फॉलोअर

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ४

 संपूर्ण महागाथा मराठाशाहीची

संग्राहक ::विनोद जाधव

भाग ४
मराठा म्हणजे कोण ? मराठ्या विषयी तुम्हाला माहित नसलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी - नक्की वाचा
प्रकरण दुसरे
यापुढे मराठाच्या उल्लेखाबद्दल बोलायचे झाले तर हरिवंशात नाग उपनावाच्या क्षत्रिय राजकन्येपासून झालेल्या यदु च्या ४ पुत्रांनी सह्यांद्रीपासून थेट कन्याकुमारीपर्यंत ४ राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो. आणि मराठांच्या जागेच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर विदर्भ देशाचे भोज राजे सोमवंशी असून ते यदुकुळातून आले असल्याचा इतिहास आहे.
यावरून असे लक्षात येते कि महाराष्ट्रात व वऱ्हाडात राहणारे लोक चंद्रवंशी असून यादव, जाधव मराठे क्षत्रिय होते. ख्रिस्तपूर्व ७ व्य शतकापासून ते इसवीसन ३ ऱ्या शतकापर्यंत वऱ्हाडावर व महाराष्ट्रावर मराठे (मरहट्टे) राज्यकर्त्ये होते.
इतकेच नव्हे तर मराठ्यांचा इतिहास हा प्राचीन असल्याचा आढळतो. अगदी वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्याकांड सारंग ५१ श्लोक ६ यात दशरथाला महाराष्ट्रे विवर्धन असे म्हंटले आहे. तसेच जैन लोकांच्या कृतांग सूत्रामध्ये तसेच श्री प्रज्ञापन उपांग सूत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो. पश्चिम घाटामध्ये भाजे नामक एक कोरीव लेणी आहे त्यात हि लिहिलेल्या शोल्कावर महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो.
जेथे जेथे महाराष्ट्र उल्लेख आहे तेथे तेथे मराठयांच्या कामगिरीबद्दल बोलले गेलेले आहे. मगध देशात नंदाचे राज्य असताना प्राकृत प्रकाश ग्रंथांमध्ये "शेष महाराष्ट्रवितम्" असा उल्लेख आढळतो.
मराठ्यांचा आणखी एक महत्वाचा पुरावा म्हणजे शवरभाष्य येथील आहे. शवर वेळी आंध्रचे राज्य होते.त्यामुळे त्यांचे म्हणणे असे पडले कि,आंध्रमध्ये क्षत्रिय धर्म करीत नसलेले सुद्धा स्वतःला राजे म्हणवतात तसेच कुमारीलेच्या वेळी महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता त्यामुळे त्यांचा आरोप होता कि ९६ कुळी मराठे नसलेलेही स्वतःला राजे संबोधून घेत असत. असो म्हणणे काहीही असो पण मराठ्यांचे ऐतिहासिक महत्व काय होते हे या उल्लेखांवरून समजते, म्हणून महाराष्ट्रात राहणारा तत्वांसाठी झटणारा लढणारा प्रत्येक माणूस हा मराठा आहे.
या लेखाचे सर्व हक़्क़ राखीव आहेत_ Copyright_Marathi_Tadka

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...