय झालेला होता.

बाजींद भाग क्र.१८ वा..!

•••••••••••••••••••••••••••••••
:
बाजींद
भाग क्र.१८ वा..!
~~~~~

खंडोजी ने एक दीर्घ श्वास सोडला आणि त्या चौघांकडे एक दृष्टिक्षेप टाकला.
सर्जा,सखाराम,नारायण आणि मल्हारी गंभीर पणे खंडोजी भूतकाळ त्याच्याच तोंडून ऐकत होते..!

एव्हाना खूप दूर आपण चालत आलो आहोत याची जाणीव त्या पाचही जणांना झाली.

सखाराम बोलला....खंडोजीराव,तुमची कथा लईच भारी वळणावर गेली हाय गड्या.
जित्रापांच आवाज बी वळकता येत्यात हि मातूर नवालच हाय...!

नवाल ?
नवाल नव्हे...महाआश्चर्य होते ते.
खंडोजी बोलून गेला.

सर्जा मध्येच थांबवून सखाराम ला बोलला...कारभारी हि कथा ऐकत लई लांब आलूया आपण..निदान खंडोजीराव निदान सांगा तरी अजून कितीसा दूर जायाचं हाय आपणासनी ?

खंडोजी बोलला...झालं..अजून एक दोन कोसावर जंगलात एक गुहा लागेल..!
तिथे पोहचला कि आमचे वस्ताद काका भेटतील.
तेच तुम्हाला पुढे शिवाजी महाराजांच्या खासगीत घेऊन जातील आणि तुमचे काम मार्गी लागेल..!

यावर मल्हारी बोलला...वस्ताद घेऊन जातील म्हणजे तुम्ही नाही का येत सोबत ?
खंडोजीकडे पाहत मल्हारी बोलला.

मी नाही येऊ शकणार गड्यानो...माफ करा.
मला माझ्या कर्तव्यात कसूर नाही करता यायची.
मी मोहिमेवर असलेला शिपाईगडी,अजून मला सावित्रीला शोधायची आहे.

पण,तुम्हाला मी वाट दाखवतो गुहेची...तिथं गेलात की मी,सावीत्री तुम्हाला भेटलो होतो हे सांगू नका काकांना.
विनाकारण आमची काळजी करत बसलेले असतात,उलट त्यांना सांगा...खंडोजी आणि सावीत्री आयुष्यभर स्वराज्य आणि भगव्यासाठीच जगतील... आणि त्यासाठीच मरतील..!
खंडोजी खिन्न पणे बोलला..!

पण,नकाच बोलू त्यांना की मी तुम्हाला इथवर आणले आहे.

यावर सखाराम बोलला..अहो,पण ते विचारतील ना की एवढया गुप्त वाटेने तुम्ही कसे काय आला ते ?

थोडा वेळ शांत राहून खंडोजीने त्याच्या दंडावर बांधलेली चांदीची पेटी काढली आणि सखाराम च्या हातात देत बोलला...वस्ताद काका काही विचारायच्या आत ही पेटी त्यांना दाखव आणि परवलीचा एक शब्द सांग त्यांना......"चंदन"

सखाराम ने ती पेटी जवळ घेतली आणि खंडोजीकडे पाहत बोलला...

बर मग आम्ही चौघेच जाऊन येऊ म्हणता वस्तदाना भेटायला ?

होकारार्थी मान हालवत खंडोजी बोलला ,होय सखाराम ..तुम्ही तुमची टकमकाची समस्या बोला त्यांना...ते लगेच तुम्हाला खाजगीकडे पत्र देऊन रवाना करतील.
तिकडे गेला की तुम्हाला शिवाजी महाराजांना भेटायला मिळेल आणि तुमची समस्यां कायमची सुटेल...!

हे ऐकताच चोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला...!

चला,अजून 1-2 कोस मी तुमच्यासोबत येतो,मग तिथून मी येऊ शकत नाही.
तुमचे काम झाले की मलाही सुटका मिळेल.
आता तुमचे काम ते माझे काम आहे असे वाटू लागले आहे...!

ते पाचही जण पुन्हा जंगलातील ती वाट चालू लागले...!

काही क्षण गेले आणि मल्हारी बोलला...खंडोजीराव पुढे काय झाले हो ,मगाशी सांगता सांगता थांबला....!

खंडोजी हसला आणि पुन्हा भूतकाळात रममाण झाला....!

बाजींद च्या फौजेचा भगवा ध्वज मला व सावीत्री ला धक्का देणारा होता.
तो ध्वज केवळ मराठ्यांची फौज वापरत होती आणि बाजींद तर भूतच आहे असे माझे आणि सावित्रीचे मत होते.
मग हा काय प्रकार असावा असे माझ्या मनात आले..!

मी मुजरा करुन होताच बाजींद माझ्या समोर आला..

आणि बोलू लागला..

खंडोजी राव...आम्ही तुम्हास व सावित्रीला ओळखतो,जणू काही आजवर आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत..!

सावीत्री...काल तुझ्या मागे भिल्ल होते आणि तू इथे आलीस तेव्हा तुझ्या हातावर शिरक्याचे चिन्ह पाहताच मी समजलो की तू शिरक्याची सावीत्री आहेस,आणि खंडोजी तुम्ही बहिर्जी नाईकांच्या खास मर्जीतले....!

हे सर्व ऐकताच खंडोजी व सावीत्री थक्क झाली.
आश्चर्याने ते बाजींद कडे पाहू लागले...खंडोजी बोलला...!

पण,तुम्ही कोण आहात ?
100 वर्षे झाली बाजींद च्या कथेला...तुम्ही भूत आहात ??

यावर हसत बाजींद बोलला...भूत ?
होय,जगासाठी आम्ही भुताची फौज आहोत.
भूत म्हणून जगण्यातच आमचे खरे वैभव आहे...!
पण,आम्ही भूत नाही.....!
तुमच्यासारखीच आम्हीही माणसे आहोत.
आम्हालाही 100 वर्षे ज्या गोष्टीसाठी असे जीवन स्वीकारले त्यातून मुक्ती पाहिजे खंडोजीराव,म्हणून आम्ही आजवर तुम्हा दोघांची वाट पाहतोय...!

काय ?
आम्हा दोघांची वाट पाहताय?
खंडोजी आश्चर्याने बोलला....!
मला खरोखर इथे काय घडतंय सांगा...तुम्ही आमची वाट पाहताय याचा काय अर्थ ?
मला जाणून घ्यायचे आहे सर्व...!

बाजींद शांतपणे बोलू लागला..........

त्या दिवशी हुसेनखान व त्याच्या फौजेने केलेली गद्दारी चंद्रगड च्या विनाशाला कारणीभूत ठरली होती.
नूरजहा आणि बाजींद दोघेही गतप्राण झाले होते...चंद्रगड च्या जंगलातील झाडून सारे प्राणी हुसेनखानाच्या फौजेचा बळी घेत होते.
चंद्रगड चे वैभव जळून खाक होत होते...!

दिवस उगवला....साऱ्या चंद्रगड ची मसणवाट झाली होती..!

कोणीही जिवंत नव्हते...ठायी ठायी गतप्राण झालेले वीर दिसत होते...तितक्यात एक पोरगासावळा मुलगा जखमी अवस्थेत बाहेर पडला...!

त्याचे सुर्यकांत नाव .......!

चंद्रगड च्या सरदेसाई घरण्यातलाच त्याचाशी जन्म..!
बाजींद चा चुलत भाऊ...बाजींद म्हणजे साऱ्या चंद्रगड ची शान होती...!
पण,आता सर्व संपले होते.

तो मुलगा हेलखावे खात बाजींद ला शोधू लागला,रात्रीच त्याची लवलवणारी तलवार त्याने पाहिली होती...!
दुरुनच ती चमकली आणि त्याने ओळखले, की बाजींद इथेच आहे...!

काळजातुन आरपार गेलेला बाण त्यांने ताकतीने उपसला...रक्ताचा धबधबा सुरु झाला आणि एक आर्त किंकाळी फुटली...!

सुर्यकांत ने जाणले की बाजींद जिवंत आहे.
त्याने धावत जाऊन पाणी आणले आणि बाजींद ला पाजले....बाजींद ने डोळे किंचित उघडले...एक क्षण त्याने सुर्यकांत कडे पाहिले...बाजूला गतप्राण होऊन पडलेल्या नुराजहाँ कडे पाहिले...त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.....त्यांने क्षणात गळ्यात बांधलेला ताईत काढला व तो सुर्यकांत च्या हातात ठेवला....एका विलक्षण अपेक्षित नजरेने तो त्याच्याकडे पाहत होता आणि डोळे उघडे ठेऊनच तो गतप्राण झाला...!

आपल्या हाती काय देऊन बाजींद गतप्राण झाला आहे,याचे आश्चर्य सुर्यकांत ला वाटले ,त्याने खूप लक्षपूर्वक तो ताईत हाती घेतला.
त्या ताईत च्या आत नक्कीच काहीतरी गूढ होते,त्याने त्या ताइतच्या आत असणारा एक कागद बाहेर काढला...!

त्यावर काही गूढ सांकेतिक चित्रलिपी मध्ये संदेश लिहला होता...!
त्याला काहीच समजत नव्हते,त्याने तो कागद तसाच जपून ठेवला व बाजींद आणि नुराजहाँ च्या पार्थिवाला अग्नी दिला..!
इतर हजारो मृतदेह तो एकटा 4-5 दिवस पुरत होता.

जंगलातील कंदमुळे खाऊन तो जगू लागला.
रोज रात्री झोपताना तो त्या कागदाचा अर्थ लावत होता पण समजत नव्हते...!

एक हत्ती....दोन वाघ....एक नागमोडी वळण घेतलेला साप....पाण्याचा धबधबा......आणि मुंग्यांचे वारूळ..!
बरोबर मध्ये एक सोनेरी रंगात वहीचे चित्र होते..!

ज्याअर्थी मरत असताना बाजींद ने ते त्याला दिले होते त्याअर्थी नक्कीच काहीतरी ते विलक्षण असणार म्हणून तो रोज ते पाहत असे....!

एके दिवशी तो जंगलात फळे,कंद गोळा करत होता आणि पाठीमागून वाघाची डरकाळी त्याच्या कानावर पडली....भीतीने सर्वांग थरारले...चुकून आपण वाघाच्या परिसरात पाऊल ठेवले असावे,त्याने त्वरित तिथून जाण्यासाठी मागे वळणार इतक्यात वाघाचे ते प्रचंड धूड समोरच उभे होते...!

त्याला पाहताच सुर्यकांत जिवाच्या आकांताने धावू लागला आणि धावता धावता तो एका ओढ्यावर बांधलेल्या लाकडी सेतुवर चढला आणि कडाड कड आवाज करत तो सेतु तुटला...तो ओढ्यात पडला आणि पोहत ओढ्याच्या किनारी लागला.

दम खात तो बसला होता,तेव्हा त्याच्या हाताला एक लालभडक मुंगी चावली...१,२,३,४.....१० हजारो मुंग्या तिथे होत्या....जणू ते जंगल मुंग्यांचे होते...त्या मुंग्यातून जायला एकच वाट होती...ती नागमोडी वाट पाहिल्यावर त्याला काहितरी आठवले...मुंग्या,नागमोडी वाट....क्षणात त्याला गळ्यात बाजींद ने दिलेला ताईत आठवला....त्याने तो काढला...तर बरोबर तसेच चित्र त्या कागदावर होते जसे समोर दिसत आहे....!

त्याने तो कागद समोर धरुन चालू लागला तर समोर एक गुहा दिसली ज्या गुहेवरून पाण्याचा धबधबा पडत होता......!

त्यांने त्या गुहेत प्रवेश मिळवला...अंधारी गुहेत तो धाडसाने चालू लागला.....खूप वेळ चालला आणि त्याला अंधारात दोन हिरे चमकल्याचा भास झाला....त्याने लक्ष देऊन पाहिले आणि अंगावर सर्दिशी काटा आला....ते दोन जिवंत वाघ होते....!

••● क्रमश ●••

बाजींद भाग क्र.१७ वा

बाजींद
भाग क्र.१७ वा.
~~~~~~~

हुंदका देत रडत असणाऱ्या सावित्रीच्या खांद्याला धरत खंडोजी निर्धारी शब्दात बोलला....

सावीत्री....रडू नको.
हा खंडोजी तुझ्या सोबत असताना बाजींद काय..साक्षात यम जरी आला तरी त्याला चार हात करावी लागतील या खंडोजी बरोबर...!

शिवछत्रपतींचा धारकरी आहे मी,आम्हाला भुते लागत नाहीत...उलट भुतानाच आम्ही लागतो.
या खुळचट मनाच्या कल्पना असतात साऊ... असे म्हणत खंडोजी ने तलवार उपसली आणि बोलू लागला...!

आता मला हा बाजींद व त्याचे झपाटलेले जंगल काय आहे याचा उलगडा केलाच पाहिजे..असे म्हणत तो उठला..!

त्याच्या नजरेत त्याच्या विचारांचा ठामपणा होता,दृढ निश्चय होता तो स्वतःच्या मनगटावर आणि चित्तात होते ते शिवछत्रपती.

ही हिम्मत,ही ताकत त्याच्यात आली होती ती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग जीवनप्रकाशामुळे..केवळ खंडोजीच नव्हे...त्यांचे सारे सारे सवंगडी उरात अशी जग जिंकायची उमेद ठेवत होते...!
मूर्तिमंत जिद्द,प्रेरणेचा झरा...महाराज शिवछत्रपती.

एव्हाना तांबडं फुटलं होत..!
त्याने पुढे होऊन रात्री ज्या आर्त किंकाळीने त्याचे लक्ष वेधून घेतले तिकडे मोर्चा वळवला.

समोरच एक मनुष्याचा देह गतप्राण होऊन पडलेला होता.
जरा निरखून पहिले अन जाणवू लागले की तो भिल्ल असावा.

कदाचित सावित्रीच्या पाठलागात तो इथवर पोचला असावा आणि "बाजींद" च्या येण्याने घाबरुन इकडे तिकडे लपला असावा व रात्री त्याला कोणीतरी ठार केले असावे...!

एक मोठा श्वास घेत खंडोजी ने सावीत्री चा हात धरला.
हातावर शिरक्याचे वैभवाचे प्रतीक उगवता सुर्य गोंदनाने गोंदले होता...!

खंडोजी बोलला...साऊ मला सांग...जर बाजींद तुझ्या समोर होता,तर त्याने तुला का ठार केले नाही ??

काहीशी घाबरत ती बोलली,

काल मी इथे पोहोचले आणि ती भयानक घटना घडली.
वेगवेगळी हिंस्त्र जंगली प्राणी किंचाळत होती.
मी क्षणात ओळखले की भिल्लांच्या भीतीने मी बाजींद च्या हद्दीत पाऊल ठेवले आहे.
आणि काल मी त्याला पाहिले.
घारे डोळे,कोवळी दाढी,अनामिक असे गूढ हास्य आणि सभोवतालच्या अणुरेणुचा स्वामी असल्याची एक प्रकारची मग्रुरी दिसत होती त्याच्या स्वभावात..!
माझी भीतीने गाळण उडाली होती,समोर दोन वाघ माझ्याकडेच येताहेत हे पाहताच मला मूर्च्छा आली..!
परत तो कुठे गेला मला काहीच आठवत नाही..!

जेव्हा जाग आली तेव्हा 2 भिल्ल अजूनही माझ्या मागावर होते,ते माझ्या शुद्धीवर येण्याची वाटच पाहत बसलेले होते.
मी सावध होताच वासनात्मक नजरेने ते हसू लागले,मी त्यांच्यावर हल्ला करत मागे पळून जाण्याचा तयारीत होते तितक्यात जंगलात पुन्हा जनावरांच्या किंचाळया पडल्या व माझ्याअगोदर तेच भिल्ल धाऊ लागले..!

धावता धावता मी इथे पोहोचले तर दुरुनच तुम्ही येताना दिसला आणि माझे हृदय अक्षरशः आनंदाने भरुन गेले,जणू माझे आपलं कोणी माझ्यासाठी इथवर आले आहे..!
मी क्षणात तुमच्या मागे येऊन तुमचे तोंड दाबत इथे लपवले आणि समोर या भिल्लाला कदाचित बाजींद किंवा त्याच्या जनावरांनी मारुन टाकले असावे...!

सर्व प्रसंग सांगत असताना सावीत्री गहिवरून रडू लागली अन खंडोजीच्या मिठीत विसावली..!
तिच्या आकस्मित मिठीने खंडोजीच्या सर्वांगातून जणू वीज थरारली...!
त्याने तिला समजवत तिची मिठी सोडवली...तो बोलू लागला...!

"साऊ... तुला पहिल्यांदाच पहिले अन आयुष्यात प्रेम कशाला म्हणतात याची अनुभूती आली.
तु बेरडाशी एकटी सामने गेलेले ऐकले आणि माझ्या हातातून काही सुटत आहे असे वाटू लागले आणि मी कोणताही विचार न करता मोहिमेवर असूनही कर्तव्य विसरुन तुझ्यामागे आलो...मी जर तुला जंगलातून घेऊन आलो नसतो तर तुलाही गमावून बसलो असतो आणि माझे कर्तव्य सुद्धा...!
माझे जितके तुझ्यावर प्रेम आहे तितकेच माझ्या कर्तव्यावर...असे म्हणत त्यानेही साऊ ला मिठी मारली...दोघेही काही क्षण तसेच उभे होते...!
माझ्यावर विश्वास ठेव..मी सर्व ठीक करेन..!

काही क्षण गेले आणि जंगलात पुन्हा बाजींद च्या येण्याची चाहूल लागली.
पशु पक्षी जनावरे किंचाळू लागली...!

सावित्रीने क्षणात खंडोजीचा हात धरला आणि म्हणाली...चला...जवळच गुहा आहे...लौकर बाहेर पडूया.... बाजींद च्या तावडीतून जिवंत राहणे सोपे नाही...!

धीराच्या शब्दात खंडोजी बोलला....
साऊ माझ्यावर विश्वास ठेव...मी सामने होते त्याच्या...साधले तर 100 वर्षाची तुमची कल्पना खोटी ठरेल..आणि तू म्हणतेस तसे खरेच निघाले..तर मात्र असा अनुभव माझ्या हेरखात्याला सांगेन...दोन्ही साधले जाईल..!

असे म्हणत तो जिकडून आवाज येत आहे तिकडे जाऊ लागला....!

दाट जंगलात किर्र झाडीत चित्रविचित्र आवाज येत होते..पुढे जाईल तसे आवाज तीव्र होत होते...आणि एक वळण घेतले तो पुढे ते विहंगम दृश्य दिसले..!

कमरेला तलवार अडकवून तो धीरगंभीर पुरुष एका मोठ्या दगडावर उभा होता..आसपास. जंगली जनावरे बसली होती...!

खंडोजी व सावीत्री ला पाहताच बाजींद ने स्मित हास्य केले आणि जोरात गर्जना केली....!

"स्वागत आहे योध्या ,तुझे मी माझ्या जंगलात स्वागत करतो...असे बोलत तो दगडावरून खाली झेपावला...!

खंडोजी ला काहीच समजेना काय घडत आहे ते...हे भूत असेल तर हवेत का उडत आले नाही...जर नाही तर 100 वर्षे जगलेच कसे...डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले...सावित्रीच्या तर हृदयाची घालमेल सुरु झाली...!

प्रसंगाचे गांभीर्य राखत खंडोजी ने तलवार समोरून चालत येत असलेल्या बाजींद वर रोखली...!
ते पाहताच पक्षी,कीटक आणि प्राण्यांनी पुन्हा जोरात आवाज वाढवला..वाघांच्या डरकाळ्या फुटल्या...पण शांत बाजींद ने हात वर केला तसे सर्व प्राणी शांत झाले....!

त्याने मोठ्या आवाजात एक गूढ आवाज काढला...तो एक सांकेतिक आवाज होता,क्षणात सारी जनावरे,पशु,पक्षी तिथून निघून जाऊ लागले...जंगल एकदम मोकळे भासू लागले..!

समोर चालत येत असलेल्या बाजींद ने पुन्हा दोन्ही हात वर केले आणि डोळे मिटून पुन्हा एक गूढ आवाज केला...क्षण,दुसरा क्षण...जंगलाच्या बाजूने शेकडो घोडेस्वार हातात तलवारी,भाले घेऊन हजर झाले..!

सारे जंगल स्वारांच्या गर्दीने भरून गेले...त्यातल्या एका स्वाराच्या हातात भव्य असा परमपवित्र"भगवा ध्वज" होता...!

खंडोजीने हातातील तलवार टाकली...तो पुटपुटला...भगवा जरीपटका ...?

ज्याच्यासाठी हजारो वीरांनी आयुष्याची होळी करुन ,रक्त सांडून हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली निर्माण केले...असा स्वराज्याचा भगवा ध्वज त्या स्वाराच्या हातात पाहताच...खंडोजी कमरेत झुकला....एक ...दोन...तीन....मानाचे तीन मुजरे त्याने त्या परमपवित्र ध्वजाकडे पाहून केले...!

•●●क्रमश●●•

बाजींद भाग क्र.१६ वा

बाजींद
भाग क्र.१६ वा.
वर्षानुवर्षे पावसाच्या केवळ एका थेंबाची तहान घेऊन आसुसलेल्या जमिनीवर एकाकी धुव्वाधार पावसाने सुरवात करावी,जमीनीच्या धुंद सुवासाने आसमंत दरवळून जावा आणि सारी सृष्टी तृप्त व्हावी...अगदी असेच काहीसे नुराजहाँ आणि बाजी च्या अंतर्मनात घडत होते.
एक आनंदाची अनामिक लकेर त्यांच्या सर्वांगात उठली होती.
एकमेकांच्या मिठीत स्वर्गीय सुखे अपुरी पडावीत अशी अवस्था....!

असेच काही क्षण गेले अन बाजी भानावर आला,त्याने नुराजहाँ चे बहुपाश मोठ्या मुश्किलीने सोडवले आणि एक स्मित हास्य करत बोलू लागला...!

राजकुमारीजी.. क्या जमीन और आस्मान कभी एक हो सकता है...?
माझी आणि तुमची भेट या जन्मात तरी शक्य आहे ?

यावर नुराजहाँ बोलली...!

क्यो नही राजाजी....नक्कीच...आजवर आयुष्यात जणू काही तुमचीच वाट पाहत मी जगत होते की काय असे वाटत आहे...!

दिघेही स्मितहास्य करत महाराज व हुसेनखान जिथे चर्चेत बसले होते तिथे पोहचले..!

एव्हाना सार्या गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.
सर्व गावकरी मोठ्या आनंदाने हुसेनखानांच्या फौजेच्या पाहूनचारात व्यस्त होते.!

आजची रात्र सारे इथेच मुक्काम करणार होते,व उद्या दिवस उगवण्याआधी गाव सोडून जाणार होते ते कायमचेच....परत कधीही चंद्रगडवर कोणताही बादशाही अंमलदार येणार नव्हता..!
चंद्रगड चे स्वातंत्र्य अबाधित राहणार होते...!
सर्व गावकरी आनंदात होते.

राजे चंद्रभान यांच्या महालात हुसेनखान सह बाजी व नुराजहाँ यांची चर्चा रंगली होती.

हुसेनखान बाजीला बोलला...!

राजाजी..आप जितने बहादूर है,आपके पिताजी भी आपसे ज्यादा बहाद्दर है...!
राजनीती के बारे मे इनके जैसा ज्ञान मैंने आजतक किसीसे नही सुना...!

हमे फक्र है,इस दख्खन की मूहीम मे हमे आप जैसे दोस्त मिले..!
जब हम आग्रा जायेंगे आपके लिये बादशाह से जरुर दरख्वास्त करेंगे...!

यावर राजे हसत उत्तरले....!

जरुर खानसाहेब...आजवर मोगलांच्या अन्याय,अत्याचाराच्या कथा ऐकत आम्ही मोठे झालो.
आपल्यासारखा नेकदील सिपेसालार भी मोगल फौज मे हो सकता है...सचमुच हम सारे हैराण है...आपकी दोस्ती का कर्ज हम चंद्रगड के लोग कभी नही भुलेंगे...!

सर्व हसत उठले...!

बाजी राजे..क्यो न आप हमारी बेटी को आपका चंद्रगड नही दिखा लाते...!
आपकी जानवरोन की भाषा का रहस्य जरुर बताईये..!
हम और राजसाब अभी खूब बाते करेंगे..!

नक्की खानसाहब...हम राजकुमारीजी को चंद्रगड घुमाकर लाते है...शाम होणे तक हम लौट आयेंगे..!

असे म्हणून बाजी व नूरजहा निघून गेली..!

आपल्या "पक्षा" घोड्यावर मांड ठोकली आणि नुराजहाँ ने तिच्या घोड्यावर मांड ठोकून ते दोघेही दौडत चंद्रगड च्या जंगलात निघाले....!

बाजी च्या जंगलात येताच सर्व पशु पक्षी जनावर कीटकांनी एकच कल्लोळ माजवला...!

जे ते त्याच्या जवळ येऊ लागले...!

त्या जनावरांना पाहून बाजी स्मित हास्य करत नुराजहाँ ला बोलला.....!

राजकुमारीजी हे सर्व माझे सवंगडी पहा...यांच्याशिवाय मी काहीच नाही.
माझा दिवस-दीवस या सर्वांच्यासोबत जातो.
चंद्रगड ची खरी दौलत म्हणजे ही जनावरे आहेत...या सर्वांची भाषा मला समजते.
यांचे सुख दुःख सर्वकाही हे मला सांगतात व मी त्यांची माझ्या माझ्या परीने मदत करतो..!
खूप मजा येते यांच्यासोबत जीवन जगण्यात...!

यावर आश्चर्य व्यक्त करत नुराजहाँ बोलली...पण राजसाहब...या हिंस्त्र पशूंची भाषा तुम्हास कशी काय अवगत आहे ?
खरोखर हा केवळ चमत्कार आहे.
एखाद्या देवदूतालाच ही भाषा समजु शकते..खरोखर आम्ही सर्व तुमच्यापुढे नतमस्तक आहोत.

यावर हसत बाजी उत्तरला.
काही नाही राजकुमारी...एकदा एकमेकांची मने समजू लागली की जगातल्या सर्व भाषा एकच आहेत याची अनुभूती येते..!
प्रत्येक प्राण्यांचे एक वेगळे विश्व असते,प्रत्येकाला समस्या,संकटे असतात...पण मन मोकळे करायला कोणीच नसते...ज्याला आपले आपले म्हणत असतो...ते सुद्धा आपल्या माणसांची मने ओळखायला अपुरे असतात..!
बघा ना...हा ची ची करणारा प्रचंड हत्ती..पण मनाने खूपच हळवा आहे....बिचारा सर्व गोष्टी मला सांगत असतो.
हे वाघ,सिंह,सर्प,विंचू....सर्वच्या सर्व बोलू शकतात.
त्यांनाही मन आहे...फक्त मनुष्य आणि ते यांच्यातील अहंकाराचा अभेद्य पडदा जोवर लंघून आपण पुढे जात नाही...तोवर..बोलणाऱ्या माणसांचीही मने आपण समजू शकणार नाही.....!

त्यांच्या दोघांची ही चर्चाच सुरु असतानाच एक घार उंच आकाशात घिरट्या घालत घालत मोठ्याने आवाज करत खाली येऊ लागली आणि बाजींच्या अंगावर सर्दिशी काटा आला...त्याने कान टवकारून त्या घारीकडे पहिले आणि बेभान होऊन तो पक्षा घोड्यावर स्वार झाला आणि बेताल दौडत चंद्रगड च्या वाटेला लागला...!

त्याच्या पाठोपाठ नुराजहाँ पण निघाली...तिला काही समजेना की बाजी असा बेभान होऊन का निघाला आहे...ती त्याला हाका मारत होती ,पण काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता..!

त्याला घारीच्या एकसारख्या ओरडण्याचा अर्थ समजला होता......बाजी...तुझ्या चंद्रगड ची राखरांगोळी उठली आहे.
हजारो पठाण एका दिवसात जंगल पार करुन तुझ्या राज्यावर तुटून पडले आहेत...तुझी माणसे मरत आहेत....तुझ्या गावात आलेला हुसेनखान तुझा मित्र नसून तुझा घात करायला आलेला तुझा शत्रू आहे..."

बाजी च्या डोळ्यात आग होती.
त्याचे दौडणे बेभान झाले आणि लांबूनच लोकांच्या गगनभेदी किंचाळया त्याच्या कानी पडल्या...असंख्य लोक मोगली तलवारीखाली कापले गेले होते...शेकडो पठाण हातात नंग्या तलवारी घेऊन मुलाबाळांच्या कत्तली करत होते.
बाजी चा राहता महाल पेटला होता....सारे नष्ट झाले होते..!
राजे चंद्रभान हे हुसेनखानाशी लढता लढता गतप्राण झाले होते....!

काहीच शिल्लक नव्हते...केवळ मोगली अत्याचार दिसत होता...!

बाजी च्या डोळ्यात आता रक्त उतरले होते...समोर ते धिप्पाड मोगली हशम हातात रक्ताळलेल्या तलवारी घेऊन चंद्रगड वासीयांची कत्तल करत होते.
गोड बोलून आपला व आपल्या वडिलांचा केलेला हा विश्वासघात त्याला जिव्हारी लागला होता.
बाजी ने कमरेची तलवार उपसली आणि तुफान दौडत असलेल्या घोड्यावरून झेप टाकली ती सरळ समोर कत्तल करत असलेल्या हशमाच्या छातीवर.

तलवार छातीतून आरपार करत बाजी ने आकाशाकडे पाहत एक गगनभेदी किंचाळी फोडली आणि समोर दिसेल त्याचे तुकडे करु लागला..!

सळसळत्या नागिणीसारखी तलवार फिरू लागली आणि जो आडवे येईल त्याची खांडोळी उडू लागली.
बाजी ने केवळ एकट्याने तुफान कत्तल मांडलेली पाहून नुराजहाँ ने सुद्धा समशेर उपसली आणि तिनेही लढा सुरु केला.
आता हि लढाई केवळ बाजी ची नव्हती...तिची सुद्धा होती.
प्रत्यक्ष तिच्या बापाने असा घोर विश्वासघात केलेला तिला मनस्वी दुःखी करून गेला होता.
आता मरण आले तरी बाजी सोबत मरायला ती सिद्ध झाली आणि तिची समशेर तिच्याच फौजेचे रक्त पिऊ लागली..!

बाजी च्या किंचाळन्याने जंगलातील सर्व प्राणी चंद्रगड कडे दौडू लागली.
विषारी सर्प,काटे फेकणारी साळींदर, चित्ते,वाघ,सिंह,अस्वले,हत्ती...शेकडो प्राणी आपल्या जिवलग मित्रासाठी चंद्रगड वर तुटून पडले....आणि बाजी च्या एकाकी लढ्याला बळ मिळाले...!

हत्तीच्या पायाखाली कलिंगड फुटावे तसे मोगली सैनिकांची मुंडकी फुटू लागली.
सर्पां चावल्याने तोंडात फेस येऊन सैनिक मरु लागले...!
वाघ सिंह तर चिंध्या फाडाव्यात तशी माणसे फाडून टाकू लागळी.
साळींदराची काटे गळ्यात घुसत प्राण घेऊ लागली...!

आणि बाजी व नुराजहाँ ची तलवारी तुफान कत्तल करु लागली.

बघता बघता निम्म्यापेक्षा जास्त फौज कत्तल झाली होती.
जवळपास दोन तास चाललेले हे महाभयानक थरारनाट्य आता रंगात आले होते.

नुराजहाँ पुरती दमली होती.
तिच्या सर्वांगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या.
तिला चक्कर आली आणि ती तोल जाऊन पडली.

कत्तल आणि मरणाच्या भीतीने सारी फौज डोंगरवाटेने पळू लागली आणि बाजी चे लक्ष नुराजहाँ कडे गेले..!

त्याने क्षणात तलवार टाकली आणि तिची मान आपल्या हाती धरुन तिला सावध करु लागला...!

आता तिच्याशिवाय बाजी चे कोणी नव्हते....ती सावध झाली.

प्रचंड जखमेने रक्त खूप गेले होते..!

ती बोलू लागली.....राजे,मला माफ करा.
माझ्या वडिलांनी तुमचा क्रूर विश्वासघात केला ,तुमच्यासाठी मला मरण आले,मी माझे पाप माझ्या रक्ताने धुवून जात आहे......तुमच्यासारखा वीर मी आजवर पहिला नाही....तुम्ही बाजी नाही...तर बाजींद आहात....बाजींद....बाजींद....!

असे बोलत नुराजहाँ ने डोळे मीटले...!
साऱ्या चंद्रगड बरोबर आयुष्यात प्रथमच केलेले प्रेमही बाजींच्या आयुष्यातून कायमचे गेले म्हणून तो उठून उभा राहून जोरजोराने रडू लागला....!

इतक्यात एक बाण सु सु  करत आला आणि त्याने बाजींच्या छातीचा वेध घेतला......!
गतप्राण होऊन बाजींचे तो देह खाली कोसळला.

सारे संपले.

तेव्हापासून ते आजतागायत हे जंगल शापीत झाले आहे.
इथे येणारा प्रत्येक माणूस आजवर जिवंत माघारी गेला नाही.
आज 100 वर्षे होऊन सुद्धा बाजींद चे भूत या जंगलात भटकते..!

केवळ आम्हीच नव्हे तर मोठमोठे सत्ताधीश सुद्धा बाजींद च्या जंगलात पाऊल ठेवत नाही...!

आणि आज केवळ तुमच्या अल्लड पणामुळे एका भयानक संकटात आपण अडकलो आहोत...आपण आता बाजींद च्या जंगलात आहोत...आपले मरण नक्की...!

सावीत्री मोठ्या चिंतेत हि सारी कथा खंडोजी ला सांगत होती आणि तो लक्षपूर्वक ते ऐकत होता...!

•●●क्रमश●●•
~~~~

बाजींद भाग क्र.१५ वा.

•••••••••••••••••••••••••••••••
:
भाग क्र.१५ वा..!
~~~~~~~~~~
समोर काय आक्रीत घडत आहे हे खुद्द बाजी ला सुद्धा समजत नव्हते.
केवळ कुतूहल,करमणूक म्हणून वन्य प्राण्यांशी आजवर त्याने संवाद साधला होता,ते वन्य प्राणी आज त्याच्यासाठी धावून आलेच पण चंद्रगड वर आलेल्या आस्मानी संकटाला त्याच्या पायाशी लोळण घ्यायला लावत होते हे पाहून तो मनोमन थक्क झाला होता...!

एक श्वास घेत त्याने समोर गुडघे टेकून तलवार दोन्ही हातात आडवी करुन मान झुकवून बसलेल्या हुसेनखानाच्या दोन्ही खांद्याना धरुन उठवले व बोलू लागला...उठिये खांनसाहेब..किसीके सामने झुकना एक वीर को शोभा नही देता...और आप तो महावीर है..!

बाजींचे ते आपुलकीचे बोलणे ऐकून हुसेनखानाने तलवार फेकून देऊन बाजी ला मिठी मारली....तो बोलू लागला..

काबुल से लेकर कंदाहार तक,और काश्मीर से लेकर कन्याकुमारी तक मेरी पुरी जिंदगी जँग मे चली गयी लेकिन आप जैसा तीलस्मी सुरमा बहाद्दर नही देखा जिसके एक इशारो पे माशाअल्ला जंगल के बेरहम जानवर भी चूप हो जाते है... अल्लाह के शरीफ बंदे कौन है आप ?

बाजी गालात किंचित हसला व बोलू लागला...

खानसाहब.. मै राजे चंद्रभान सरदेसाई का पुत्र बाजी सरदेसाई हु...चंद्रगड सलतनत का रखवाला...!

चंद्रगड.....मै तो समझा था की चंद्रगड जैसी मामुली सलतनत के लिये बादशाह हमे भेज कर मेरा अपमान कर रहे है...लेकिन आप जैसे सुरमा से मिलकर मेरा यह भरम टूट गया....आज से केवल चंद्रगड ही नही ये पुरा इलाका आज से आपका है...आ जाओ हमारे गले लग जाओ...!

दोन्ही वीरांची कडकडून मिठी झाली आणि दोघेही शाही तंबूत गेले.
जनावरांच्या हल्ल्यात शेकडो मेलेली प्रेते एका बाजूला,जखमी एका बाजूला अशी प्रतवारी करत विल्हेवाट व उपचार सुरु झाले.

नुराजहाँन ही हुसेनखानाची लेक.
हुसेनखानाला मुलगा नसल्याने त्याने आपल्या मुलीला मुलासारखे वाढवले होते.
मोगली मोहिमेत नूरजहान स्वता वडिलांच्या सोबत येत असे.
तिला तर रात्रीच्या प्रकरणाचा खूप धक्का बसला होता.
वरवर शांत,हिरवेगार दिसणारे हे जंगल किती महाभयानक आहे तिचा प्रत्यय तिला आला होता.
मोगलांची शूर सेना ते राक्षसी हत्ती सोंडेने उचलून धुणे आपटतात तसे आपटून मारत होते,वाघसिंहांनी कित्येक वीरांच्या नरडीचा घोट घेतला होता,काळवीटाची शिंगे पोटातून आरपार जाऊन आतडीच बाहेर काढत होता,कित्येक अजगरे सैनिकांना पिळखा देऊन हाडांचा चुरा करत होते,कित्येक अस्वलांची नखे हृदय फाडून हातात घेत होती...साप,विंचू कीटकांची तर किती शिकार झाली असतील त्याची मोजदाद नव्हती.
आणि ती क्रूर जनावरे किंबहुना किडे मुंगी साप सुद्धा ज्याच्या आज्ञेने माघारी गेले तो "बाजी" काय प्रकार असेल असा विचार करत ती उभी होती.

जिवाच्या भीतीने त्या रात्री कित्येक सैनिक बिथरले होते,त्यांना धीर देण्याची ती काम करत होती तितक्यात खुद्द बाजी तिथे आला,आणि त्याला पाहून पुढचे सैनिक भीतीने पळूनच गेले....!

बाजी ला पाहताच नुराजहान ने पदर सावरत मागे हटली....!

बाजी बोलू लागला....

आप औरत होकर इतनी अच्छि तलवार चलाती है..यह देखकर हम बहुत खुश हुये....!
आमच्या पुऱ्या हयातीत एखादी स्त्री सुद्धा इतकी अप्रतिम लढू शकते हे पाहून खरोखर नवल वाटले..."

शुक्रिया...पण काल रात्री आम्ही तुमची जी करामत पहिली ती केवळ दैवी करामत होती...कुठून शिकलात ही विद्या...?

नूरजहान चे मराठीवर प्रभुत्व पाहून बाजी आश्चर्याने बोलला....तुम्ही मराठी सुद्धा बोलता हे नवल आहे...!

नूरजहान बोलली...हो माझ्या खूप मैत्रिणी मराठी आहेत व गेली 5 वर्षे महाराष्ट्रात आहे...मराठी बोलू,समजू शकते मी...."

खूप छान....तुमची तलवार आणि भाषा दोन्हीही आम्हाला आवडल्या...आमच्या गावचा आपण पाहुणचार स्वीकारावा यासाठी मी आपणास आमच्या गावी चंद्रगड ला तुम्हास व तुमच्या वडील फौजेसह उद्याचे आमंत्रण देतो..!

किंचित लाजून ती बोलली...जरुर...आम्ही सर्व येऊ..असे बोलून ती निघून गेली...!

बाजी ने दस्तुरखुद्द हुसेनखानला फौजेसह गावात येण्याचे आमंत्रण देऊन बाजी त्याच्या पक्षा घोड्यावर त्याच्या अंगरक्षकासह दौडत गेला....!

इकडे सारे चंद्रगड राजे चंद्रभान च्या महाला समोर गोळा झाले होते.
रात्रभर गगनभेदी किंचाळ्यांनी साऱ्यांच्या काळजाचा ठाव घेतला होता.
4 हजाराच्या विरुद्ध शे दोनशे धारकरी कसे टिकणार ?
रात्रीच फन्ना उडाला असणार अशी काळजीची कुजबुज सुरु झाली होती.
आता सारे संपणार...300 वर्षे रक्ताचे पाणी करुन स्वाभिमान जपत मानाने चंद्रगड चे स्वातंत्र्य अबाधित ठेवलेले चंद्रभान व त्यांचे वंशज त्यांच्या त्यागाची हि निर्वाणीची वेळ..!
उद्या हुसेनखान व मोगली फौजेचा लोंढा चंद्रगड वर कोसळणार आणि सारे सारे नष्ट होणार..!
डोळ्यांच्या कडा ओलावत, आवंढा गिळत,मोठा श्वास घेऊन राजे चंद्रभान सार्या गावकर्यांना उद्देशून बोलले.

"गड्यानो,प्रसंग बाका आहे.आपला स्वाभिमान,स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर आता सर्वांनी हातात शस्त्रे घ्या...जर जिंकाल तर इतिहासात अमर व्हाल आणि हारलात तर हुतात्मा व्हाल...आपली तरणी ताठी पोर काल त्या छावणीवर तुटून पडली...त्यांचे जीवाचे काही बरे वाईट झाले असेल आणि नसेल ही... आपण सर्वांनी मरेपर्यंत लढायचे....बोला....आहे मंजूर ????

मंजूर....मंजूर.....

सारा गाव एका सुरात बोलला आणि तितक्यात चंद्रगड च्या समोरच्या डोंगरातून धुळीचे लोट उडू लागले...चौताड थडाडत घोड्यांच्या टापा कानावर येऊ लागल्या....सर्वांनी नजर रोखून पाहिले आणि काळजातून आनंदाची लकेर उडाली.......बाजी......बाजी....बाजी.......!

राजे चंद्रभान धाय मोकलून रडू लागले...त्यांना विश्वास बसेना की दौडत येणारे अश्वपथक चंद्रगड च्या विजयाचे निशाण आकाशात फडफड करत येत होते....!

सारा गाव त्यांच्या स्वागताला पुढे गेला.......

बाजी व त्याचे सहकारी गावातील मुख्य प्रवेशद्वारातून आत आले आणि गावकऱ्यासमोर घोड्यावरून पाय उतार झाले.
सुवासिनी हळद कुंकू लावून त्यांचे औक्षण करु लागल्या....गावकरी फुले उधळू लागली....!

चंद्रगड चे स्वातंत्र्य अबाधित राखून विजयाची परंपरा प्रतिकूल परिस्थितीत कायम ठेवत वाघासमान चालत आणि सार्या गावचे अभिनंदन स्वीकारत बाजी चंद्रभान राजांच्या दर्शनाला निघाला.....!

बाजीने वडिलांचे दर्शन घेतले व सविस्तर घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला.
चंद्रभान ला विश्वास बसेना की उद्या हुसेनखान फौजेसह आपल्या गावात भोजनास येणार आहे.
त्यांने सर्व गावकर्यांना बोलावून उद्या भोजनाचे नियोजन करायचा आदेश दिला...!

दिवस उगवला ,कोंबड्याने बांग दिली आणि चंद्रगड च्या समोरच्या डोंगरावरून चांद सितारा असलेला मोगली ध्वज व मागे समुद्रासारखी मोगली फौज दिसू लागली....!

सारा गाव आनंदात होता,येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात जे ते व्यस्त होते...!

आणि मजल दरमजल करत हुसेनखान मोगली फौजेसह चंद्रगड मध्ये डेरेदाखल झाला.
गावाला यात्रेचे स्वरुप आले.
प्रत्येक गावकरी तळमळीने आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होता.

हुसेनखान व नूरजहान राजे चंद्रभान यांच्या महालात आदरातिथ्य स्वीकारत गेल्या.
शिंग,तुताऱ्या,हलगी या मराठ्मोठ्या पद्धतीने त्यांचे स्वागत झाले.
राजे चंद्रभान व हुसेनखान यांच्या राजकीय चर्चेला रंग चढला....!

बाजी ने नूरजहान ला सारा महाल फिरवून दाखवला.

नूरजहान बोलली....राजाजी,तुमच्या पाहूनचाराने आम्हाला आमच्या आईची आठवण झाली.
खूप चांगले लोक आहेत तुमच्या गावात,आम्ही हा तुमचा पाहूनचार कधीही विसरणार नाही...!

नूरजहान च्या बोलण्याने बाजी किंचित हसला व बोलू लागला.....

पाहुणा हा चंद्रगड वासियांना देव असतो,आणि देवाचा पाहूणचार करणे हे पुण्याचे काम आहे...!

