संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
मराठा म्हणजे कोण ? मराठ्या विषयी तुम्हाला माहित नसलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी - नक्की वाचा
प्रकरण पहिले
मराठा .. एकेकाळी हि जात नव्हती हि होती ओळख लढवैय्या मर्दांची, आणि धरतीपुत्रांची ! काळ सरत गेला अन लढवैय्या शूर मर्द मराठा जातीच्या विळख्यात येऊन त्यात अजूनच अडकत गेला. खरे तर काळाच्या ओघात मराठा कोण? आणि मराठा म्हणजे काय ? या प्रश्नांची उत्तरे देणंच बंद झाली कारण छत्रपती शिवरायांचा शूर 'मराठा' आता जातीत गणल्या जाऊ लागला. चला तर मग आज जाणून घेऊया मराठा म्हणजे कोण?
मराठा हि महाराष्ट्रातील एक उच्चवर्णीय क्षत्रिय जात आहे. मराठा हि लढाऊ जात आहे. पुढे या जातीच्या पोटजातीसुद्धा पडल्या, जसे कि कुणबी, कुणबी मराठा. मराठा कुणबी, ९६ कुळी मराठा इत्यादी. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू हरियाणा तसेच मध्यप्रदेशमध्ये आजही मराठा लोकसंख्या आढळून येतात. मराठी, तंजावर, तामिळ, तेलगू या मराठांच्या भाषा आहेत.
पण मग नक्की मराठा शब्दाचा अर्थ तरी काय? मराठा या शब्दाचे संस्कृत रूप महाराष्ट्र आहे, ज्याचा अर्थ आहे 'मोठे राष्ट्र' आणि ज्यांचे राज्य मोठे आहे ते मराठे, मरहट्ट, महारठ्ठ, महारथ. महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती. या सर्व संज्ञाचा अर्थ प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली, धुरंदर, लढवैय्ये असा होता. हि सर्व विशेषणं शौर्यवान पुरुषांना लावत असत. याला आधार आहे रघुवंशाच्या ६व्य सर्गामधील पुढील श्लोक :
"एको दस सहस्त्राणि योध्येद्यस्तु धान्विनाम
शस्त्रशास्त्र प्रविनश्च् स वै प्रोक्तो महारथः
अमितान्योध्येद्यस्तु सप्रोक्तोतिर्थस्तु सः
रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्युनोद्वेर्थः स्मृतः"
याच अर्थ असा कि, शस्त्रशास्त्र विद्येत पारङ्गत आणि प्रवीण होउन जो एकटा क्षत्रिय दहा हजार योद्धाबरोबर लढु शकतो त्या रणधुरंधरास मरहट्ट -महारथी असे म्हणतात, असे इतिहास तज्ज्ञ डॉ भांडारकर ह्यांनी सांगितले आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे कि संस्कृत शब्द 'महाराष्ट्र'या वरून मरहट्ट, महारथी, मराठा हा शब्द उदयास आला असावा. या विषयी आणखी माहिती देतांना ते म्हणतात कि ख्रिस्त सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. याचा उल्लेख कात्यायनात आढळतो. तसेच ख्रिस्तपूर्व आढळणाऱ्या तिसऱ्या शतकातील अधिक राजाच्या शिलालेखातही याचा संदर्भ बघायला मिळतो.
या लेखामध्ये राष्ट्रिक,पैठणीक अशी नावे आढळतात, जी हल्लीच्या मराठ्यांचे पूर्वज होते. अशोक राजाच्या कुंडे येथील शिलालेखात महाभोजाचा उल्लेख आहे. याप्रमाणे पतंजलीच्या १००० वर्षे आधी उत्तर-दक्षिण भागात दळणवळण चालू होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक, महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा