फॉलोअर

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १

 संपूर्ण महागाथा मराठाशाहीची

संग्राहक ::विनोद जाधव

भाग १
प्रस्तावना
आजपासून नवीन लेखमाला चालू होत आहे “” संपूर्ण महागाथा मराठाशाहीची “
या लेखमालेत तुम्ही मराठा कोण होते ,कोणाला मराठा म्हटले जायचे ,कोणी म्हणतात शिवरायांपासून मराठा शब्दाचा उगम झाला तर हे चुकीचे आहे ,शिवपूर्व काळाच्या आधीपासून मराठा सरदार ,जहागीरदार ,वतनदार होते ,मराठा राजे सातवाहन ,वाकाटक,चालुक्य ,साळुंखे ,काकतीय ,शिलाहार या मराठा राजांनी काही काळ गाजविला ,शिवाजी महाराजांनी या मराठा सरदार ,वतनदार ,देशमुख ,पाटील ,कुलकर्णी यांच्यामध्ये स्वराज्याचे रणशिंग फुंकले ,आणि मराठाशाहीचे स्वराज्यसंस्थापक झाले ,त्याच्या आधी शहाजी महाराजांनी मराठाशाहीचे स्वप्न पहिले व शहाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ हे स्वराज्यसंकल्पक आणि स्वराज्यसंकल्पिका झाल्या . त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज मराठाशाहीचे स्वराज्यरक्षक झाले ,संभाजी महाराजानंतर छत्रपती राजाराम महाराज ,शाहू महाराज ,महाराणी ताराबाई आणि अनेक मराठाविराणी या मराठाशाही साठी आपले रक्त वाहिले ,त्यात मराठाशाही मध्ये शिवकाल ,शंभूकाळ ,पेशवाईचा काळ ,होळकरशाहीचा काळ तयार झाले .पण त्या सर्व काळातील मराठा वीरांनी मराठाशाहीचे रक्षण केले व आपले प्राण स्वराज्यावर अर्पण केले ,स्वराज्यातील बारा बलुतेदार यांनी मराठा वीरांबरोबर स्वराज्याचे रक्षण केले ,त्या बारा बलुतेदारांना पण मराठा वीर म्हटले गेले ,जे वीर महाराष्ट्याच्या रक्षणासाठी लढले त्या सर्व वीरांना मराठा वीर म्हटले गेले ,महाराष्ट्रात स्वराज्यापासून मराठा साम्राज्य आणि मराठाशाही विस्तारत गेली त्यात मराठाशाहीत होळकरशाही आणि पेशवाईचा काळ आला ,मराठाशाही वर आदिलशाही ,निजामशाही ,मुगलशाही ,कुतुबशाही,पोर्तुगील .अरब,इंग्रज यांचे अनेक आक्रमण झाले ,पण सर्वाना पुरून उरली ती फक्त आणि फक्त मराठा वीरांची मराठाशाही ,कोणी याला हिंदवी स्वराज्य असे म्हणते तर कोणी मराठी साम्राज्य असे म्हणते ,पण आम्ही तर मराठा साम्राज्य असेच म्हणू ,चला तर मग महाराष्ट्रातील शिवपूर्व काळापासून ते स्वराज्य ते मराठा साम्राज्य ते मराठाशाही चा मागोवा घेवू या
जय मराठाशाही जय जिजाऊ जय शिवराय जय शहाजी राजे जय संभाजी राजे आणि जय जयकार त्या सर्व मराठा वीरांचा ज्यांनी महाराष्टसाठी आपले प्राण दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...