फॉलोअर

सोमवार, ४ मे, २०२०

बाजींद भाग क्र.१५ वा.

•••••••••••••••••••••••••••••••
:
भाग क्र.१५ वा..!
~~~~~~~~~~
समोर काय आक्रीत घडत आहे हे खुद्द बाजी ला सुद्धा समजत नव्हते.
केवळ कुतूहल,करमणूक म्हणून वन्य प्राण्यांशी आजवर त्याने संवाद साधला होता,ते वन्य प्राणी आज त्याच्यासाठी धावून आलेच पण चंद्रगड वर आलेल्या आस्मानी संकटाला त्याच्या पायाशी लोळण घ्यायला लावत होते हे पाहून तो मनोमन थक्क झाला होता...!

एक श्वास घेत त्याने समोर गुडघे टेकून तलवार दोन्ही हातात आडवी करुन मान झुकवून बसलेल्या हुसेनखानाच्या दोन्ही खांद्याना धरुन उठवले व बोलू लागला...उठिये खांनसाहेब..किसीके सामने झुकना एक वीर को शोभा नही देता...और आप तो महावीर है..!

बाजींचे ते आपुलकीचे बोलणे ऐकून हुसेनखानाने तलवार फेकून देऊन बाजी ला मिठी मारली....तो बोलू लागला..

काबुल से लेकर कंदाहार तक,और काश्मीर से लेकर कन्याकुमारी तक मेरी पुरी जिंदगी जँग मे चली गयी लेकिन आप जैसा तीलस्मी सुरमा बहाद्दर नही देखा जिसके एक इशारो पे माशाअल्ला जंगल के बेरहम जानवर भी चूप हो जाते है... अल्लाह के शरीफ बंदे कौन है आप ?

बाजी गालात किंचित हसला व बोलू लागला...

खानसाहब.. मै राजे चंद्रभान सरदेसाई का पुत्र बाजी सरदेसाई हु...चंद्रगड सलतनत का रखवाला...!

चंद्रगड.....मै तो समझा था की चंद्रगड जैसी मामुली सलतनत के लिये बादशाह हमे भेज कर मेरा अपमान कर रहे है...लेकिन आप जैसे सुरमा से मिलकर मेरा यह भरम टूट गया....आज से केवल चंद्रगड ही नही ये पुरा इलाका आज से आपका है...आ जाओ हमारे गले लग जाओ...!

दोन्ही वीरांची कडकडून मिठी झाली आणि दोघेही शाही तंबूत गेले.
जनावरांच्या हल्ल्यात शेकडो मेलेली प्रेते एका बाजूला,जखमी एका बाजूला अशी प्रतवारी करत विल्हेवाट व उपचार सुरु झाले.

नुराजहाँन ही हुसेनखानाची लेक.
हुसेनखानाला मुलगा नसल्याने त्याने आपल्या मुलीला मुलासारखे वाढवले होते.
मोगली मोहिमेत नूरजहान स्वता वडिलांच्या सोबत येत असे.
तिला तर रात्रीच्या प्रकरणाचा खूप धक्का बसला होता.
वरवर शांत,हिरवेगार दिसणारे हे जंगल किती महाभयानक आहे तिचा प्रत्यय तिला आला होता.
मोगलांची शूर सेना ते राक्षसी हत्ती सोंडेने उचलून धुणे आपटतात तसे आपटून मारत होते,वाघसिंहांनी कित्येक वीरांच्या नरडीचा घोट घेतला होता,काळवीटाची शिंगे पोटातून आरपार जाऊन आतडीच बाहेर काढत होता,कित्येक अजगरे सैनिकांना पिळखा देऊन हाडांचा चुरा करत होते,कित्येक अस्वलांची नखे हृदय फाडून हातात घेत होती...साप,विंचू कीटकांची तर किती शिकार झाली असतील त्याची मोजदाद नव्हती.
आणि ती क्रूर जनावरे किंबहुना किडे मुंगी साप सुद्धा ज्याच्या आज्ञेने माघारी गेले तो "बाजी" काय प्रकार असेल असा विचार करत ती उभी होती.

जिवाच्या भीतीने त्या रात्री कित्येक सैनिक बिथरले होते,त्यांना धीर देण्याची ती काम करत होती तितक्यात खुद्द बाजी तिथे आला,आणि त्याला पाहून पुढचे सैनिक भीतीने पळूनच गेले....!

बाजी ला पाहताच नुराजहान ने पदर सावरत मागे हटली....!

बाजी बोलू लागला....

आप औरत होकर इतनी अच्छि तलवार चलाती है..यह देखकर हम बहुत खुश हुये....!
आमच्या पुऱ्या हयातीत एखादी स्त्री सुद्धा इतकी अप्रतिम लढू शकते हे पाहून खरोखर नवल वाटले..."

शुक्रिया...पण काल रात्री आम्ही तुमची जी करामत पहिली ती केवळ दैवी करामत होती...कुठून शिकलात ही विद्या...?

नूरजहान चे मराठीवर प्रभुत्व पाहून बाजी आश्चर्याने बोलला....तुम्ही मराठी सुद्धा बोलता हे नवल आहे...!

नूरजहान बोलली...हो माझ्या खूप मैत्रिणी मराठी आहेत व गेली 5 वर्षे महाराष्ट्रात आहे...मराठी बोलू,समजू शकते मी...."

खूप छान....तुमची तलवार आणि भाषा दोन्हीही आम्हाला आवडल्या...आमच्या गावचा आपण पाहुणचार स्वीकारावा यासाठी मी आपणास आमच्या गावी चंद्रगड ला तुम्हास व तुमच्या वडील फौजेसह उद्याचे आमंत्रण देतो..!

किंचित लाजून ती बोलली...जरुर...आम्ही सर्व येऊ..असे बोलून ती निघून गेली...!

बाजी ने दस्तुरखुद्द हुसेनखानला फौजेसह गावात येण्याचे आमंत्रण देऊन बाजी त्याच्या पक्षा घोड्यावर त्याच्या अंगरक्षकासह दौडत गेला....!

इकडे सारे चंद्रगड राजे चंद्रभान च्या महाला समोर गोळा झाले होते.
रात्रभर गगनभेदी किंचाळ्यांनी साऱ्यांच्या काळजाचा ठाव घेतला होता.
4 हजाराच्या विरुद्ध शे दोनशे धारकरी कसे टिकणार ?
रात्रीच फन्ना उडाला असणार अशी काळजीची कुजबुज सुरु झाली होती.
आता सारे संपणार...300 वर्षे रक्ताचे पाणी करुन स्वाभिमान जपत मानाने चंद्रगड चे स्वातंत्र्य अबाधित ठेवलेले चंद्रभान व त्यांचे वंशज त्यांच्या त्यागाची हि निर्वाणीची वेळ..!
उद्या हुसेनखान व मोगली फौजेचा लोंढा चंद्रगड वर कोसळणार आणि सारे सारे नष्ट होणार..!
डोळ्यांच्या कडा ओलावत, आवंढा गिळत,मोठा श्वास घेऊन राजे चंद्रभान सार्या गावकर्यांना उद्देशून बोलले.

"गड्यानो,प्रसंग बाका आहे.आपला स्वाभिमान,स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर आता सर्वांनी हातात शस्त्रे घ्या...जर जिंकाल तर इतिहासात अमर व्हाल आणि हारलात तर हुतात्मा व्हाल...आपली तरणी ताठी पोर काल त्या छावणीवर तुटून पडली...त्यांचे जीवाचे काही बरे वाईट झाले असेल आणि नसेल ही... आपण सर्वांनी मरेपर्यंत लढायचे....बोला....आहे मंजूर ????

मंजूर....मंजूर.....

सारा गाव एका सुरात बोलला आणि तितक्यात चंद्रगड च्या समोरच्या डोंगरातून धुळीचे लोट उडू लागले...चौताड थडाडत घोड्यांच्या टापा कानावर येऊ लागल्या....सर्वांनी नजर रोखून पाहिले आणि काळजातून आनंदाची लकेर उडाली.......बाजी......बाजी....बाजी.......!

