फॉलोअर

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ७४

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ७४
महाराष्ट्राचा इतिहास
भाग ३
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य
अजिंठातल्या लेणी
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले.मोहंमद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबाद येथे केली.बहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ७३

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ७३
महाराष्ट्राचा इतिहास
भाग २
मौर्य ते यादव
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)
मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
कलाचुरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती व राष्ट्रकूटांचा काळ
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.
यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ७२

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ७२
महाराष्ट्राचा इतिहास
भाग
महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
प्राचीनकाळ
नावाचा उगम
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु जे चूक आहे ! कारण महार शब्दाचा उल्लेख 12 व्या शतका आधी कोणत्याच साधनांत सापडत नाही ! महाराष्ट्र शब्दाची फोड " महा राष्ट्र " असा होतो ! महारठ्ठ हे महाराष्ट्राचे प्रकृत नाव आहे ! प्राकृत भाषेत रठ्ठ म्हणजे राष्ट्र होय ! काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
पहिले
मध्यपाषाणकालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४०००मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली. महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५००चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ७१

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ७१
सातवाहन राजघराणे
भाग
सातवाहन राज्याची पार्श्वभूमी असलेले मराठी ललित साहित्य
गाथा सप्तशती (सुमारे ७०० कवितांचा संग्रह)
नागनिका (कादंबरी, लेखिका : शुभांगी भडभडे)
रसिक महाराष्ट्र (गाथा सप्तशतीचा काव्यानुवाद : कवी : रामचंद्र गोविंद चोथे व शशांक रामचंद्र चोथे)
हाल सातवाहनाची गाथा सप्तशती (जोगळेकर)
हिरण्यदुर्ग (कादंबरी, लेखक : संजय सोनवणी)
सातवाहन राजांची वंशावळ
सिमुक सातवाहन
कृष्ण सातवाहन
पहिला सातकर्णी
वेदिश्री
शक्तिश्री
पूर्णोत्संग
स्कंदस्तंभि
दुसरा सातकर्णी
लंबोदर
अपिलक
मेघस्वाती
स्वाती सातवाहन
स्कंदस्वाती
मृगेंद्र
कुन्तल
स्वातिवर्ण
पहिला पुलुमावी
अरीष्टकर्ण
हाल सातवाहन
मण्टलक
पूरींद्रसेन
सुंदर सातकर्णी
चकोर
शिवस्वाती
गौतमीपुत्र सातकर्णी
वासिष्ठीपुत्र पुलुमावि
वासिष्ठीपुत्र स्कंदसातकर्णी
वासिष्ठीपुत्र सातकर्णी
गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
माठरीपुत्र शकसेन
गौतमीपुत्र विजय सातकर्णी
वासिष्ठीपुत्र चंद्रस्वाती
तिसरा पुलुमावी

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ७०

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव





भाग ७०
सातवाहन राजघराणे
भाग ३
राज्यकर्ते
सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.
शातकर्णी मुद्रा
नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :
राजा सिमुक सातवाहन,
राणी नागनिका,
राजा श्री सातकर्णी (नागनिकेचा पती),
कुमार भाय (राजपुत्र),
महारठि गणकयिरो अथवा महारथी गणरयिर (राणी नागनिकेचे पिता),
कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
कुमार सातवाहन (राजपुत्र)
हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.
ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेले इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो.
सिमुक सातवाहन(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे
इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.
सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून शुंगांची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
पहिला सातकर्णी (नागनिकेचा पती.)
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
वेदिश्री
सतिसिरी (शक्तिश्री)
हाल सातवाहन
गौतमीपुत्र सातकर्णी
आपिलक
कुंतल
सुनंदन
सुंदर
वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
गौतमीपुत्र विजय सातकर्णी
चंड सातकर्णी
वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
पुलुमावी (पुळुमावी)
यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौशिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६९

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ६९
सातवाहन राजघराणे
भाग २
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६८

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ६८
सातवाहन राजघराणे
भाग १
सातवाहन हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती.चंद्रवंशी यादव कुळातील राजा सिमुक सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते सातवाहन राजे आपल्या नावा अगोदर आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी वशिष्ठ पुत्र फुलवावी इत्यादी सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. आधीचे मौर्य साम्राज्यात बौद्ध धर्माचा बराच प्रभाव होता त्यामुळे यांनी बौ्द्ध विचारांशी निगडीत राहून राज्यकारभार केला. परंतू है वैदीक आचरनाचे असल्यामुळे कालांतराने बर्याच वैदीक व्यवस्थांच पुनःजागृती केली.जसे हातघाईला आलेली गुरूकुल शिक्षण व्यवस्था पुन्हा नव्या जोमाने सुरू केली. सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ शासन गौतमीपुत्र सातकर्णी हा होईल गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा वर विजय मिळवला या विजयाने सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण वापरतात दिग्विजय केला त्यांनी दक्षिणेकडील राज्य अवंती सुराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला त्याचप्रमाणे मध्य भारतात व राजस्थान येथे असलेल्या गणराज यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले नाशिक जिल्ह्यात जोगलटेम्भी येथे एका नाणेनिधी मिळालेला आहे शकराजा नहपानाची याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात त्यावरून नहपानावर विजय मिळवून त्याने आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं हे स्पष्ट आहे गौतमिपुत्रा नंतर वशिष्ठपुत्र फुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे सातवाहन घराण्यात होऊन गेले त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला आणि शक आणि सातवाहानांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बल होत गेली

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६७

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ६७
शालिवाहन शक
शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६६

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग ६६
गौतमीपुत्र सातकर्णी (शालिवाहन)
भाग ३
आख्यायिका
या राजाबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे.
शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला.
संदर्भ
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा.वि. मिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा, पृष्ठ ६४ ).

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६५

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ६५
गौतमीपुत्र सातकर्णी (शालिवाहन)
भाग २
गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.
अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण l हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.
आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.
गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो.
स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६४

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ६४
गौतमीपुत्र सातकर्णी (शालिवाहन)
भाग १
गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन (?? - इ.स. ८६) हा सातवाहन वंशातील एक राजा होता. सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात याचा मोठा वाटा होता. त्याने बेनाकटस्वामी अशी पदवी धारण केलेली होती.
राज्यविस्तार
गौतमीपुत्र सातकर्णी याने विदर्भावर चाल करून तेथील क्षत्रपांचा पराभव केला. पश्चिम महाराष्ट्रातील नहपान या महाक्षत्रपाचाही पूर्ण पराभव केला. महाराष्ट्रातील शक, यवन यांचाही बिमोड केला. तसेच आपले राज्य उत्तरेस सौराष्ट्र, पश्चिमेस कोकण, पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले.
कार्य
सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.
याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णीचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते. तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला. एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हा शालिवाहन शक सुरू झाला. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते. याने चातुवर्ण्यसंकर बंद केला व बौद्ध धर्मास उदार आश्रय दिला.
त्याने नाशिक येथील क्रमांक तीनचे लेणे भिक्षूंकरिता कोरविण्यास आरंभ केला होता.
गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-इ.स. १०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. [१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६३

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ६३
शालिवाहन कोण होता ?
आपण मराठी माणसं त्याच्या नावाने कालगणना का करतो ? 2000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असं काय झालं, ज्यामुळे मराठी वर्षाला सुरुवात झाली? असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित पडलेही नसतील. आणि याचीच खंत इतिहासकार व्यक्त करत आहे. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.ठिकाण नाशिक..वर्ष इसवी सन 78..मध्य आशियातल्या शकांनी हल्ला चढवला होता. आणि त्यांना परतवून लावण्याचं आव्हान होतं पैठणच्या गौतमीपुत्रासमोर.. आणि त्यानं ते मोठं आव्हान लीलया पेललं..तेव्हापासूनच.. महाराष्ट्रात.. गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली.शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा...प्रतिष्ठान.. म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपापर्यंत पोचला होता. महाराष्ट्रातल्या कापडांना आणि वस्तूंना अगदी रोममध्ये मागणी होती. सुमारे 450 लेण्यांची निर्मिती सुरू होती. पैठणमध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच.. त्यावेळच्या सुबत्तेची कल्पना येते.इतिहासकार रा श्री मोरवंचीकर यांनी गौतमीपुत्र आणि संपुर्ण शालिवाहन कुळाचा अभ्यास केला. ते सांगतात की, शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. तसंच गौतमीपुत्र या शालिवाहन राजानं संस्कृतपेक्षा प्राकृत. म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रूपाला पहिल्यांदाच चालना आणि राजाश्रयही दिला.पैठणच्या आणि औरंगाबादच्या संग्रहालयात गौतमीपुत्र आणि इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. किमान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी आपण या आद्य मराठी शुरांचं स्मरण नक्कीच करायला हवं.
माधव सावरगावे, औरंगाबाद

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६२

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
भाग ६२
शालिवाहन : पैठणच्या सातवाहन घराण्यातील एका राजाचे नाव. याविषयी सबळ ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. अलीकडे उपलब्ध झालेल्या नाण्यांवरून सातवाहन हे व्यक्तिनाम असावे. पुढे त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या वंशाला ते मिळाले [⟶ सातवाहन वंश]. त्याचे मूळ प्राकृत रूप ‘सालाहण’ असे आढळते. त्याचे पुढे संस्कृतीकरण होऊन ‘शालिवाहन’ असे राजनाम बनले. याचा शातवाहन, शाकवाहन, आंध्रभृत्य, आंध्र असाही उल्लेख आढळतो. शालिवाहन या शब्दाचा अर्थ शालि–साळी–चे भात भरलेली गाडी, तिला पाणिनीय काली शालिवाहण म्हणत. शालिवाहण हे ज्यांचे विशिष्ट देवक ते घराणे शालिवाहण (न) आडनाव धारण करी. शालिवाहन हे देवक असण्याचे कारण कलिंग व आंध्र प्रदेश यांत पूर्वी व आजही भात हेच मुख्य पीक आहे.
शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका आहेत. त्यांपैकी एका ब्राह्मणाचे दोन मुलगे व मुलगी असे तिघे जण आईवडिलांच्या मृत्यूनंतर पैठण नगरात गेले आणि तेथे एका कुंभाराच्या घरी राहू लागले. एकदा ती मुलगी गोदावरी नदीवर स्नानास गेली असता, तिच्यावर शेषाची नजर गेली. त्याने तिला मोहून टाकले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. कुंभाराच्या घरी वाढल्यामुळे तो मातीची खेळणी करण्यात तरबेज झाला. मातीच्या भातगाड्या तयार करून तो आपल्या सवंगड्यांना देत असे. त्यावरून या मुलाचे नाव शालिवाहन पडले. या वेळी उज्जयिनीला विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. त्याला वेताळाकडून समजले की, आपला नाश करणारा एक मुलगा पैठणला वाढत आहे. त्याने पैठणवर स्वारी करून सोमकांत राजाचा पराभव केला व त्यास कैद केले. शालिवाहनाला ही गोष्ट कळली, तेव्हा तो मातीचे घोडे, हत्ती, शिपाई यांच्याशी खेळत होता. त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने शेषराजाचे स्मरण केले व मातीच्या खेळण्यांत प्राण फुंकले. तेव्हा त्यांतून असंख्य सैन्य व घोडेस्वार बाहेर पडले. त्यांच्या मदतीने शालिवाहनाने विक्रमादित्याचा पराभव केला आणि सोमकांताची कैदेतून मुक्तता केली. पुढे पैठणच्या जनतेने शालिवाहनाला आपला राजा म्हणून निवडले.
महाराष्ट्रात शालिवाहन राजाचे नाव शक कालगणनेशी जोडलेले आढळते परंतु त्याचा या कालगणनेशी काहीच संबंध नाही, हे आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे. शालिवाहनाने नाव शक वर्षाशी निगडित झालेले कृष्णदेव यादव (कार. १२४६–६१) याच्या तासगाव (सांगली जिल्हा) ताम्रलेखात (१२५१) प्रथम आढळते. तत्पूर्वी पंढरपूर येथील यादवांच्या शिलालेखात (११८९) सालवण सुरी किंवा सालहण असा शक उल्लेख येतो. तो शालिवाहन शकाचा असावा, असे व्युत्पत्तीच्या आधारे वाटते. त्यामुळे शालिवाहनाने इ.स. ७८ या वर्षी शक संवत्‌ सुरू केला, ही प्रचलित समजूत निर्मूल असल्याचे सिद्ध होते. [⟶ कालगणना, ऐतिहासिक].
देशपांडे, सु. र.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
भाग ६१
सातवाहन
शिवपूर्व काळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदू राजे होऊन गेले पुढे या आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला. महाराष्ट्रात #सातवाहन राजाने राज्य केले. ________________________________ सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली. पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे.