दोघांचीही नजरेला नजर भिडली आणि एका अनामिक आकर्षणात दोघेही बांधले गेले,आणि दुनियेचा विसर पडला,दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले....देहभान विसरुन ते क्षणभर तसेच बाहुपाशात अडकले गेले होते...!
जगाचा त्यांना विसर पडला होता....शरीरे दोन मात्र मने एक झाली होती...एक अशी अनुभूती ज्यात आता मिळवायचे असे काहीच राहिले नाही असा अनुभव येतो....यालाच प्रेम म्हणतात का ?
नक्कीच....प्रेम प्रेम म्हणतात ते हेच....आयुष्यात ज्याने केले आहे त्यालाच हे समजणार...!
नाही..बिलकुल नाही...ज्याने कधी केलेच नाही फक्त त्यांनाच हे समजणार....!


••● क्रमश ●••
बाजींद

बाजींद भाग क्र.१४ वा

बाजींद
भाग क्र.१४ वा..!

~~~~~~~~
"चंद्रगड"

एक हजार दोन हजार लोकवस्तीचे गाव.
महाबळेश्वर महादेवाच्या घनदाट अरण्यातील शेवटचे टोक.
सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात बिकट अडचणीत वसलेले हे गाव.
अशा घनदाट अरण्यात राहण्याचे धाडस केवळ वाघातच असते.
चंद्रगड ची माणसे पण काही वाघापेक्षा कमी नव्हती.
अश्या हजार दोन हजार वाघांचा म्होरक्या होता चंद्रभान सरदेसाई..!

बाराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली समाधिस्त झाल्या आणि सर्व महाराष्ट्रावर जणू अवकळा पसरली.
राजे रामदेवराय यादवांचा वैभवसंपन्न महाराष्ट्र गनिमांच्या परकीय सत्ताधाऱ्यांच्या टोळधाडींची रतीबाने शिकार होऊ लागला.
कर्तृत्ववान मनगटांची कित्येक राजघराणी परकीय सत्तेची मांडलिक बनू लागली.!
सत्ता,जहागिरी,स्वार्थ यासाठी स्वकीयांच्या माना तलवारीने उडवणे म्हणजे पोरखेळ होऊ लागला होता..!
स्वाभिमान,स्वत्व नावालाही शिल्लक नव्हते असे म्हटले तरी वावगे ठरणार नव्हते.

पण अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळचे क्षत्रिय तेज असणारी काही छोटी छोटी राजघराणी आजही महाराष्ट्रात नावापुरते का होईना आपले अस्तित्व टिकवून होती.
आजून परकीय किंवा स्वकीय मांडलिकांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या नव्हत्या...आणि पडल्याही असत्या तरी ही घराणी स्वाभिमानासाठी मरणही पत्करणारी होती.

अशा अगदी बोटावर मोजण्याइतपत शिल्लक असणाऱ्या राजघराण्यापैकी एक छोटेसे घराणे होते...चंद्रगड चे सरदेसाई घराणे..!

चंद्रभान सरदेसाई म्हणजे गावातील प्रमुख कारभारी.
गनिमांचा अन्याय,अत्याचार राजे चंद्रभान ऐकून होते.
म्हणून त्यांनी गावातील शे पाचशे तरुण पोरांची फौज तयार केली होती.
गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचे अतिप्राचीन मन्दिर गावात होते,त्याच्या मागे भव्य तालीम उभी केली होती.
त्यामध्ये कुस्ती,तलवार,भाला,गदा,धनुष्य यासह अनेक युद्धप्रकारचे प्रशिक्षण सुरु होते...!

बाजीराव सरदेसाई हा चंद्रभान सरदेसाई यांचा तरुण मुलगा.
आपल्या गावावर,देवावर,वाडीलांच्यावर त्याचे खूप प्रेम होते.
ऐन तारुण्यात कुस्तीसह इतर युद्धकला त्याने लीलया आत्मसात केल्या होत्या.
नेहमी स्वप्नात वावरणाऱ्या बाजी ला एकटे राहणे खूप आवडत असे.
दिवासदीवस भर घनदाट जंगलात तो फिरत असे.
वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचे आवाज त्याला समजू लागले होते.
पशुपक्ष्यांच्या अदभूत दुनिया तो समजून घेऊ लागला होता.
किडा,कीटक मुंगी पासून ते क्रूर वाघ सिंहासारखे हिंस्त्र पशूंची गूढ भाषा त्याला अवगत झाली होती.
चिमणा चिमण्यायांचे भांडण सुद्धा त्याला समःत असे.
अस्वले,हत्ती सारेच त्याच्या ओळखीचे बनले होते.

सुर्य उगवण्याआधी बाजी उठत असे.
अंघोळ पाणी आवरून तालमीत कुस्तीचा सराव करत असे..अगदी दोन दोन तासांची लढत झाली की मग जोराचा ठेका सुरु होत असे.
जोराचा आकडा पाच हजार ओलांडत असे मग कुठेतरी त्याला दम लागत असे.
त्यानंतर तलवारीचे हात,दांडपट्टा याचा सराव झाला की शेरभर तुपातला शिरा न्याहारीला येत सोबत पाच शेर देशी गाईचे आकरी दूध रिचवून बाजी धनुष्यबाण अडकवून आपल्या आवडत्या "पक्ष्या" घोड्यावर मांड ठोकून जंगलात जात असे...!

आणि जे व्हायचे तेच झाले.
गनिमांची नजर या चंद्रगड वर पडली.
चंद्रगड मारल्याशिवाय तळकोकणात जाणे अवघड होते हे जाणून मोगली सरदार हुसेनखान हा त्याच्या चार हजार कडवट स्वारासह आणि कुटुंबकबिल्यासह उतरला होता.

हुसेनखान ची खबर त्वरित चंद्रभान ला समजली आणि त्याने त्वरित बाजी व सहकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.
आता आपले गाव गनिमांची खास शिकार होण्याच्या भीतीने चंद्रभान हतबल होऊन बोलू लागला.
चार हजार सैन्यापुढे आपला टिकाव लागणे अवघड आहे त्यामुळे त्याच्या सैन्यात फूट पाडून त्याला जंगलात संपवणे हे उचित होईल त्यामुळे बाजी ला या कामाचा विडा दिला गेला.
बाजी ने आपल्या वडिलांना धीर देत आपण ही कामगिरी चोख बजावू अशी ग्वाही दिली.

बाजी ने त्याच्या विश्वासातील शंभर चिवट धारकरी निवडले आणि मध्यरात्री हुसेनखानाच्या छावणीत घुसायचे ठरवले..साधलेच तर खुद्द हुसेन ला ठार करु आणि मागे येऊ असा बेत ठरऊन ते 100 वीर वाघाच्या काळजाने निघाले.
काळा पोषाख, तलवार घेऊन ती 100 भुते जंगलाची वाट चालू लागली.

दरम्यान छावणी जवळ आल्याची चाहूल लागली.
मोगली चंद्रचांदणी चा ध्वज फडकत असलेली छावणी हुसेनखानाची आहे असे बाजीने ताडले आणि सर्व धारकर्यांना वेगवेगळी कामे सांगून स्वतासोबत 5 अंगरक्षक घेऊन तो स्वता छावणीकडे निघाला.

छावणी जवळ आली आणि त्याने मांजराची पावले टाकत, परिस्थितीचा अंदाज घेत छावणीच्या मागून चाल करायचे ठरवले.
छावणीच्या जवळ पोहचल्यानंतर बाजी ने कमरेची तलवार उपसली आणि छावणीच्या कणातीत घुसवून आत घुसला...!

हुसेनखान कुठे झोपला असावा याचा अंदाज बांधत त्याने तंबूच्या एका विभागात पाऊल टाकले तितक्यात मागून कोणीतरी त्याला घट्ट पकडले..!
क्षणात ती मिठी सोडवून त्याने समोरासमोर पवित्रा घेतला आणि समोर तोंड बांधलेला एक हशम दिसला आणि त्यांची लढाई ऐन तंबूतच जुंपली.

तलवारीच्या खनखनाटने सारी छावणी जागी झाली आणि तंबू कडे धाऊ लागली.

बाजी ने बगल देताच पुढचा हशम झुकला आणि तितक्यात त्याने आपली तलवार त्याच्या तोंडावर बांधलेल्या अवलानात घुसवली आणि ते कापड फाडले......तो हशम नसून एक स्त्री आहे हे बाजी ने पहिले...!
तिचे केस विस्कटले गेले आणि मशालीच्या उजेडात तिची सतेज कांती आणि बोलके डोळे दिसले आणि बाजींच्या हृदयाचा ठाव घेतला...!

आपण लढाईत आहोत याचे भान हरपून तो तिचे मूर्तिमंत सौंदर्य न्याहाळू लागला...इतक्यात शेकडो हशम एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले आणि दोरखंडाने त्याला बांधून मैदानात आणले गेले.

हुसेनखान स्वता युद्धाचा पोषाख घालून हातात नंगी तलवार घेऊन बाहेर आला आणि त्या स्त्री ला उद्देशून बोलला...बहुत खूब नूरजहा... हमे फक्र है की आप हमारी बेटी हो...!

बाजी ला कळले की ती मुलगी हुसेनखान ची मुलगी आहे.

चवताळलेल्या हुसेनखानाने रागाने बाजीकडे पाहत त्याची समशेर त्याच्यावर रोखली तितक्यात सारी छावणी थरारली.

साऱ्या जंगलात किडा,कीटक,साप,मुंगी पासून हत्ती,सिंह,वाघ एकाच वेळी प्रचंड गर्जना करत बाहेर पडले आणि समोर जो जो दिसेल तो तो त्यांची शिकार होऊ लागला.

हुसेनखान ला समजेना समोर काय होत आहे.
त्याची शूर फौज साप चावून, हत्तीच्या पायाखाली,अस्वलांच्या हल्लात ,वाघाच्या तोंडी मरु लागली...उरलेली वाट दिसेल तिकडे पळत सुटली....सारी फौज अस्ताव्यस्त होऊन गेली.....!

काय घडत आहे बाजीला सुद्धा समजेना...एकटा तो सोडून सर्वाना कीडा मुंगी चावत होत्या....क्षणात एक हिंस्त्र वाघ छलांग मारत नूरजहा च्या समोर आला आणि तिच्यावर हल्ला करणार इतक्यात बाजी सावध झाला आणि क्षणात एका हाताने त्या मुलगी ला बाजू करत आपली तलवार त्या वाघावर रोखली....!

बाजी ची तलवार पाहताच त्या वाघाने सपशेल माघार घेतली.
हे पाहताच बाजी ला नवल वाटले...तो सर्वत्र पाहू लागला...ही सारी जनावरे माझ्यासाठी इथवर आली आहेत याचे त्याला खूपच नवल वाटले...!
त्याने पुढे होऊन सर्वांच्याकडे पाहत जोरात आरोळी ठोकली..."थांबा".....!

त्याचा तो गगणभेदी आवाज ऐकून सारे पशु पक्षी स्तबद्ध झाले...हे पाहताच हुसेनखान सुद्धा भारावून गेला...!

चला मागे...जावा निघून...यांना आपली चूक समजली आहे....जावा निघून...!

बाजीचे हे शब्द ऐकताच सर्व सर्व किडा कीटक मुंगी,सर्प,हत्ती,वाघ,अस्वल,सिंह जसे आले होते तसे निघून गेले ....!

एव्हाना हुसेनखानाची निम्म्यापेक्षा जास्त फौज मृत्युमुखी पडली होती,उरलेली जखमी होती...!

या हिंस्त्र प्राण्यांना केवळ शब्दाने मागे घालावंणारा हा वीर कोण याचे कुतूहल हुसेनखानाला लागले होते.
त्यांने बाजी च्या रुपात दैवी अवलीयाला पाहिले आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याच्या समोर नतमस्तक होऊन तलवार आडवी धरली...!

बोलला...ज्याच्या केवळ नावाने मोगली दरबारातील मोठमोठे सरदार अदबीने झुकतात, ज्याची तलवार शत्रूचे रक्त पिऊन मगच म्यानात जाते असा मी हुसेनशहा महम्मदशाही तुझ्यासारख्या विरासमोर शरण जात आहे....!

क्रमश

बाजींद भाग क्र.१३ वा..

:
भाग क्र.१३ वा..!
~~~~~~~~

~~~~~~~~
भिल्ल जाग्यावर गतप्राण झाला.त्याच्या छातीत घुसलेला खंजीर उपसून तो कमरेला लावत खंडोजी ने त्याला खाली ठेवले.
सावधपणे चौफेर नजर फिरवत खंडोजी विचार करु लागला......"बाजींद"...काय असेल हे बाजींद...?

एव्हाना सुर्य मावळतीकडे झुकला होता,संध्याकाळच्या संधीप्रकाशाने जंगलातील झाडे झुडपे सुवर्णाची झळाळी मारत होती..!
एक दीर्घ श्वास घेऊन खंडोजी ने पायात घुसलेल्या बाणामुळे झालेल्या जखमेची वेदना सहन करत त्याला जंगलातील पाला बांधला...!

तो चालत जंगलाच्या बाहेर आला,मृत भिल्लांचे शव उचलून एका बाजूला ठेवत तो नदीच्या पात्राकडे पाहू लागला ?
मनात विचारांचे काहूर माजले.
सावीत्री कुठे गेली असेल..?
हे भिल्ल जिवाच्या आकांताने का धावत होते ?
बाजींद ....?
काय असेल हा प्रकार,ज्याचे नाव घेताच त्या भिल्लाने मरण पत्करले पण गूढ नाही सांगितले....!

हा काय प्रकार आहे,हे मात्र आता शोधून काढ्लेच पाहिजे,असा निर्धार करत खंडोजी ने त्या नदीच्या विशाल पात्रात उडी घेतली...!

नदीच्या पाण्याच्या ओढीने तो वाहू लागला,तिरकस पोहत पोहत तो किनाऱ्याकडे पाहू लागला.

बराच वेळ पोहून झाले अन त्यालाही ती गुंफा दिसली.
या स्मशान जंगलात,नदीच्या कडेला गुंफा असणे हे नक्कीच नवल आहे हे त्याने जाणले आणि त्याने त्या गुंफेकडे पोहणे सुरु केले.....!

काही वेळात गुहा जवळ आली आणि खंडोजी चे पाय जमिनीला लागले,दम खात तो गुंफेकडे चालू लागला...!

ती गुहा खूप अंधारी होती,एकेक पाऊल तोलून मापून टाकत खंडोजी गुहेच्या आत जाऊ लागला...एव्हाना गुहेतील पाणी संपून जमीन लागली होती.

बराच वेळ चालून झाले आणि गुहेच्या त्या बाजूला मंद प्रकाश दिसू लागला,नक्कीच त्या बाजूने बाहेर पडायची वाट असेल असा विचार करत खंडोजी ने कमरेची तलवार ,खंजीर उपसली आणि एका हातात तलवार,दुसऱ्या हातात खंजीर पेलून सावध पावले टाकत खंडोजी त्या गुहेतून बाहेर आला.

सुर्य पूर्ण अस्ताला गेला होता,खंडोजी जखमी होता,त्याच्या वेदना सहन करत तो सावीत्री चा माग शोधत तिथे आला होता...!

ते अगदी घनदाट अरण्य होते,रात्रपक्षी भिरभिरत होती,रातकिड्यांचा आवाज मेंदूला झिणझिण्या आणत होता..पाय पडेल तिथे टाकत खंडोजी पुढे चालू लागला आणि अचानक त्याला कोल्हेकुई सोबत रानकुत्रें केकाटल्याचा आवाज आला...त्याच्या सर्दिशी अंगावर काटे आले...आजवर इतक्या मोहिमेत हेरगिरी केली पण या जंगलातील भयनकता खरोखर अंगावर काटा आणणारी होती...!

आवंढा गिळत खंडोजी चालत होता,प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत होता तितक्यात समोरच मोठ्या वडाच्या झाडामागून कोणीतरी एकदम वेगात धावत त्याच्याकडे येत होते,त्याच्या पावलांचा आवाज स्पष्ट कानी येताच खंडोजी ने विरासन पवित्रा घेतला आणि समोर पाहू लागला,त्याच्या हृदयाचे ठोके वाढले,सर्वांग घामाने भिजले...त्याने मनोमन विचार केला,ही पावले जर माणसाची नसून एखाद्या जनावराची असली,तर आपला खेळ सम्पला आज...आणी नक्कीच ते जनावर असेल,असल्या भयाण जंगलात कोण मनुष्य येतो मरायला....!

त्याने डोळे मिटून एक क्षण शिवछत्रपतींचे स्मरण केले ,ज्यांनी केवळ खंडोजीची नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची भीती घालवून आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला होता,त्यांचे क्षणभर स्मरण करुन तो मरायला,मारायला तयार झाला..!
आता क्षण दोन क्षण बस्स...काहीही होणार हे त्याने ताडले..अन...

क्षणार्धात त्याच्या मागून त्याचे कोणीतरी तोंड दाबले आणि त्याला ओढत ओढत एका झाडाच्या मागे नेले.....त्याचे तोंड दाबणार हात खूप शक्तिशाली वाटला,पण एकप्रकारची नाजूकता होती त्या हातात....त्याने ताकतीने त्या हाताची मिठी सोडवली आणि क्षणात सावध होऊन मागे पाहतो,तर ती प्रत्यक्ष "साऊ" होती...त्याने डोळे वठारले आणि भीतीने मागे सरकू लागला....तो मागे हटतोय हे पाहताच तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या ओठावर हात ठेवत मान नाकारार्थी हलवू लागली..!

हा प्रसंग सुरु असतानाच तो आवाज पुन्हा तीव्र झाला आणि झाडामागून दौडत गेला आणि जोरदार मोठ्या आरोळीने तो आवाज शांत झाला..!

आकस्मित घटनेने भांबावून गेलेल्या खंडोजीला नेमके काय सुरु आहे समजेना,त्याने प्रश्नार्थक नजरेने सवित्रीकडे पाहिले,सावित्रीने त्याच्या ओठावर दाबून ठेवलेला हात सैल करत बोलली....तुम्हाला माहिती नाही किती महाभयानक धोक्यात फसलोय आपण..!

लहानपणापासून या भागाबद्धल मी केवळ ऐकून होते,इथे घडत असणारे चित्रविचित्र प्रकार,आकस्मित घटना जे काही ऐकले होते ते आज नशिबाने भोगणे माझ्या वाटेला आले,आणि भरीस भर म्हणून तुम्हीही इथे आलात...मला खात्री आहे आपल्या दोघांपैकी कोणी जिवंत राहील असे वाटत नाही,पण नेमके आपले मरण कसे असेल याचाच मी विचार करत आहे,असे बोलत सावीत्री धाय मोकलून रडू लागली...!

तिला सावरण्याचा प्रयत्न करत खंडोजी बोलला,बाईसाहेब शांत व्हा,नेमका काय प्रकार आहे मला सांगा..असे काय आक्रीत घडले जे तुम्ही धीर सोडून बोलत आहात ते....?
मी शिवछत्रपतींचा शिलेदार आहे..संकटांशी लढणे हा माझा छंद आहे...सांगा....काय आहे इथे ....?

आलेला हुंदका आवरत ती बोलू लागली...आपण अनावधानाने एका महाभयानक जंगलात आलोय,जिथून परत जाणे यमलाही अशक्य आहे...हे जंगल "बाजींद" चे आहे...........बाजींद नाव उच्चारताच वाऱ्याची मोठी झुळूक आली,आणि सावित्रीचे केस वाऱ्यावर उडवुन गेली.....!

"बाजींद"...?
काय आहे हा प्रकार ?
मगाशी तुमच्या पाठीमागे लागलेल्या भिल्लाने जीव दिला पण बाजींद बाजींद बोलत प्राण सोडला..!
मला सांगा नेमके बाईसाहेब...मला जाणून घ्यायचे आहे ते...!

सावीत्री गूढ आवाजात सांगू लागली....बाजींद...!

असेल ही 100 एक वर्षांपूर्वीची गोष्ट,मी खूप लहान होते तेव्हा माझ्या आजीने सांगितली होती.
तशी ती आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे.

मोगलांच्या टोळधाडी महाराष्ट्रावर कोसळू लागल्या होत्या आणि गावेच्या गावे होरपळत होती...अन्याय,अत्याचार याने कहर माजला होता..!
यशवंतमाची पलीकडे 100 कोसावर असलेल्या चंद्रगड गावात तो राहत असे..!

एक अजिंक्य मल्ल, सावध नेता,कुशल राजकारणी,मुत्सद्दी सरदार..!
"बाजीराव सरदेशमुख"
त्याच्या बेडर स्वभावामुळे आणि कधीच पराभूत न होणाऱ्या चालीमुळे त्याला पंचक्रोशीतील "बाजींद" म्हणत होते...!

एक दिवस मोगली सरदार हुसेनखान आपल्या 4 हजार स्वारांना घेऊन तळकोकणात उतरला आणि त्याचा मुक्काम पडला चंद्रगड पासून अवघ्या 10 कोसावर...!


••● क्रमश ●••
बाजींद

: बाजींद भाग क्र.१२

••••••••••••••••••••••••••
: बाजींद

भाग क्र.१२
••••••••••••••••••••••••

••••••••••••••••••••••••••
सडसडीत देहाचे,अंगावर,शरीरावर चित्रविचित्र पांढरे पट्टे ओढलेले,केवळ लज्जारक्षणाएवढे कपडे घातलेले ते भिल्ल जमातीचे लोक कमालीचे क्रूर असावेत हे त्यांच्या चेहऱ्यावरुनच दिसत होते...!

एकाने पुढे होऊन सावित्रीच्या दंडाला पकडायचा प्रयत्न केला,पण सावित्रीने त्याचा हात वरच्यावर पकडून हिसडा मारला,त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.आपल्या साथीदाराला खाली पडलेले पाहताक्षणी ते भिल्ल बेताल किंचाळत सावित्रीच्या रोखाने धावत सुटले आणि ते पाहताच सावित्री सुद्धा पुन्हा नदीच्या दिशेने धावू लागली...पुढे नदी,पाठीमागे भिल्ल अश्या विचित्र परिस्थितीत तिने कशाचाही विचार न करता नदीच्या प्रवाहात उडी टाकली.
नदीच्या वेगवान धारेत ती वाहून जाऊ लागली,आणि तिच्यापाठोपाठ ते सर्वच्या सर्व भिल्लही नदीत उडी मारून सवित्रीचा पाठलाग सुरु ठेवला.

बराच वेळ पाण्यात वाहत गेल्यानंतर एका वळणावर असलेल्या गुंफेत सावित्रीने पोहणे सुरु केले आणि काही वेळ पोचल्यानंतर गुंफेत पोहचली...!

पोहून दमलेली सावीत्री त्या गुहेत दमछाक होऊन पडली,पण आपल्या पाठीमागून भिल्ल येत आहेत याची जाणीव तिला होताच ती गुहेतील पाण्यात हळू हळू चालू लागली...!

बराच वेळ चालून झाला आणि गुहेतील पाणी कमी होत जमीन लागली...क्षणात ती आत धावत सुटली.
बराच वेळ तिने धावणे सुरु ठेवल्यानंतर सूर्यकिरणांचा दूरवर प्रकाश दिसू लागला.

ती त्या प्रकाशाकडे धावली आणि तिला जाणवले की आपल्या पाठीमागे भिल्लांचा पाठलाग अजूनही होत आहे.
ती त्या प्रकाशाजवळ आली.
एक पुरुष आत जाईल इतक्या उंचीची ती एक वाट होती जी जंगलाच्या दुसऱ्या टोकाकडे निघत होती..!
ती त्या वाटेतून बाहेर पडली आणि जंगलात पोहचली...!

समोर एक विशाल शिळेवर चित्रविचित्र आकृत्या कोरल्या होत्या....एका उंच झाडाच्या फांदीवर एक मनुष्याच्या हाडाचा सांगाडा लटकत होता,ज्याचे पाय वर आणि हात खाली अशी स्थिती होती...!

सवित्रीचा पाय एका दगडाला थडकला व तिचा तोल गेला आणि पडली...!

काहीच अंतरावर ते भिल्ल तिचा पाठलाग करत तिच्या पर्यंत पोहचले होते....ते मनस्वी खुश झाले की बऱ्याच दिवसांनी त्यांची भूक मिटणार होती,पण...पण तितक्यात एका चित्रविचित्र आवाजाने त्या सर्वांचे लक्ष समोरच्या दगडावर गेले.
आणि भीतीने त्यांचे डोळे विस्फारले गेले....!

त्या भिल्लांचा म्होरक्या हात जोडून भीतीने बोलू लागला...ब... ब...ब बाजींद.... बाजींद...!

असे बोलत बोलत अक्षरश वाऱ्याच्या वेगाने आल्या पावली परत धाऊ लागले.

धावताना कोणी धडपडत होते,कोणी किंचाळत होते,तर कोणी जीव वाचावा म्हणून फक्त धावतच होते...त्या गुहेतून ते कोणताच विचार न करता पुन्हा नदीत उडी टाकून पोहत पोहत मागे येऊ लागले.......!

इकडे,सावित्रीला समजेना,की या भिल्लानी असे काय पाहिले ज्याला बघून हे इतके घाबरले आहेत....!

तिने स्वतःला सावरले.मन खंबीर केले आणि समोर च्या भव्य पाषणाकडे पाहू लागली आणि क्षणात अनेक वटवाघुळ पक्षी एकाच वेळी बाहेर पडले....!

दोन प्रचंड वाघ हळू हळू सवित्रीकडे येऊ लागले...!
एखाद्या राजाच्या ऐटीत,आणि राजबिंड्या चालीत ते दोघे चालत होते,आणि त्यांच्या मधोमध एक धिप्पाड युवक,सिंहासमान चालीने चालत होते,ते दोन वाघ जणू त्याच्या अंगरक्षकासारखे त्याच्या बरोबर चालत होते.
सरळ नाक,आग ओकणारे त्याचे घारीसारखे डोळे,चेहऱ्यावर एखाद्या राजपुत्रासारखी चमक,कमरेला लटकत असलेली तलवार,एखाद्या पुराणपुरुषांसारखे अजस्त्र बाहू,पिळदार दंड,भरीव छाती......पाहताक्षणीच कोणाच्याही हृदयाचा थरकाप उडावा असे त्या युवकाचे एकंदरीत व्यक्तिमत्व पाहत सावीत्री उभी होती...!

जंगलात सर्वत्र पक्षांचा किलबिलाट सुरु झाला,आसपास सरपटणारे निशाचर एकाच वेळी बाहेर आले....जंगली प्राणी अस्वस्थ होऊन किंचाळू लागली....जणू काही तो युवक या सर्व जंगलाचा नव्हे तर सभोवतालच्या अणूरेणुचा स्वामी होता....!

तो महत्वकांक्षी नजरेचा युवक जसाजसा सावित्रीच्या जवळ येऊ लागला,तसे तसे रात्रकिडे,पक्षी,वटवाघुळे,असंख्य लहान मोठे जीवांचा गोंगाट प्रचंड वाढू लागला,सावित्रीच्या कानाला ते सहन होईना,तिने तिचे दोन्ही हात कानावर ठेवले....तो आवाज वाढू लागला.......बस्स आता काही पावले...एकतर ते वाघ सवित्रीवर तुटून पडणार नाहीतर,हे जंगली जीव तरी सवित्रीचा प्राण घेणार....तिला हे सर्व असह्य झाले आणि तिने डोळे बंद करत प्रचंड किंचाळी फोडली........!

तीची किंचाळी ऐकताच तो युवक जाग्यावर थांबला...एक स्मित हास्य करत त्याने चहूबाजूला नजर फिरवली तसे सर्व पशुपक्षी,जीवजंतू शांत झाले....एका क्षणात सारा गोंगाट मौन झाला....!
सावीत्री ने डोळे उघडले...तिथे फक्त तो पुरुष तिच्याकडे स्मितहास्य करत उभा होता...!

इकडे,जिवाच्या आकांताने ते भिल्ल पुन्हा जिथे खंडोजी बेशुद्ध होता,तिथे आले...!
धडपडत,धापा टाकत ते खंडोजी कुठे दिसतो का ते पाहू लागले,अन क्षणात सपा-सप वार त्या भिल्लांच्या वर कोसळू लागले.
कोणाचा हात तुटून पडतो,तर कोणाचा पाय...काही क्षणात १० / १२ भिल्ल कर्दळीसारखे तुटले गेले...काही जंगलात पळून गेले ,उर्वरित तिघे चौघे हे जीवाची भिक्षा मागत जमीनीवर लोळू लागले....!

समोर पाहतो तर,खंडोजी ने विरासन घालून त्या भिल्लांच्यावर तलवार रोखून उभा होता....!

जे जीवाची भीक मागत होते,त्यातल्या एकाच्या छातीवर पाय ठेवत खंडोजी गर्जून बोलला....सांग,माझ्याबरोबर असणारी मुलगी कुठे आहे,काय केले तुम्ही...?

जिवाच्या भीतीने थरथर कापत त्यातल्या एकजण बोलला.....बाजींद......बाजींद...बाजींद.....!

असे म्हणत ते उर्वरित तिघे चौघे जंगलात धाऊ लागले...!

खंडोजी ने त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला आणि एकाला पकडले आणि बोलू लागला....!

बाजींद काय ??
बोल नाहीतर ही खंजीर तुझ्या छातीत घुसवेन...!

त्याचे ते बोल ऐकताच त्या भिल्लाने स्वतावर रोखलेले खंजीर धरले आणि खसकन स्वतःच्या छातीत खुपसले...आणि मान नाकारार्थी हालवत,डोळ्यात एका भीषण संकटाची खून देत तो पुट्पुटू लागला...बाजींद....बाजींद...!

क्रमश:

: बाजींद भाग क्र.११ वा..!

: बाजींद
भाग क्र.११ वा..!
••••••••••••••••••••••••

••••••••••••••••••••••••••

कुठे गायब झालात तुम्ही काल रात्री मला सोडून ?

खंडोजी ने प्रश्नार्थक मुद्रेने त्या चौघांना सवाल केला...!

यावर सखाराम बोलला...गायब..आणि आम्ही ..?

तुम्हीच काल संध्याकाळी त्या दाट जंगलाच्या जाळीत आम्हा चौघाना गुंगारा देत गायब झालात...!

आणि हो.....रात्री तुमची सावित्री पण भेटली होती आम्हाला....तिनेच आम्हाला तुमची पूर्ण कथा सांगितली ..पण आम्हाला कशी झोप लागली आम्हालाच समजेना...!

आम्हाला इथे कोणी कसे आणले तेवढे सांग बाबा ....नसता डोक्याला ताप झाला आहे...!

कुठली अवदसा सुचली आणि तुझे ऐकून तुझ्या मागे आलो असे झाले आहे ...!

काहीसा वैतागल्यागात सखाराम खंडोजी ला बोलला...!

‘’काय...?
सावित्री होती काल तिथे  ?
अहो, मी तिलाच शोधायला काल जंगलात बाजूला गेलो,काळ सकाळीच मला ती तुम्ही भेटला त्या वडाच्या झाडाजवळ भेटणार होती,तिच्या वडिलांची फौज पण १० कोसावर आपली वाट पाहत आहे..!

तिथेच तुम्हाला नेऊन तुमच्या प्रश्नाचा निवडा करण्यासाठी आमचे वस्ताद काका तुम्हाला महाराजांच्या जवळ घेऊन जातील आणि आम्ही आमच्या वाटेने जाऊ असे नियोजन होते माझे  ..पण..तुम्ही अचानक कुठे दिसेनासे झालात आणि रात्रभर तुमचा शोध घेत मी पहाटे त्या महादेवाच्या पडक्या मंदिराजवळ पोहोचलो तर तिथे एक वाघ रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला दिसला....मला वाटले इथे अजूनही वाघ असतील,आपल्या जीवाला धोका आहे, म्हणून मी मंदिरात आलो,तर तिथे तुम्ही चौघे झोपला होतात.

मग एका एका खांद्यावरती घेऊन पहाटेच या डोंगरावर आणले .....म्हणून तुम्ही चौघे आणि मी जिवंत आहे...आणि तुम्ही उलट मलाच प्रश्न विचारताय ?

खंडोजी चे ते बोलणे ऐकून त्या चौघाना जरा धीर आला.
अहो,खंडोजीराव आम्हाला माफ करा,पण भीतीने आमची बुद्धी काम करेना,त्यात रात्रभर तुमच्या सावित्रीने तुमची जी कथा सांगितली,त्यावरून तर जास्तच शंका आली.
आम्ही साधी जंगलात राहणारी शेतकरी धनगर लोक,तुमच्या थोरा मोठ्यांच्या भांडणाची शिकार नको व्हायला....आम्ही जातो माघारी,...राहिला सवाल आमच्या वाडीच्या सुरक्षेचा,तर बघू..सगळ्यांना घेऊन काहीतरी निवडा होईलच...!
सखाराम निर्धारी आवाजात बोलून गेला....!

अहो,आता ३-4 कोसावर वस्ताद काकांचे गुप्त ठिकाण आहे आमच्या ...कशाला मागे जाता ?

सरळ महाराजांच्या कानावर तुमचा विषय घाला,तुमची समस्या कायमची मिटेल आणि सारा वाडा सुखी होईल...माझ ऐका ,माघारी फिरून रात्रभर चाललेली मेहनत वाया जाईल...!

खंडोजी च्या त्या प्रश्नावर चौघांनी पण विचार केला ...मागे जाऊन काय प्रश्न सुटणार नाही.
खंडोजी तर महाराजांचा हेर आहे,तो तर किमान खोट बोलायचा नाही....साधले तर सगळेच चांगले साधले जाईल....असे म्हणत चौघांनी होकारार्थी मान हलवत खंडोजी सोबत जायचा निर्णय घेतला....!

एव्हाना सूर्य चांगलाच वर आला होता,भुकेने ते चौघेही हैराण झाले होते.

त्यांनी खंडोजी ला प्रश्न केला....
खंडोजी राव ...कुठतरी न्याहारी मिळेल का बघूया का ?

यावर त्वरित खंडोजी म्हणाला, चला चला....या डोंगराच्या खालीच मझा घोडा बांधला आहे ,त्यावर खाण्यापिण्याचे साहित्य आहे ..चला आपण निघू...असे म्हणत टे पाचही जण डोंगर उतरू लागले...!

घोड्याचे नाव घेताच सखाराम ला त्याचा घोडा आठवला,काल ओढा पार करताना काय दिसले त्याला काय माहिती ,कुठे पळून गेला.
पण,माझा घोडा खूप इमानदार आहे,अशी साथ सोडून जाणार नाही कधी,नक्कीच काय तरी आक्रीत बघितलं असणार त्याने...येईल तो नक्की परत,मला विश्वास आहे...आपल्या मनाशीच सखाराम बोलत होता...!

बराच वेळ डोंगर उतरत असताना त्याना दुरूनच खंडोजीचा घोडा दिसू लागला...आणि खंडोजी ला पाहून त्याचे खिंकाळणे सुरु झाले....!

खंडोजी ने घोड्याच्या मानेवर,तोंडावर मायेने हात फिरवला.

रात्रभर पावसात भिजून गारठलेल्या घोड्याला त्याने दिलासा मिळाला.
त्याने घोड्यावर एका घोंगडयात बांधलेली चटणी,कांदा आणि नाचणीची भाकर काढली.

खंडोजी ने घोड्याचे दावं सोडलं आणि त्याला चरायला सोडलं...!

पाचही जण भाकरीचा तुकडा मोडून खावू लागले ...!

खाता खाता दूरवर सखाराम चा काल गायब झालेला घोडा दूरवर दृष्टीस पडला.
त्याला पाहताच सखाराम आनंदाने उठून उभा राहिला..!
त्याने जोरजोरात त्याच्याकडे पाहत हाका मारायला सुरवात केली आणि त्याच्या रोखाने चालू लागला.
आपल्या धन्याची हाक ऐकून सखाराम चा घोडा धावत त्याच्याकडे येऊ लागला...सखाराम खूप आनंदी झाला.
पाठीमागून खंडोजी ने सखाराम च्या पाठीवर हात टाकला,आणि "जातीवन्त जनावर दिसतंय"

व्हय...लय जीव हाय माजा हेज्यावर...!

पण,काय झाले कोणास ठाऊक,समोरून धावत येणारा सखाराम चा घोडा क्षणात थांबला,सखाराम कडे पाहत पाहत मागे सरकू लागला,आणि क्षणात सुसाट वेगाने मागे पळून गेला...!

त्याचे धावणे पाहताच सखाराम पण मागे लागला,पण घोडा क्षणात जंगलात गायब झाला.

खिन्न मनाने सखाराम खन्डोजी जवळ आला,म्हणाला...काय याला आक्रीत दिसतय समजना... मला सोडून कवाबी असा वागला नव्हता आजवर....नक्कीच कायतरी आक्रीत हाय"

जाऊदे,जातोय कुठं...येईल माघारी,चला चार घास खाऊन घेऊया...असे बोलत खंडोजी व सखाराम माघारी आली.

सर्वजण भाकरी चटणी कांदा खाऊ लागली..!

सखाराम बोलला.....खन्डोजीराव ,रात्री सावित्री बाईनी तुमची कथा सांगितली...खरच मला अभिमान वाटला कि मी एका मराठेशाहीच्या हेरासोबत हाय.
पण,मला पुढ काय झाल तुमच सांगशीला का ?
त्या डोंगरावरून तुम्ही दोघांनीही खाली नदीत उडी का मारली ?

त्यानंतर काय झाले....!

किंचित हसत  खंडोजी बोलू लागला......

काय सांगू मंडळी,आयुष्यात केवळ व्यायाम,धाडस आणि मेहनत याच्या जीवावर महाराजांच्या सैन्यात प्रवेश मिळवला होता.
ऐन तारुण्यात खुद्द बहिर्जी नाईकांचा खास मर्जीतला हेर झालो होतो..आयुष्यात प्रेम म्हणजे काय असते हे कधी समजून घ्याला वेळच मिळाला नव्हता...!
पण,शिर्क्यांच्या लेकीला जेव्हा पहिल्यांदा पहिले ,तेव्हा त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नव्हता.....सारख तिचा तो चेहरा आठवायचा प्रयत्न करत होतो..!

मनात एकप्रकारची ओढ निर्माण झाली होती....!

त्या रात्री बेरडांच्या हल्ल्यात तिने एकाकी चढाई केल्याचे समजताच माझा तोल गेला..मी वस्ताद काकाना सांगून तिचा जीव वाचवायला सुर्यरावांच्या फौजेचा एकट्याने पाठलाग केला...मी जाणून होतो सूर्यराव आणि महाराजांचे कोणतेच वैर नव्हते...पण साऊ साठीची तळमळ स्वस्थ बसून देत नव्हती...!

मी धोक्यात असल्याची खबर काकांनी खेडेबार्याला पोहोच केली आणि २०० मावळ्यांची तुकडी माझ्यासाठी धावून आली.....मी जर साऊ ला तिथेच सोडून गेलो असतो तर नक्कीच सूर्यरावाने तिला एकतर मारून टाकले असते नाहीतर यातना देत शिर्क्याना झुकवले असते..आणि जर शिर्क्यांच्या हाती दिले असते तर माझे गुपित तिला समजले होते ,आणि ती सुध्दा जातिवंत होती,तिने नक्कीच हे सर्व तिच्या बापाला सांगितले असते आणि आमचा शिर्क्यांच्या राज्याचा पाडाव करायचा बेत फसला असता ,म्हणून मी कोणताही विचार न करता वस्ताद काकांचाही हुकुम डावलून तिला घेऊन त्या भयान कड्यावरून नदीत उडी मारली....!

दुथडी भरून वाहणाऱ्या त्या नदीत आम्ही दोघेही पडलो.....साऊ च्या नका तोंडात पाणी गेल्याने तिची शुद्ध हरपली...पण मी शुद्धीत होतो...तिचा हात धरून कसा बसा पोहू लागलो...पण पाण्याच्या वेगाने मी खूप दूरवर वाहत वाहत एका भयान जंगलात पोहोचलो....!

खंडोजीने साऊचा हात धरून तिला नदीच्या काठावर पण जंगलाच्या तोंडावर असलेल्या एका विशाल दगडावर झोपवले आणि कमरेला असलेले कट्यार,खंजीर काढून बाजूला ठेवला आणि शेल्याने तोंड पुसत साऊ च्या डोक्याखाली शेला ठेवला.......सावित्रीचे ते सौंदर्य खंडोजी कितीतरी वेळ पाहत होता.....त्याच्या हृदयाची कंपने तीव्र होत होती...आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीचे सौंदर्य तो पाहत होता.

तितक्यात अचानक सावित्रीला जाग आली.

डोक्यावर हात ठेवत ती वेदना सहन करत उठली आणि बाजूला उभा असलेल्या खंडोजीकडे कटाक्ष टाकला आणि दोन्ही हात छातीवर नेत बोलले....दूर व्हा...!

क्षणात खंडोजी ने शेला तिच्या हातात देत बोलला....घाबरू नका बाईसाहेब..तुम्ही सुखरूप आहात...!

त्वरित हाताला हिसडा मारत तो शेला घेऊन तिने खांद्यावर छातीवर झाकत सावरत बोलली.....मी सुखरूप राहीनच...तुम्ही तुमची काळजी करा....!

आमच्या वडिलांचा विश्वास घात करून त्यांच्या वाड्यात प्रवेश मिळवला आणि आमच्या खबरा शिवाजी महाराजाना देता ?
एका पैलवानाला शोभत का ही गद्दारी ?

खंडोजी बोलला......गद्दारी...आणि आम्ही ?

गद्दारी केली तुमच्या वडिलांनी......सारा महाराष्ट्र शिवाजीमहाराजांच्या मागे ठाम असताना तुटपुंज्या फौजेच्या जीवावर मराठेशाहीशी वैर शोभते का शिर्क्यांना ?

सूर्यराव बेरडांच्या हातात शस्त्र घ्याला मजबूर करणारे तुमचे बापजादे शिवाजी महाराजांची महती काय समजणार ..?

यावर सावित्री खवळून बोलली....ते काहीही असो....शिर्क्यांची जरी दौलत महाराजांच्या सैन्यापुढे तोकडी असली तरी आमच्या राज्यापुरते आम्ही सुखी आहोत....कोणीही दुखी नाही...आमच्या आबांच्या वर निष्ठा बाळगणारी कित्येक जण तरी आहे....!

निष्ठा ..?

खंडोजी सुध्दा संतापाने बोलला ...!

निष्ठा सत्कारणी असावी....आगलाव्या आगंतुक आदिलशाहिवर कसली निष्ठा ?

ज्यांना माणुस आणि जनावरे यातला भेद माहिती नही...ज्यांचा इतिहास हा कत्तली आणि जाळपोळी ,बलात्कार,लुटालूट यांनी भरलेला आहे.
350 वर्ष जुलूम जबरदस्ती करणारे तुमचे आदिलशाही हात तोडून टाकले आमच्या महाराजांनी..!

आज महाराष्ट्र सुखात आहे,तो केवळ महाराजांच्या पुण्याईमुळे...बस्स...आम्ही त्यांच्यासाठी जीवही देऊ...!

बोलून ताकत वाया घालवू नका...क्षणात सावित्री बोलून गेली...असेल हिमत तर माझ्याशी चार हात कर आणि तुझा प्राण वाचव...मी पण माझ्या राज्यासाठी प्राण देऊ शकते...!

सावित्रीच्या आकस्मित आव्हानाने खंडोजी सावध झाला,तितक्यात सावित्री ने खंडोजी वर जबरदस्त प्रहार सुरु केले...खंडोजीचा तोल गेला,पण क्षणात सावध होऊन त्याने गिरकी घेत,सावित्री चा हात मुरगळुन मागे आवळत बोलला....बाईसाहेब...आम्ही शिवछत्रपतींचे शिपाई आहोत,स्त्रिया वर कधीच हात उगारत नसतो...बऱ्या बोलान गप्प बसा नाहीतर हात पाय बांधून उचलून न्यावं लागेल...!

सवित्रीचा हात घट्ट मागे धरल्याने तिचा आवेश पूर्ण मावळला...!

हे सर्व सुरु असताना जंगलातून एक बाण वेगाने बाहेर आला ज्याने खंडोजी च्या पायाचा वेध घेतला,एका आर्त वेदनेने खंडोजी ला भोवोळ आली,आणि तो सावीत्री ला सोडून खाली पडला...!
क्षणात सावित्री सावध होऊन पळून जायच्या बेतात होती,
तितक्यात जंगलातून पाच पन्नास काळीकभिन्न नरभक्षक आदिवासी जमात हातात भाले, बरचें घेऊन बाहेर आली...त्यांचे ते उग्र कुरूप चेहरे पाहताच सावित्री भयकंपित झाली....!

क्रमश:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...