फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्र भाग १९

शंभू चरित्र
भाग १९
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
इंग्रजासोबत करार:-तो दिवस होता 26 एप्रिल 1684.संभाजी राजे ज्यावेळी बीरवाडीच्या किल्ल्यामध्ये मुक्कामी होते व इंग्रजांबरोबर करार करण्यासाठी ते तेथे पोहचले होते.
यापूर्वी संभाजी राजांनी इंग्रजांची चांगलीच नाकाबंदी केली होती व त्यामुळेच ते तहाला व मैत्रीपुर्ण करारासाठी उत्सुक होते.
अनेक दिवसांपासून यासाठी ते संभाजी राजांच्या होकाराची वाट पहात होते.
तहानुसार इंग्रजांना मराठ्यांच्या मालकीची किनारपट्टी असलेल्या जिंजी व मद्रास प्रांतात वखार बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली.
परंतु त्याचवेळी संभाजी राजांनी धुर्त इंग्रजांची भावी डावपेचाची रणनिती पाहुन त्याचवेळी इंग्रजांना निक्षुन बजावले होते.
"आपण येथे फक्त व्यापार आणि व्यापारच करायचा व्यापाराच्या नावाखाली स्थानिक राजकारणात नाक खुपसायचे नाही व वखारीच्या नावाखाली किल्ले बांधायचे नाहीत".
अगदी वखारीची लांबी रुंदी आणि उंचीही संभाजी राजांनी निर्धारित करुन दिली.
व त्याप्रमाणे वखार बांधावी असे सुचविले.
जेणेकरुन वखारीच्या नावावर इंग्रजांना भुईकोट किल्ला बांधण्यास वाव मिळणार नाही याची दक्षता घेतली गेली.
शिवाय आयात निर्यातीवर जकात आकारली आणि त्याचवेळी इंग्रजांना कोणतीही सुट न देण्याची कठोर भूमिका त्यांनी इंग्रजांबाबत राबवीली.
त्याचवेळी वखारीत काम करणार त्यांची नावे व पत्ते जवळच्या सुभेदाराकडे किंवा अंमलदाराकडे देणे बंधनकारक केले.
वखारीत लोक कामाला ठेवताना ते स्थानिक असावेत व त्यासाठीपरवाना घेण्याची सक्त ताकीदही संभाजी राजांनी इंग्रजांना दिली होती.
गुलामाची पोरे विकण्यावर व खरेदी करण्यावर बंदी घातली.
इंग्रज या गोष्टीसाठी जवळपास अगोदर असणार्या जकातीच्या सहा ते आठपट जकात देण्यासतयार झाले होते.
तरीही जकात मिळणार म्हणुन माणुसकी आणि माणसे विकायला संभाजी राजे थोडेचतयार होणार होते.
इतरांची साम्राज्य पैशाच्या बदल्यात माणसे विकत घेऊन वाढली असतील.
परंतु स्वराज्याच्या निर्मितीत माणसाला माणुस म्हणुन वागणुक मिळावी हाच उदात्त हेतु होता व संभाजी राजे तो पुर्ण पाळत होते.
म्हणूनच त्यांनी गुलामगिरीच्या वेठबिगारीच्या पध्दतीला परवानगी दिली नाही.
उलट "एवढीच गुलामांची गरज असेल तर स्वत:च्या देशातुन गुलाम म्हणुन माणसे आणा म्हणजे माणुसकीची किंमत कळेल.
"असा इशाराही इंग्रजांना दिला.
व्यापार उद्दीमाच्या नावाखाली माणसे खरेदी करण्याचा उद्योग आणि वेठबिगारीची पध्दत मोडीतच काढली.
एकुणच काय तर बालकामगार विरोधी कायदा करणारे छत्रपती संभाजी राजे हे आधुनिक काळातील पहीले राजे ठरले.
परंतु आपणालाहे कोणी सांगितले नव्हते, तर ते आपण पुढच्या पीढीला कशातुन सांगणार?
शेवटी आपल्यालाच आपल्या इतिहासाची कदर नसेल तर कपाळ फोडून काय करणार?
इंग्रजाबरोबरीचे तहाचे शेवटचे कलम होते.
"स्वराज्याच्या हद्दीतील कोणाही मनुष्यमात्रास गुलाम म्हणुन किंवा धर्माँतर करुन ख्रिस्त करण्यासाठी इंग्रजांना विकत घेण्यावर निर्बंध".
धर्मांतर होऊ नये यासाठी आमिषाच्या बळावर किंवा मारुन मुटकून धर्मांतर होऊ नये या साठी धर्माँतर बंदीचा कायदा करणारा राजा म्हणूनही छत्रपती संभाजी राजांना हिंदुस्तान ने लक्षात ठेवायला हवे होते.
परंतु आपला देश ठरला लोकशाहीवादी अर्थातलोकशाही म्हणजे पुढर्यांना वेगवेगळे सोंगे मिरवण्याची मुक्त परवानगीच त्यामुळेच सांप्रद काळात सगळा बट्ट्याबोळ होऊन बसतो.
परंतु संभाजी राजांनी अगदी दुरदर्शीपणे 350वर्षापुर्वी अशाप्रकारे गुलामगिरी विरोधात वेठबिगारी विरोधात बालकामगार विरोधात व धर्मांतराबाबतीतकायदे करुन एक आदर्श राजा असल्याचे सिध्द केले.
परंतु बखरकारांनी संभाजी राजांची ही रुपे आणि सामाजिक सुधारणा कधीच लोकांसमोल येणार नाहीत याची दक्षता घेतल्यानेच हा इतिहास लपुन राहीला हे ही तेवढेच खरे....!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुविरराजे....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...