फॉलोअर

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ५५

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव





भाग ५५
पोस्तसांभार ::मराठा युग
-------------------------------------------------------------
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून नद्यांना खूप महत्त्व आहे. नद्यांच्या किनारी अनेक संस्कृत्या उदयाला आल्या आणि लोपही पावल्या त्याच बरोबर अनेक गावे नद्यांच्या किनारी वसलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी काठी गोदा संस्कृतीचा उदय झाला. गोदावरी नदी काठी अनेक गावे वसली. या गावांना प्राचीन काळापासून प्रचंड धार्मिक,ऐतिहासिक,सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे.
त्यापैकी महाराष्ट्रातील अनेक गावांचा इतिहास हा वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या असाच वैशिष्टय़पूर्ण ऐतिहासिक वारसा व धार्मिक महत्व असणारे मुंगी हे गाव आहे. पैठण या ऐतिहासिक शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंगी या गावालाही प्राचीन इतिहास आहे. पूर्वीच्या काळी या गावाला पैठण शहरा सारखेच महत्त्व होते इतिहासामध्ये नवा अध्याय लिहिणारे हे गाव प्रशासकीय दृष्ट्या शेवगाव तालुक्यात आहे. मुंगी हे दक्षिण गंगा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गाव, या गावाला हजारो वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभुमी असल्याने हे गाव प्राचीन आहे. या गाव ची ग्रामदेवता ही मुंगादेवी आहे दरवर्षी या मुंगादेवीची यात्रा भरत असते. यात्रेला कोकणा मधून ही भाविक भक्त येत असतात.
मुंगी या गावाचे नाव प्राचीन काळी #पिपीलिका हे होते कारण याठिकाणी दधीचि ऋषि यांचा मुलगा पिप्यलाद याने पिपीलिकेश्वर महादेवाची स्थापना केली त्यानंतर या परिसराला पिपीलिकेश्वर असे म्हटले जाऊ लागले यासंबंधी उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी मुंगी आणि पैठण या परिसराचा एकत्रितरीत्या उल्लेख येतो. तसेच अनेक ग्रंथांमध्ये या परिसराला प्राचीन काळी वैदूर्य पतन असं म्हटलं जात होतं असा उल्लेख आहे अनेक वर्षापासुनच मुंगी गावाचे नाव मुंगी -पैठण,मुंगी- शेवगाव या नगरांशी जोडलेले आहे अनेक संत,महापुरुष,विद्वान यांचे जन्मगाव हे मुंगी आहे.
1863 साली येथे संशोधकांना अश्मयुगातील मानवाने बनवलेले दगडी हत्यार सापडली. त्याच बरोबर जवळच्या गोदावरी नदी पात्रात ही प्राचीन अवशेष सापडल्याचे गावकरी सांगतात म्हणजेच मुंगी गावच्या परिसरात अश्मयुगीन कालखंडापासुनच मानवाच्या वसाहतीचे केंद्र होते. अश्मयुगीन कालखंडापासून या परिसरात मानवी वस्ती असल्याचे अनेक पुरावे संशोधकांना मिळाले आहे. या परिसरामध्ये महाराष्ट्रातील अश्मयुगीन काळाचे सुरुवातीचे अवशेष मिळाल्याने महाराष्ट्राच्या अश्मयुगीन काळाच्या इतिहास लेखनाला सुरुवात ही मुंगी गावच्या परिसरातून मिळालेल्या अवशेषांच्या आधारे झाली आहे.या परिसरामध्ये आजही मंदिरांचे प्राचीन अवशेष आढळतात निम्बार्क संप्रदायाचे प्रवर्तक श्री #भगवान_निम्बार्काचार्य यांचा जन्म मुंगी या गावातच झाल्याचे मानले जाते.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे बंधू विठोजीराजे भोसले यांना मुंगी गावाची जहागिरी मिळाली होती.
पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे लढाई झाली होती. या लढाईत पराभुत झालेल्या निजामाने मुंगी गावातच तह स्वीकारला. तो तह 'मुंगी-शेवगाव' चा तह म्हणुनच ओळखला जातो.
मुंगी या गावामध्ये विणकर लोकांची मोठी वस्ती होती व हे विणकर लोक पैठणी विणण्याचे काम करत तसेच पैठणीला लागणारा कच्चामाल मुंगी गावातून पुरवला जायचा असे गावातील जेष्ठ नागरिक सांगतात.
त्यामुळे मुंगीकरांनी आपल्या गावच्या वैभवशाली इतिहासाचे संकलन करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...