शंभू चरित्र
भाग १८ (प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट

छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात
परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा
किल्ल्यावर आले.तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८०.संभाजीराजेंची
पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.
रायगडावर आल्यानंतर छत्रपतींनी ७ मार्च,१६८० रोजी राजारामची मुंज केली.तर १५ मार्च १६८० रोजी,प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याशी राजाराम याचा विवाह केला.
मनात अढी असल्यामुळे सोयराबाईंने संभाजी राजेंना विवाहासाठी बोलाविले नाही. राजारामच्या विवाहानंतर काही दिवसातच,३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले.महाराजांच्या निधनाची बातमी संभाजीराजेंना न कळवता,लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे अष्टप्रधान मंडळी व राणी सोयराबाईंनी ठरविले.महाराजांच्या मृत्युनंतर अठरा दिवसांनी,२१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा