फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्रं भाग 16

शंभू चरित्रं
भाग 16
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत बुधभूषण मधील निवडक श्लोक
राजाची सामान्य कर्तव्ये
व्यसनानि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् ।
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ॥
अर्थ:राजाने सात दोष टाळले पाहिजेत,हे दोष पुढीलप्रमाणे आहेत
वाग्दण्ड-राजाने कठोर बोलणे टाळावे
पारूष्य- इतरांचा अपमान करणे टाळावे
दुरयातंच-संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये
पान-मद्यपानापासून दूर असावे
स्त्री-राजांस स्त्रीचे व्यसन नसावे
मृगया-गरीब प्राण्याची शिकार करू नये
द्युत-जुगारापासून राजाने दुर राहावे
काले मृदुर्यो भवति काले भवति दारूण: ।
राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥
अर्थ:राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर राजाने कधी कठोर तर कधी मवाळ बनावे
भृत्यै:सह महीपाल: परिहासं च वर्जयेत् ।
भृत्या:परिभवन्तीह नृपे हर्षवशंगतम् ॥
अर्थ:राजाने नोकराबरोबर थट्टा मस्करी करू नये.नोकरांच्या वेढ्यातील राजा हर्षवश होऊन नंतर तिरस्कृत होतो.
SAAMBHAR : www.marathidesha.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...