राजे चंद्रभान धाय मोकलून रडू लागले...त्यांना विश्वास बसेना की दौडत येणारे अश्वपथक चंद्रगड च्या विजयाचे निशाण आकाशात फडफड करत येत होते....!

सारा गाव त्यांच्या स्वागताला पुढे गेला.......

बाजी व त्याचे सहकारी गावातील मुख्य प्रवेशद्वारातून आत आले आणि गावकऱ्यासमोर घोड्यावरून पाय उतार झाले.
सुवासिनी हळद कुंकू लावून त्यांचे औक्षण करु लागल्या....गावकरी फुले उधळू लागली....!

चंद्रगड चे स्वातंत्र्य अबाधित राखून विजयाची परंपरा प्रतिकूल परिस्थितीत कायम ठेवत वाघासमान चालत आणि सार्या गावचे अभिनंदन स्वीकारत बाजी चंद्रभान राजांच्या दर्शनाला निघाला.....!

बाजीने वडिलांचे दर्शन घेतले व सविस्तर घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला.
चंद्रभान ला विश्वास बसेना की उद्या हुसेनखान फौजेसह आपल्या गावात भोजनास येणार आहे.
त्यांने सर्व गावकर्यांना बोलावून उद्या भोजनाचे नियोजन करायचा आदेश दिला...!

दिवस उगवला ,कोंबड्याने बांग दिली आणि चंद्रगड च्या समोरच्या डोंगरावरून चांद सितारा असलेला मोगली ध्वज व मागे समुद्रासारखी मोगली फौज दिसू लागली....!

सारा गाव आनंदात होता,येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात जे ते व्यस्त होते...!

आणि मजल दरमजल करत हुसेनखान मोगली फौजेसह चंद्रगड मध्ये डेरेदाखल झाला.
गावाला यात्रेचे स्वरुप आले.
प्रत्येक गावकरी तळमळीने आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होता.

हुसेनखान व नूरजहान राजे चंद्रभान यांच्या महालात आदरातिथ्य स्वीकारत गेल्या.
शिंग,तुताऱ्या,हलगी या मराठ्मोठ्या पद्धतीने त्यांचे स्वागत झाले.
राजे चंद्रभान व हुसेनखान यांच्या राजकीय चर्चेला रंग चढला....!

बाजी ने नूरजहान ला सारा महाल फिरवून दाखवला.

नूरजहान बोलली....राजाजी,तुमच्या पाहूनचाराने आम्हाला आमच्या आईची आठवण झाली.
खूप चांगले लोक आहेत तुमच्या गावात,आम्ही हा तुमचा पाहूनचार कधीही विसरणार नाही...!

नूरजहान च्या बोलण्याने बाजी किंचित हसला व बोलू लागला.....

पाहुणा हा चंद्रगड वासियांना देव असतो,आणि देवाचा पाहूणचार करणे हे पुण्याचे काम आहे...!

दोघांचीही नजरेला नजर भिडली आणि एका अनामिक आकर्षणात दोघेही बांधले गेले,आणि दुनियेचा विसर पडला,दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले....देहभान विसरुन ते क्षणभर तसेच बाहुपाशात अडकले गेले होते...!
जगाचा त्यांना विसर पडला होता....शरीरे दोन मात्र मने एक झाली होती...एक अशी अनुभूती ज्यात आता मिळवायचे असे काहीच राहिले नाही असा अनुभव येतो....यालाच प्रेम म्हणतात का ?
नक्कीच....प्रेम प्रेम म्हणतात ते हेच....आयुष्यात ज्याने केले आहे त्यालाच हे समजणार...!
नाही..बिलकुल नाही...ज्याने कधी केलेच नाही फक्त त्यांनाच हे समजणार....!


••● क्रमश ●••
बाजींद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...