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ६०

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ६०
पोस्तसांभार ::मराठा युग
----------------------------------------------------
महाराष्ट्र का नाम लेते ही हमारे सामने सबसे पहला नाम आता है हमारे भगवान का यानी कि छत्रपति श्री शिवाजी महाराज का महाराष्ट्र का इतिहास कहां जाए तो हमें छत्रपति शिवाजी महाराज और उनके बाद का इतिहास बताया जाता है लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के पहले का महाराष्ट्र कैसा था इसके बारे में बहुत कम लोगों को जानकारी है तो आज हम महाभारत कालीन महाराष्ट्र की जानकारी लेंगे मतलब डायरेक्ट आज से लगभग साडे पांच हजार पहले का द्वापर युग का महाराष्ट्र कैसा था इसकी जानकारी आज हम लेंगे।
तो आजकल हम देखते है की हमारे हिंदुस्तान में जो राज्य है वह भाषा के हिसाब से निर्धारित है बटे है अलग-अलग भाषा के हिसाब से अलग-अलग राज्य बने हैं। लेकिन पहले ऐसा नहीं था तो महाभारत काल से लेकर इसवी सन पूर्व छठी शताब्दी तक यानी कि आज से लगभग २६०० साल पहले तक ऐसे भाषा के हिसाब से राज्य नहीं थे उस वक्त पूरा हिंदुस्तान एक था इस संपूर्ण हिंदुस्तान में १६ महाजनपद थे क्योंकि उस वक्त सब की बोली भाषा एक ही थी सब की बोली भाषा संस्कृत थी यह १६ राज्य जनपद उस राज्य के राजा के नाम से जाने जाते थे।
तो इस १६ महाजनपदों में दो प्रकार पड़ते हैं एक महाभारत कालीन महाजनपद और दूसरा महाभारत के युद्ध के बाद सभी राज्य ध्वस्त हो गए इस कारण महाभारत युद्ध के बाद फिर से राज्यों की स्थापना हुई और उस महाभारत काल के बाद के राज्यों की महाजनपदों की भौगोलिक स्थिति कुछ नाम और कुछ स्थान विभिन्न है।
तो हम पहले महाभारत काल में महाराष्ट्र किस महाजनपद का हिस्सा था इसके बारे में जानकारी लेते हैं।
तो महाभारत काल में महाराष्ट्र का एक बड़ा हिस्सा मतलब #विदर्भ यह विदर्भ महाजनपद था आज भी इसे विदर्भ ही कहा जाता हैं।
विदर्भ शब्द का अर्थ होता है वीर और तर्फ इस्का अपभ्रंश होके विदर्भ हुआ तर्फ मतलब प्रदेश इस तर्फ का दर्भ हो गया और वीर का र निकल गया और बन गया विरो का प्रदेश याने विदर्भ जो महाराष्ट्र है उसकी जड विदर्भ है।
भगवान श्रीकृष्ण जी की पहली पत्नी श्री रुकमणी माता इसी विदर्भ की थी राजा #भीष्मक यह विदर्भ के राजा थे और उनकी बेटी श्री रुक्मिणी माता थी रुक्मणी माता के माता का नाम #शुद्धमती था और रुकमणी माता का भाई राजकुमार रुक्मी थे और विदर्भ राज्य के उत्तराधिकारी यही थे तो यह हो गई महाराष्ट्र के एक जनपद की जानकारी।
और दूसरा एक महाजनपद था जिसका कुछ हिस्सा आज के महाराष्ट्र में आता है यानी कि पांचाल महाजनपद आज के महाराष्ट्र के जलगांव जिले का जो पाचोरा नामक शहर है वही पहले पांचाल नगरी थी भगवान श्रीकृष्ण जी की बहन और पांडवो की पत्नी #द्रोपदी यह इसी राज्य की राजकुमारी थी इस राज्य के राजा #द्रुपद थे।
यह दो हो गए महाभारत कालीन महाजनपद विदर्भ और पांचाल जो आज के महाराष्ट्रभूमि में आते थे तो महाभारत के युद्ध के बाद जो पुनः राज्य स्थापित हुए महाजनपद स्थापित हुए उसमें कौन से महाजनपद महाराष्ट्र भूमि में आते हैं इसके बारे में अब जानकारी लेते हैं।
तो महाभारत काल के बाद से लेकर इसवी सन पूर्व छठी शताब्दी तक जो महाजनपद थे उनकी लिस्ट यह रही
१)अंग २)अवंती ३)अश्मक ४)कांबोज ५)काशी ६)कुरू ७)कोसल ८)चेदी ९)पांचाल १०)मगध ११)मत्स्य १२)मल्ल १३)वत्स १४)वृज्जी १५)शूरसेन १६)गांधार.
इसमें जो #अशमक महाजनपद है यह आज के महाराष्ट्र में आता था यह एकमात्र दक्षिण में स्थित महाजनपद था इसकी राजधानी प्रतिष्ठान यानी कि आज का #पैठण थी इशवाकु वंश के राजा यहा राज करते थे।

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ५९

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ५९
पोस्तसांभार ::मराठा युग
गुढीपाडवा सनातन वैदिक आर्य हिंदू धर्माचा नववर्षारंभ त्या दिवशी श्रीब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. हे आपण सर्वजण जाणतो पण त्याचबरोबर या दिवसाचे एक फार मोठे महत्त्व आहे फार मोठा इतिहास आहे. आज शालिवाहन शक १९४३ ला प्रारंभ होत आहे आपण कायम शालिवाहन शक हे नाव ऐकतो आणि अजूनही दोन हजार वर्षे झाले तरी ते वापरतो पण या मागचा महाराष्ट्राचा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास दुर्दैवाने कोणालाच माहिती नाही फार क्वचित लोकांना माहिती आहे.
जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विदेशी मोगलांनी भारतावर आक्रमण केले होते आणि भारत हा महाराष्ट्र पारतंत्र्यात होता हिंदू धर्म धोक्यात होता त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य (मराठा साम्राज्य) निर्माण केले आणि ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळापर्यंत संपूर्ण भारतावर पसरलेले होते त्यामुळे आज हिंदू धर्म आणि हा भारत अस्तित्वात आहे. तसेच दोन हजार वर्षांपूर्वी देखील या भारतावर महाराष्ट्रावर विदेशी आक्रमक शकांनी आक्रमण केले होते. शक म्हणजे मध्य आशियात राहनाऱ्या लुटारू आक्रमणकारी टोळ्या होत्या आणि त्यांनी भारतावर महाराष्ट्रावर आक्रमण केले होते आणि हा भारत देश महाराष्ट्र पारतंत्र्यात होता.
तर ही गोष्ट आहे १९४३ वर्षांपूर्वीची त्यावेळी महाराष्ट्रावर पहिले क्षत्रिय मराठा राजघराणे सातवाहन राजांचे राज्य होते आताचे पैठण राजधानी व जुन्नर उपराजधानी होती. आणि त्यांच्यावर विदेशी शंकांचे अतिक्रमण झाले होते त्या वेळी सातवाहन साम्राज्याचे २३ वे मराठा सम्राट #गौतमीपुत्र_सातकर्णी गादीवर होते. सातवाहन वंशात एकूण ३० राजे झाले त्यापैकी गौतमीपुत्र सातकर्णी हे सर्वात पराक्रमी सम्राट होते.
विदेशी शकांचा नहपान नावाचा राजा होता त्याच्यात आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यात अनेक युद्ध झाले आणि त्यांची शेवटची अंतिम लढाई नाशिक येथील गोवर्धन या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शक राजा नहपान याचा पराभव केला त्याचा शिरच्छेद करून त्याला ठार केले व या दक्षिण भारताला महाराष्ट्र भूमीला विदेशी शकांपासून मुक्त केले.
आणि उरलेल्या शक लोकांना गुजरात कच्छ च्या पुढे राजस्थान पर्यंत हाकलून दिले पुढे याच शक लोकांना राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले तेच लोक आज स्वतःला रजपुत म्हणतात.
ज्या दिवशी गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव केला तो दिवस होता गुढीपाडव्याचा शकांवर विजय मिळवून जेव्हा गौतमीपुत्र सातकर्णी आणि सर्व सैनिक महाराष्ट्रात राजधानी पैठण येथे आले तेव्हा सर्वांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. शकांवर विजय मिळवला म्हणून गौतमीपुत्र सातकर्णि यांनी शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली. आज शालिवाहन शक १९४३ ला प्रारंभ होत आहे आणि विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठण येथे गोदावरी नदीच्या किनारी एका विजयस्तंभाची निर्मिती केली जो आज १९४३ वर्षे उलटून गेली तरी देखील डौलाने उभा आहे आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे.
त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा हा सण ब्राह्मणांनी सुरू केला वगैरे या भंपक गोष्टी आहे आपले पूर्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज काय मूर्ख नव्हते गुढीपाडवा करायला गुढीपाडवा हा सातवाहन कालापासून साजरा होतोय.
विदेशी शकांना हरवून या दक्षिण भारताचे महाराष्ट्राचे हिंदू धर्माचे रक्षण करणारे महापराक्रमी, दिग्विजयी, दक्षिनापथपती, त्रिसमुद्रतोयपितवाहन महान क्षत्रिया मराठा सम्राट श्री गौतमीपुत्र सातकर्णी यांना मानाचा मुजरा🙏🕉️🚩
🚩!!जय भवानी!!🚩
🚩!!जय शिवराय!!🚩
🚩!!जय सातवाहन!!🚩
🚩!!हर हर महादेव!!🚩

