फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्र भाग २२

शंभू चरित्र
भाग २२
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
३ एप्रिल १६८० शिवरायांच निधन
झालं. त्यावेळी संभाजी महाराज
नुकतेच पन्हाळ्याला आलेत. ते
रायगडावर न्हवते याच कारण! ते
बुऱ्हाणपुराच्या स्वारीत अडकले
होते. राजारामाचं लग्नं ते स्वारीत
असतानाच झालं. म्हणून ते
लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत
वगैरे अजिबात न्हवते.
हि वस्तुस्थिती आहे.
आणि शिवरायांच निधन झाल्यावरं
शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तरं
रायतेतं गोंधळ माजेल आणि शत्रू
आक्रमणं करायची भीती आहे. म्हणून
शिवरायांच्या निधनाची वार्तासुद्धा गोपनीय
ठेवण्यात आली. पण!
त्याचवेळी मंत्री रायगडावर
जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरु
झाला. कसंही झालं संभाजीराजे
गादीवर येत उपयोगाचे नाहीत. कारण!
संभाजीराजे "धर्मपंडित",
"संभाजी संस्कृत चे ज्ञानी",
"संभाजी निर्णय क्षमता असणारे",
"संभाजी प्रचंड बुद्धिमान",
"संभाजी प्रचंड शौर्यशाली".
संभाजी जरं गादीवर आले तरं अत्ताच
ते आपला मुलायजा ठेवत नाहीत,
पुन्हा तरं आपल्यालाच ठेवणार
नाहीत. त्यामुळे
कसल्याही परीस्थितीत
संभाजी गादीवर येत कामाच नयेत.
त्यापेक्षा राजारामाला गादीवर
बसवूया. राजाराम अल्पवयी आहे,
त्याला कारभारं जमणार नाही म्हणजे
कारभारं आपल्याच हातात येणारं.
स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत
संभाजीला गादीवर येऊ न
देण्याचा चंग बांधला.
त्यासाठी सोयराबाइंना सरळ सरळ
हाताशी धरलं आणि तिकडं
कराडला "हंबीरराव मोहिते" जे
सोयराबाइंचे सख्खे बंधू, मराठेशाहीचे
सरंसेनापती, सरलष्करं,
त्यांना निरोप पाठवला, पन्हाळ्यावर
संभाजीला कैद करण्यास जायचयं.
आपण ससैन्यं तयार रहा.
त्यांची भूमिका अशी कि कुणाला वाटणारं
नाही, आपला भाचा गादीवर येऊ नये.
आता राजारामाला गादीवर बसवतोय
म्हंटल्यावर मामा "हंबीरराव" तरं
लगेच तयार होतील
आणि झालंही तसंच
हंबीररावांनी लगेच कळवलं
"मी तयारच आहे, तुम्ही या मिळूनच
संभाजीला कैद करायला जाऊ".
मंत्री आनंदले, निघाले, आले.
तळबीडला आले हंबीररावांच्या पुढं.
चला आता सैन्यं घ्या संभाजीला कैद
करायचयं. आणि त्याच
क्षणी हंबीररावांनी डाव बदलला,
बुंबरान त्याचं त्यांच्यावर उलटवलं.
आल्या मंत्र्यांना सरळ
काढण्या चढविल्या. सगळे कैद केले
आणि पन्हाळ्यावर नेऊन
संभाजींच्या पायावर घातले
आणि कडाडले
सरलष्करं..."ही घ्या नादान हरामजाद
माणसं"..."राजं! जाऊन अजून
अकरा दिवस नाही झाले
आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद
करायला आलेत....घ्या ताब्यात!!!"
आणि मंत्री फ़िल्तोरं गिरफ्तार झाले.
संभाजी राजांनी त्यांना कैदेत ठेवलं.
एक महिना पन्हाळ्यावरचं कारभारं
चालवला आणि मग!
संभाजी रायगडावर आले.
पण! या काळात
संभाजींनी हंबीररावांना विचारलं..."मामा
साहेब, आपण राजारामांचे
मामा असून,
आमच्या मातोश्री सोयराबाई
साहेबांचे सख्खे बंधू असून आपण
त्यांच्यापाठीशी उभं
राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं
काय उभं राहिलात?"
त्यावेळी हंबीररावांनी सांगितलं,
"या मंत्र्यांचा डाव लक्षात येताच
आणि मंत्री माझ्याकडे येताच
सोयराबाइंनी मला कळवलं कि,
कैसेही करून
संभाजी राजांना वाचविणे.
सोयराबाइंनी निरोप दिल्यामूळच
मी आपल्याला वाचवू शकलो".
दुर्दैवानं
सोयराबाइंची भूमिका मराठ्यांच्या इतिहासात
"कैकैयी" सारखी करून टाकल्यामुळं
त्याही व्यक्तित्वावर अन्याय
झालायं ही सगळ्यात
मोठी वस्तुस्थिती आहे.
त्यांना भिंतीत छिलून-बिलून मारले,
असल्या काही गोष्टी कल्पोकल्पित
रंगवल्यात. अजीबात नाही,
सोयराबाइंना कुणीही भिंतीत छिलून
मारलं नाही उलट या घटनेनंतर दीड
वर्ष पुढं सोयराबाई जिवंत आहेत,
ही वस्तुस्थिती आहे. रायगडावर
संभाजीराजे आले. शिवरायांचे
अंत्यविधी सुद्धा नीट झाले न्हवते.
संभाजी राजांनी पहिल्यांदा ते करवून
घेतले. रायगडावर
शिवरायांची समाधी उभारली आणि तब्बल
स्वराज्याची घडी नीट बसवून तब्बल
नऊ
महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक
करून घेतला. "संभाजी राजे"
स्वराज्याचे दुसरे "छत्रपती" झाले.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...