संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
विदर्भ ( वऱ्हाड ) चा अतिप्राचीन इतिहास --------------------२
१६८० त संभाजी राजे व १६९८ त छत्रपती राजाराम यांनीं देवगडच्या गोंड राजाच्या मदतीनें सर्व प्रांत उध्वस्त केला. मराठयांनां १७१८ त वऱ्हाडची चौथाई मिळाली. निजाम व खानदेशचा सुभेदार मुबारिझ यांची १७२४ च्या सुमारास साखरखेडलें येथें लढाई होऊन निजामचा जय झाला व तो दख्खनचा सुभेदार होऊन तेव्हांपासून वऱ्हाड त्याच्या ताब्यांत गेला. तो अध्यापपर्येत त्याच्याकडे (नांवानें) चालूच आहे. नागपूरकर भोंसल्यांनी सर्व प्रांतभर आपले अधिकारी ठेविले होते; त्याचें सैन्यहि तेथें होतें; तेच तेथील निम्में अधिकि उत्पन्न घेत. परंतु निजाम हा या वऱ्हाडंचा मालक म्हणून नेहमीं हक्क प्रतिपादीत असे; उग्दीरच्या लढाई नंतर (१७६०) मेहकर व दक्षिणेकडील कांहीं परगणे व खडर्याच्या लढाईनंतर (१७९५) उंबरखेड व कांहीं परगणे पेशव्यांनां मिळाले, निजाम आणि भोंसलें यांच्यामध्यें वऱ्हाडांतील वर्चस्वाविषयीं झटापट १७३७ मध्यें सुरू झाली तिचा १८०३ मध्ये शेवट झाला. त्यावेळीं वेल्स्कीनें गाविलगड घेतल्यानंतर भोसल्यांनीं तह करून वर्धा, गाविलगड आणि नर्नाळा यांच्या पश्र्चिमेकडील प्रदेशाचा हक्क सोडून दिला. १८०४ मधील हैदराबादच्या तहाप्रमाणें हा प्रदेश निजामकडे गेला. शिंध्याकडूनहि निजामाला सिंधखेड व जालनाच्या भोवतालचा प्रदेश परत मिळाला. यापुढें (१८०३-२०) पेंढाऱ्यांनी व भिल्लांनी वऱ्हाडास त्रास दिला. स. १८२२ च्या तहान्वयें वऱ्हाडची पूर्व सीमा वर्धा नदी ठरली व मेळघाटाजवळीक प्रदेश, वर्ध्याच्या पूर्वकडील प्रदेशाबद्दल आणि पेशव्यांच्या मुलुखाबद्दल निजामास परत मिळाला.
या सुमारास ‘पामर आणि कंपनी’ नें आपला पगडा निजामावर बसवला. मेटकाफू यानें तिच्याविरूध्द प्रयत्न केला तरी तो सिध्दीस गेला नाहीं. या कंपनीनें निजामाला वऱ्हाडांतील सैन्यखर्चाबद्दल शेंकडा २४ प्रमाणें कर्ज दिलें होतें. हैदराबाद येथील पूरणमल नांवाच्या मोठया सावकारानें वऱ्हाडांतील बहुतेक भाग धाऱ्यानें लावू घेतला होता; परंतु १८३९ मध्यें रेसिडेंटच्या आग्रहामुळें त्या हांकून देण्यांत आलें. पुढें पेस्तनजी कंपनी निघाली. हा कांहीं पारशी व्यापाऱ्यांनी काढलेली होती व १८२५-२६ मध्यें वऱ्हाडांतील कापूस मुंबईस नेण्याचें काम तिनें आरंभि कापूस पिकवणारास मोठमोठया रकमा त्यांनी दिल्या व खामगाव वगैरें ठिकाणीं कापूस दाबण्याचें कारखानें काढून निजामाच्या मुलुखांतील माल बाहेर नेण्याचें काम स्वीकारले. १८४१ मध्यें दिवाण चंदुलाल यानें संस्थानच्याकडे जें कर्ज होतें त्याच्या फेडीदाखल वऱ्हाडांतील वसुलाचें उत्पन्न दिले; परंतु १८४३ मध्यें त्या दिवाणानें राजीनामा दिला व संस्थानचें अगदीं दिवाळें वाजण्याच्या बेतांत आल्यामुळें पेस्तनजीस वऱ्हाड सोडावें लागलें. चंदुलालच्या गैरव्यवस्थेमुळें उत्पन्न कमी झालें. तेव्हां १८४३ त व पुढें इंग्रजी तैनातफौजेचा खर्च भागविण्यास इंग्रजसरकारास रोख पैसा ध्यावा लागला. पण १८५० पावेतों पुष्कळ बाकी सांचली; व १८५३ त ही बाकी व इतर बाबींचे मिळून इंग्रजासरकारचे एकंदर ५३ लाख कर्ज झालें. १८५३ मध्यें निजामाशी नवा तह होऊन इंग्रजसरकारास कर्ज फेडीदाखल ५० लाख वसुलाचा प्रदेश मिळाला. ह्याच मुलुखास हल्ली वऱ्हाड असें म्हणतात. या तहान्वयें खऱ्या वऱ्हाडाशिवाय धाराशिव व रायचूर दुआब हे जिल्हे इंग्रजांकडे जास्त आले. दर वर्षी हिशांब करून जास्त उत्पन्न झालें तर तें निजामास परत ध्यावें असेहि ठरलें. या तहामुळें निजामास हिशोब दरसाल देणें फार त्रासदायक व गैरसोयीचें झालें. व स. १८०२ च्या व्यापारी तहाप्रमाणें कर बसविण्यांत पुष्कळ अडचणी उत्पन्न झाल्या. याकरितां व १८५७ तील निजामच्या मदतीचें बक्षीस म्हणून १८६० मध्यें नवा तह झाला व निजामला ५० लाख रू. कर्जाची सूट देऊन सुरापूर, धाराशिव व रायचूर प्रांत दिले. उलट गोदावरीच्या दक्षिण तीरावरील प्रदेश त्यानें इंग्रजांनां दिला. व १८५३ प्रमाणेंच वऱ्हाडची व्यवस्था असावी असें कबूल केलें.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा