संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
महाभारतकालीन महाराष्ट्र आणि #ब्रम्हपूरी_प्रतिष्ठानपूरी_पैठण
पोस्तसांभार ::मराठा युग
रामायण आणि महाभारत काळामध्ये भाषेनुसार प्रांत विभागलेले नव्हते सर्व संस्कृत बोलायचे आणि भारतात 16 महाजनपद होते त्यामध्ये रामायण-महाभारत काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन महाजनपद होते भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी रुक्मिणी माता विदर्भ महाजनपदाची राणी होती विदर्भाला आज देखील विदर्भ म्हणतात त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची बहिण आणि पांडवांची बायको द्रौपदी हि पांचाल महाजनपदाची राणी होती आणि पांचाल महाजनपद म्हणजे आजच्या जळगाव जिल्ह्यातील जे पाचोरा शहर आहे ती पूर्वीची पांचाल नगरी होती त्यानंतर महाभारताचे युद्ध झाले आणि सर्व महाजनपद नष्ट झाले त्यानंतर पुन्हा नव्याने महाजनपद स्थापन झाले
महाभारत काळाच्या नंतरच्या म्हणजेच कलियुगातील महाजनपद जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्र हा अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजनपदवर इश्वाकु वंश शिवराजे म्हणजेच भगवान श्री रामाचे वंशज राज्य करीत होते अश्मक महाजनपदाची राजधानी प्रतिष्ठान पुरी म्हणजेच आताचे पैठण होती अश्मक महाजनपद इसवीसनपूर्व 600 म्हणजे आजपासून 2600 वर्षांपूर्वीपर्यंत होते त्यानंतर जेव्हा भाषेनुसार प्रांत निर्माण झाले तेव्हा महाराष्ट्रात राज्य करणारे पहिले क्षत्रिय मराठा घराणे म्हणजे सातवाहन त्यावेळेस मराठी भाषा मराठी संस्कृती निर्माण झाली त्या अगोदर सर्व संस्कृत बोलायचे त्यामुळे जेव्हा मराठी भाषा मराठी संस्कृती निर्माण झाली तो काळ 2500 वर्षांपूर्वीचा त्यामुळे महाराष्ट्र हा सातवाहन राजांनी निर्माण केला असे म्हटले आहे
-----------------------------------------
दक्षिण गंगा गोदावरी नदी किनारी वसलेली प्राचीन नगरी पैठण महाराष्ट्राचे त्याचबरोबर दक्षिण भारताचे मुख्य स्थान मराठ्यांचे उगम स्थान दक्षिण काशी पैठण.

त्याचबरोबर इंद्रदेवाने देखील याच परिसरात महादेवाची तपश्चर्या केली त्यामुळेच स्वतः इंद्रदेवाने स्थापित केलेले इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आज देखील पैठण येथील नाग घाट परिसरात आहे.

त्यानंतर महाराष्ट्रात उदयाला आलेल पहिल क्षत्रिय मराठा घरानं म्हणजे सातवाहन या सातवाहन साम्राज्याची मुख्य राजधानी देखील प्रतिष्ठानपुरी म्हणजे पैठण ही होती उपराजधानी जुन्नर होती.

ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ठिकाण म्हणजे पैठण; पैठण मधील नागघाट या ठिकाणी आज देखील ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे ज्याठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ठिकाण म्हणजे नागघाट.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनीदेखील पैठणच्या भूमीत वास केला आणि त्यांच्या पंथीय कार्याला सुरुवात देखील पैठण या ठिकाणावरून झाली.
जैन पंथीयांचे देखील एक प्रमुख देवस्थान पैठण येथे आहे जिथे महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून लोक दर्शनासाठी येतात.
उत्तरेतले धर्मपीठ म्हणजे काशी तसेच दक्षिण भारताचे धर्मपीठ म्हणजे पैठण पैठणला दक्षिण काशी म्हणून ओळखले जायचे. संस्कृत आणि हिंदू धर्म शास्त्रांचा अभ्यास करणारे ब्राह्मण धर्मपंडित संत पैठण मध्ये होते पैठणच्या पंडितांचा निर्णय अखेरचा मानला जायचा.
नवनाथांनी देखील पैठण मध्ये तपश्चर्या केली होती गोदावरी नदी किनारी नवनाथांच्या नऊ गुंफा आज देखील आहे.

१) सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा पराभव करून जो विजयस्तंभ बांधला तो आज २००० वर्षानंतर देखील गोदावरी नदी किनारी उभा आहे आज त्याला तीर्थ खांब म्हणून ओळखले जाते.
२) संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर व त्यांचा वाडा गोदावरी नदी किनारी आहे.
३) सातवाहन राजांच्या महालाचे अवशेष कोरीव खांब व सातवाहन कालीन विहीर आहे. व अनेक प्राचीन वाडे देखील पैठणमध्ये आहे.
४) जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर देखील पैठण जवळ आहे.
५) संत ज्ञानेश्वर उद्यान जांभूळ बाग प्राचीन नागघाट आणि नाग घाटाच्या परिसरातील हनुमंताचे श्री दत्ताचे आणि इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर देखील पाहण्यासारखे आहे.
साडी प्रकारातील पैठणी हे नाव देखील पैठण या ठिकाणावरून त्या साडीला मिळाले आहे.
असे हे महाराष्ट्राचे मराठ्यांचे उगम स्थान महाराष्ट्राची पहिली राजधानी महाराष्ट्राची शान पैठण सर्वांनी नक्कीच पैठणला भेट द्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपा.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा