फॉलोअर

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ५८

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ५८
महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि निर्मिती
पोस्तसांभार ::मराठा युग
1 मे महाराष्ट्र दिन.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली निर्मिती नव्हे 1 मे 1960 रोजी सरकारी दृष्ट्या मुंबई महाराष्ट्राला जोडून महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. मग त्या अगोदर महाराष्ट्र राज्य नव्हते का....?
तर नक्कीच होते महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर 2500 वर्षांपूर्वीच झाली आहे. मराठी भाषा मराठी संस्कृती ही 2500 वर्षे जुनी आहे. 2500 वर्षांच्या अगोदर तर भाषेनुसार प्रांत नव्हतेच तेव्हा सर्व संस्कृत बोलायचे सर्वांची बोलीभाषा एकच संस्कृत होती आणि तेव्हा भारतात 16 महाजनपद होते आणि त्यामध्ये महाराष्ट्र #अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजन पदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजेच #इश्वाकु वंशातील राजे राज्य करायचे.
महाराष्ट्र म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या आराध्य दैवताच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच शिवरायांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्राच काय आज हा संपूर्ण हिंदुस्तान हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.
पण जे महाराष्ट्राचे निर्माते आहेत ज्यांनी हे महाराष्ट्र राज्य पहिल्यांदी घडवले जो महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश आहे तो म्हणजे #सातवाहन. मराठा सातवाहन साम्राज्याची मुख्य राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजेच आत्ताचे #पैठण होती व उपराजधानी #जीर्णनगर म्हणजे आत्ताचे जुन्नर होती.
सातवाहनांनी अश्मक (पैठण), नासिक्य (नाशिक), कुंतल(कोल्हापूर), गोमंतक (गोवा), विदर्भ, अप्रांतक (कोकण), गोपराष्ट्र या सर्व प्रांतांचा मिळून महाराष्ट्र बनवला.
पण अज्ञानी मराठे या सातवाहन राजवंशाला आणि या राजवंशातील सर्वात महान सम्राट #गौतमीपुत्र_सातकर्णी यांना साफ विसरलोय ज्यांचा पराक्रम शिवतुल्य आहे. जसे शिवरायांनी 400 वर्षांपूर्वी या विदेशी आक्रमक मुसलमानांपासून हा बुडालेला महाराष्ट्र हिंदू धर्म आणि अखंड हिंदुस्तान वाचवला त्याला नवी प्राणज्योत दिली म्हणून आज आपले अस्तित्व आहे. तसेच गौतमीपुत्र सातकर्णी यांनी देखील 2000 वर्षांपूर्वी विदेशी आक्रमक शकांपासून हा बुडालेला महाराष्ट्र हिंदू धर्म हिंदुस्तान वाचवला आणि त्याला नवी प्राणज्योत दिली म्हणून आज आपले अस्तित्व आहे.
शक म्हणजे ग्रीक आणि मध्य आशियातून आलेल्या लुटारू टोळ्या होत्या त्यांनी भारतावर आक्रमण केले होते आणि भारत पारतंत्र्यात गेला होता त्यावेळी दक्षिण भारतातील जे शक होते त्यांचा राजा होता नहपान त्याने गुजरात आणि महाराष्ट्राचा जुन्नर नाशिक या भागावर अतिक्रमण केले होते तेव्हा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी नाशिक येथील गोवर्धन या ठिकाणी शकांचा राजा नहपान याचा पराभव केला तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजेच गुढीपाडव्याचा आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांनी या विजयाचे प्रतिक म्हणून राजधानी पैठण या ठिकाणी गोदावरी नदीच्या किनारी एक विजयस्तंभ बांधला जो आज देखील आहे. आणि शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली जे की आज 1943 चालू आहे.
पण दुर्दैवाने महाराष्ट्राचा मराठ्यांचा हा गौरवशाली प्राचीन इतिहास खुद्द मराठेच विसरलेत तर दुसऱ्यांचा तर विषयच सोडा त्यामुळे याचा गैरफायदा इतर लोक घेतात आणि आपला इतिहास चोरतात काहींनी सातवाहन राजांना कुंभार घोषित केले काहींनी शूद्र घोषित केले काहींनी ब्राह्मण घोषित केले हे सर्व का झाले कारण जे सातवाहनांचे खरे वंशज क्षत्रिय मराठे आहेत त्यांनी आपला इतिहास विसरल्यामुळे आणि सातवाहनांवरील हक्क सोडल्यामुळे तरी सर्वांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजां बरोबरच आपल्या महाराष्ट्राचा जो प्राचीन गौरवशाली इतिहास आहे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव याकडेही इतिहासकारांनी ,पोस्ट लिहिणार्यांनी ,युट्यूब वर व्हिडिओ बनवणार्यांनी लक्ष द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...