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ५८

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ५८
महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि निर्मिती
पोस्तसांभार ::मराठा युग
1 मे महाराष्ट्र दिन.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली निर्मिती नव्हे 1 मे 1960 रोजी सरकारी दृष्ट्या मुंबई महाराष्ट्राला जोडून महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. मग त्या अगोदर महाराष्ट्र राज्य नव्हते का....?
तर नक्कीच होते महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर 2500 वर्षांपूर्वीच झाली आहे. मराठी भाषा मराठी संस्कृती ही 2500 वर्षे जुनी आहे. 2500 वर्षांच्या अगोदर तर भाषेनुसार प्रांत नव्हतेच तेव्हा सर्व संस्कृत बोलायचे सर्वांची बोलीभाषा एकच संस्कृत होती आणि तेव्हा भारतात 16 महाजनपद होते आणि त्यामध्ये महाराष्ट्र #अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजन पदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजेच #इश्वाकु वंशातील राजे राज्य करायचे.
महाराष्ट्र म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या आराध्य दैवताच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच शिवरायांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्राच काय आज हा संपूर्ण हिंदुस्तान हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.
पण जे महाराष्ट्राचे निर्माते आहेत ज्यांनी हे महाराष्ट्र राज्य पहिल्यांदी घडवले जो महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश आहे तो म्हणजे #सातवाहन. मराठा सातवाहन साम्राज्याची मुख्य राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजेच आत्ताचे #पैठण होती व उपराजधानी #जीर्णनगर म्हणजे आत्ताचे जुन्नर होती.
सातवाहनांनी अश्मक (पैठण), नासिक्य (नाशिक), कुंतल(कोल्हापूर), गोमंतक (गोवा), विदर्भ, अप्रांतक (कोकण), गोपराष्ट्र या सर्व प्रांतांचा मिळून महाराष्ट्र बनवला.
पण अज्ञानी मराठे या सातवाहन राजवंशाला आणि या राजवंशातील सर्वात महान सम्राट #गौतमीपुत्र_सातकर्णी यांना साफ विसरलोय ज्यांचा पराक्रम शिवतुल्य आहे. जसे शिवरायांनी 400 वर्षांपूर्वी या विदेशी आक्रमक मुसलमानांपासून हा बुडालेला महाराष्ट्र हिंदू धर्म आणि अखंड हिंदुस्तान वाचवला त्याला नवी प्राणज्योत दिली म्हणून आज आपले अस्तित्व आहे. तसेच गौतमीपुत्र सातकर्णी यांनी देखील 2000 वर्षांपूर्वी विदेशी आक्रमक शकांपासून हा बुडालेला महाराष्ट्र हिंदू धर्म हिंदुस्तान वाचवला आणि त्याला नवी प्राणज्योत दिली म्हणून आज आपले अस्तित्व आहे.
शक म्हणजे ग्रीक आणि मध्य आशियातून आलेल्या लुटारू टोळ्या होत्या त्यांनी भारतावर आक्रमण केले होते आणि भारत पारतंत्र्यात गेला होता त्यावेळी दक्षिण भारतातील जे शक होते त्यांचा राजा होता नहपान त्याने गुजरात आणि महाराष्ट्राचा जुन्नर नाशिक या भागावर अतिक्रमण केले होते तेव्हा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी नाशिक येथील गोवर्धन या ठिकाणी शकांचा राजा नहपान याचा पराभव केला तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजेच गुढीपाडव्याचा आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांनी या विजयाचे प्रतिक म्हणून राजधानी पैठण या ठिकाणी गोदावरी नदीच्या किनारी एक विजयस्तंभ बांधला जो आज देखील आहे. आणि शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली जे की आज 1943 चालू आहे.
पण दुर्दैवाने महाराष्ट्राचा मराठ्यांचा हा गौरवशाली प्राचीन इतिहास खुद्द मराठेच विसरलेत तर दुसऱ्यांचा तर विषयच सोडा त्यामुळे याचा गैरफायदा इतर लोक घेतात आणि आपला इतिहास चोरतात काहींनी सातवाहन राजांना कुंभार घोषित केले काहींनी शूद्र घोषित केले काहींनी ब्राह्मण घोषित केले हे सर्व का झाले कारण जे सातवाहनांचे खरे वंशज क्षत्रिय मराठे आहेत त्यांनी आपला इतिहास विसरल्यामुळे आणि सातवाहनांवरील हक्क सोडल्यामुळे तरी सर्वांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजां बरोबरच आपल्या महाराष्ट्राचा जो प्राचीन गौरवशाली इतिहास आहे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव याकडेही इतिहासकारांनी ,पोस्ट लिहिणार्यांनी ,युट्यूब वर व्हिडिओ बनवणार्यांनी लक्ष द्या.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...